agriculture news in marathi, Transaction in Merchandise Committees in Varadha | Agrowon

वऱ्हाडातील बाजार समित्यांमध्ये व्यवहार सुरळीत
टीम अॅग्रोवन
बुधवार, 5 सप्टेंबर 2018

हमीभावाच्या मुद्यावर गेले काही दिवस बंद बाजार समित्यांमधील व्यवहार बंद होते. यासंदर्भात पणन संचालकांचे पत्र प्राप्त झाले अाहे. त्यानंतर जिल्ह्यात सर्व बाजार समित्या सुरू झाल्या अाहेत.
- जी. जी. मावळे, जिल्हा उपनिबंधक, अकोला

अकोला : पणन संचालकांनी एक सप्टेंबरला तातडीचे पत्र जिल्हा उपनिबंधकांना पाठवले. त्यामुळे गेल्या आठ दिवसांपासून बंद असलेल्या वऱ्हाडातील सर्वच बाजार समित्यांमधील व्यवहार सुरळीत होत असून, अकोला जिल्ह्यातील सर्वच बाजार समित्या सुरू झाल्याची माहिती जिल्हा उपनिबंधक जी. जी. मावळे यांनी दिली.         

हमीभावापेक्षा कमी दराने शेतमालाची खरेदी केल्यास एक वर्ष कैद व ५० हजार रुपये दंडाची शिक्षा, अशी सुधारणा शासन करीत असल्याची चर्चा सुरू झाल्याने व्यापाऱ्यांनी खरेदी बंद केली होती. वाशीम जिल्ह्यातील सर्व बाजार समित्यांना मंगळवारी (ता. ४) पणन संचालकांचे पत्र दिले अाहे. यामुळे उद्यापासून बाजार समित्या सुरू होतील, अशी माहिती जिल्हा उपनिबंधक रमेश कटके यांनी दिली.

बुलडाणा जिल्ह्यात अद्याप काही बाजार समित्यांमध्ये बंद कायम होता. पणन संचालकांचे पत्र बाजार समित्यांना दिले असून तोडगा काढण्यासाठी स्थानिक पातळीवर बैठका होत अाहेत. तीन बाजार समित्यांमध्ये सोमवारपासून व्यवहार सुरू झाले, असे बुलडाणा जिल्हा उपनिबंधक नानासाहेब चव्हाण म्हणाले. या जिल्ह्यातील सर्वात मोठी बाजार समिती असलेल्या खामगावमध्ये मंगळवारी व्यापाऱ्यांसोबत बैठक घेण्यात अाली. शासनाच्या अावाहनानंतर लगेच तीन बाजार समित्यांमधील व्यवहार सुरू झाले होते. राहिलेल्या ठिकाणी तोडगा काढण्याचे काम सुरू असल्याचेही ते म्हणाले.

कोट्यवधींचा फटका
काही बाजार समित्या २३ अाॅगस्ट, तर काही त्यानंतर दोन दिवसांनी बंद झाल्या. भुसार व्यापाऱ्यांनी पुकारलेल्या बंदमुळे कोट्यवधींची उलाढाल ठप्प झाली होती. याचा परिणाम शेतकऱ्यांच्या शेतमालाला घ्यायलाही कोणी तयार नव्हते. मुगाचा हंगाम सुरू झाला असून नेमक्या हंगामाच्या तोंडावर झालेल्या कोंडीमुळे शेतकरी चिंतातूर बनला होता. अाता बाजार पूर्ववत होत असून मुगाची अावकही या अाठवड्यापासून वाढण्याची शक्यता अाहे.

इतर बातम्या
काँग्रेसमध्ये नवचैतन्य; प्रियंका गांधी...नवी दिल्ली : काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधी...
मक्यातील लाग रंग येण्यामागील गूढ उलगडलेमक्यामध्ये काहीवेळा दिसणाऱ्या लाल रंगाच्या...
रब्बीत १०६ कोटींचे पीककर्ज वाटपपरभणी : यंदाच्या रब्बी हंगामामध्ये...
गव्हाची ६५ हजार ५४३ हेक्टरवर पेरणीनांदेड :नांदेड, परभणी, हिंगोली जिल्ह्यांत यंदा ६५...
एफआरपी तुकड्यात घेणार नाही : खासदार...सांगली : राज्यातील साखर कारखाने सुरू होऊन ८० दिवस...
पाणी योजनांचा वीजपुरवठा सुरळीतजळगाव : जिल्ह्यातील सुमारे ९३५ गावांच्या...
पाणीपुरवठ्यांच्या देयकासाठी दोन कोटीअकोला : दुष्काळी परिस्थिती निर्माण झालेल्या...
सांगली जिल्ह्यात हळद काढणीला वेगसांगली : जिल्ह्यात हळदीच्या काढणीला प्रारंभ झाला...
अपुऱ्या सदस्यांच्या उपस्थितीत जिल्हा...धुळे : पुरेशी सदस्यसंख्या नसतानाही (कोरम)...
मागण्यांसाठी संग्रामपूर येथे...बुलडाणा  ः जनावरांसाठी चारा नाही, लोकांना...
जतमधील ४२ गावांना कर्नाटकातून पाणीसांगली : जत तालुक्यातील ४२ गावांना कर्नाटकातून...
शेतकऱ्यांनी पाडली तूर खरेदी बंदयवतमाळ : हमीभावापेक्षा ९०० ते १००० रुपये कमी...
कर्जमाफीसाठी पॉलिहाउस शेडनेटधारक...नगर  : पॉलिहाउस शेडनेटधारक शेतकऱ्यांचे...
पाण्याचे प्रस्ताव सादर करा : पालकमंत्रीसोलापूर : पाणीटंचाई भासणाऱ्या गावातील...
व्याज सवलती योजनेबाबत बँकांनी गांभीर्य...सोलापूर : पीककर्जाची नियमितपणे कर्जफेड...
राज्यात १७८६ टॅंकरव्दारे पाणीपुरवठापुणे  : सलग दोन वर्षे पावसाने ओढ दिल्यानंतर...
विदर्भात पाच ठिकाणी होणार ब्रिज कम...अमरावती  ः भूजल पुनर्भरणाच्या उद्देशाने...
सोलापूर जिल्ह्यातील १६२ पाणंद...सोलापूर : सोलापूर जिल्ह्यात पालकमंत्री पाणंद...
खानदेशात मक्याची आवक नगण्यजळगाव : खानदेशातील प्रमुख बाजार समित्यांमध्ये मक्...
सातारा जिल्ह्यात ४६ लाख ३५ हजार टन ऊस...सातारा : जिल्ह्यातील ऊस गाळप हंगाम वेगात...