agriculture news in marathi, transfer tur and gram arrears, Maharashtra | Agrowon

तूर, हरभऱ्याचे थकीत १६३ कोटी वर्ग करा : ‘नाफेड’चे व्यवस्थापकीय संचालक
टीम अॅग्रोवन
सोमवार, 10 सप्टेंबर 2018

मुंबई ः राज्यातील शेतकऱ्यांकडून किमान आधारभूत किमतीवर खरेदी झालेल्या तूर आणि हरभऱ्याचे थकीत १६३ कोटींचे चुकारे आज (ता. १०) राज्य पणन महासंघाकडे वर्ग करण्याचे निर्देश ‘नाफेड’ने दिले आहेत. त्यामुळे आगामी सणासुदीच्या काळात शेतकऱ्यांच्या हाती चुकाऱ्यांचे पैसे उपलब्ध होतील, अशी आशा आहे. 

मुंबई ः राज्यातील शेतकऱ्यांकडून किमान आधारभूत किमतीवर खरेदी झालेल्या तूर आणि हरभऱ्याचे थकीत १६३ कोटींचे चुकारे आज (ता. १०) राज्य पणन महासंघाकडे वर्ग करण्याचे निर्देश ‘नाफेड’ने दिले आहेत. त्यामुळे आगामी सणासुदीच्या काळात शेतकऱ्यांच्या हाती चुकाऱ्यांचे पैसे उपलब्ध होतील, अशी आशा आहे. 

चालू वर्षी किमान आधारभूत किमतीने शासनाने ४४.६ लाख क्विंटल तूर खरेदीचे लक्ष्य ठेवले होते. हंगामात त्यापैकी ३३ लाख क्विंटल तूर खरेदी झाली. हरभऱ्याचे ३० लाख क्विंटल खरेदीचे सरकारी उद्दिष्ट होते. प्रत्यक्षात १३ लाख क्विंटल हरभरा खरेदी झाली. हंगामात बोनससह ५,४५० रुपये इतका तुरीचा हमीभाव होता. तर हरभऱ्यासाठी ४,४०० रुपये हमीभाव जाहीर करण्यात आला होता.

हंगामातील तूर आणि हरभऱ्याच्या अपेक्षित उत्पादनापैकी अनुक्रमे ३९ व १६ टक्के खरेदीचे शासनाचे उद्दीष्ट होते. ते सुद्धा पूर्ण झाले नाही. त्यामुळे राज्य शासनाने खरेदी न झालेल्या तूर आणि हरभऱ्यासाठी प्रति क्विंटल एक हजार रुपये अनुदान जाहीर केले आहे. नोंदणी केलेल्या शेतकऱ्यांसाठी हे अनुदान दिले जाणार आहे. ही प्रक्रिया अजून सुरू आहे. 

यंदा शासनाकडून एकंदर २,४३७ कोटींची शासकीय तूर, हरभरा खरेदी झाली. त्यापैकी जुलैपर्यंत तुरीचे २३५ कोटी आणि हरभऱ्याचे ६४४ कोटींचे असे एकंदर ८७९ कोटींचे चुकारे थकीत होते. सप्टेंबरच्या पहिल्या आठवड्यापर्यंत तूर, हरभऱ्याचे १६३ कोटींचे चुकारे प्रलंबित होते.

यासंदर्भात अहमदनगर, यवतमाळ जिल्ह्यातील शेतकऱ्यांचे राज्य कृषी मूल्य आयोगाचे अध्यक्ष पाशा पटेल यांना सतत दूरध्वनी येत होते. थकीत चुकारे लवकर मिळावेत, अशी शेतकऱ्यांची विनंती होती. त्याअनुषंगाने श्री. पटेल यांनी नाफेडचे व्यवस्थापकीय संचालक संजीव चढ्ढा यांची शनिवारी (ता. ८) नवी दिल्लीत भेट घेतली. 

या भेटीत विशेषतः राज्यातील शेतकऱ्यांच्या प्रलंबित चुकाऱ्यांचा विषय चर्चेला आला. पाशा पटेल यांनी तूर, हरभऱ्याचे चुकारे लवकर अदा करण्याची विनंती त्यांना केली. श्री. चढ्ढा यांनी सोमवारीच हे चुकारे पणन महासंघाकडे वर्ग केले जातील, असे स्पष्ट करून त्यानंतर दोनच दिवसात पणन महासंघाच्या माध्यमातून शेतकऱ्यांना त्यांचे पैसे मिळतील, अशी ग्वाही दिली. 

नाफेडचा प्रतिनिधी म्हणून राज्यात पणन महासंघ काम करीत असतो. राज्यातील शेतीमालाची शासकीय खरेदी राज्य पणन महासंघाच्या माध्यमातून होत असते. त्यामुळे शेतकऱ्यांचे चुकारेसुद्धा पणन महासंघाच्या वतीनेच अदा केले जातात. नाफेडकडून चुकाऱ्याची रक्कम पणन महासंघाकडे वर्ग केल्याच्या दोन दिवसानंतर शेतकऱ्यांनी पणन महासंघाच्या जिल्ह्यातील अधिकाऱ्यांशी संपर्क साधून त्यांचे थकीत चुकारे प्राप्त करावेत, असे आवाहन पाशा पटेल यांनी केले आहे. 

शासनाची २०१७-१८ मधील हमीभावाने खरेदी (क्विंटलमध्ये)

पीक खरेदी  लाभार्थी शेतकरी खरेदी किंमत
तूर   ३३,६७,१७७.४८  २,६५,८५४  १८३५.११
हरभरा १३,६९,१८४.४६   ९९,१६१ ६०२.४४

           
      
          
 

इतर अॅग्रो विशेष
सूर्य तळपताना छत करा दुरुस्तआठवड्यापूर्वी आलेल्या चांगल्या पावसाच्या अंदाजाने...
आयोगाचा कारभार प्रश्‍नचिन्हांकितप्रत्येक निवडणुकीची रीत न्यारी असते,...
पाणी व्यवस्थापनातून वाढविली कापसाची...आत्महत्याग्रस्त यवतमाळ जिल्ह्यातील अंबोडा (ता....
पाणी व्यवस्थापनातून नळावणे गावाची...अनेक वर्षांच्या पाणीटंचाईतून मुक्त होण्यासाठी...
डेरे यांनी उभारली अत्याधुनिक सिंचन...सातारा जिल्ह्यातील कवठे येथील अतुल डेरे यांनी...
‘आर्टिफिशियल इंटिलिजन्स’कडे आयटी...‘आर्टिफिशियल इंटिलिजन्स’ हेच येत्या काळातील...
पाणी व्यवस्थापनातून ग्रामविकासपाण्यासाठी कायम संघर्ष करीत असलेल्या कान्होळ (जि...
अवघी कारभारवाडी झाली ठिबकमयकोल्हापूर जिल्ह्यातील कारभारवाडी (ता. करवीर) येथे...
सर्वाधिक ६५० शेततळ्यांचं अजनाळेसोलापूर जिल्ह्यातील सांगोला तालुका दरवर्षीच...
अल्पभूधारकांच्या आयुष्यात जलश्रीमंती बुलडाणा जिल्ह्यात जानेफळ परिसरात शासनाच्या...
सत्तावीस गटांच्या बळातून घडली किमयासंगमनेर (जि. नगर) तालुक्यातील सावरगाव तळ...
वाघाड पाणीवापर संस्थांनी शेतीतून उभारले...नाशिक जिल्ह्यात वाघाड प्रकल्पस्तरीय पाणीवापर...
कम पानी, मोअर पानी देणारे डाॅ. वने...नगर जिल्ह्यातील मानोरी येथील कृषिभूषण डॉ....
आसूद : पाणी वितरणाचे अनोखे मॉडेलरत्नागिरी जिल्ह्यात दापोली-हर्णे रस्त्यावर दोन...
विकासाची गंगा आली रे अंगणी...खानदेशात जळगाव, जामनेर व भुसावळ या तालुक्‍यांच्या...
मराठवाड्यात सिंचनातले सर्वोच्च...परभणी जिल्ह्यात वरपूड येथील चंद्रकांत अंबादासराव...
होय, कमी पाण्यात विक्रमी ऊस !सांगली जिल्ह्यातील गोटखिंडी येथील प्रयोगशील ऊस...
राज्यात नीचांकी हरभरा खरेदीमुंबई : राज्यातील हरभरा उत्पादक...
सीमेवरील तणावाचा केळी निर्यातीला फटकारावेर, जि. जळगाव : जम्मू-काश्मीर नियंत्रण रेषेजवळ...
ॲग्रोवनच्या ‘मराठवाड्यातलं इस्त्राईल :...जालना : कष्ट उपसणारी पहिली पिढी, पीक बदलातून...