agriculture news in marathi, transfers paused in agriculture department, maharashtra | Agrowon

मुदतपूर्व बदल्या रखडल्याने मुख्यमंत्री, कृषिमंत्र्यांकडून विचारणा
टीम अॅग्रोवन
गुरुवार, 4 ऑक्टोबर 2018

पुणे  : राज्याच्या कृषी खात्यातील कृषी सहायक, पर्यवेक्षकांसह गट ''क'' मधील मुदतपूर्व बदल्या रखडल्या आहेत. मुख्यमंत्री आणि कृषिमंत्र्यांकडून यासंदर्भात वारंवार विचारणा केली जात आहे, अशी माहिती सूत्रांनी दिली. कृषी आयुक्तालयाने या बदल्यांचे प्रस्ताव मान्यतेसाठी पाठवले नसल्याबद्दल कृषिमंत्रालयातून आयुक्तालयाला पत्र पाठवून नाराजी व्यक्त करण्यात आली आहे.  

पुणे  : राज्याच्या कृषी खात्यातील कृषी सहायक, पर्यवेक्षकांसह गट ''क'' मधील मुदतपूर्व बदल्या रखडल्या आहेत. मुख्यमंत्री आणि कृषिमंत्र्यांकडून यासंदर्भात वारंवार विचारणा केली जात आहे, अशी माहिती सूत्रांनी दिली. कृषी आयुक्तालयाने या बदल्यांचे प्रस्ताव मान्यतेसाठी पाठवले नसल्याबद्दल कृषिमंत्रालयातून आयुक्तालयाला पत्र पाठवून नाराजी व्यक्त करण्यात आली आहे.  

गंभीर स्वरूपाचे आजार, दुखापत असलेले कर्मचारी तसेच आई-वडिलांना गंभीर स्वरूपाची व्याधी असलेल्या कर्मचाऱ्यांकडून मुदतपूर्व बदलीसाठी विनंती अर्ज येतात. त्यांना विनंती बदल्या असेही म्हणतात. राज्यभरातून विनंती अर्जांचे अनेक अर्ज धूळ खात पडल्यामुळे कर्मचारी नाराज आहेत.
`कृषी खात्यातील घोटाळ्यात दोषी असलेल्या एसएओ दर्जाच्या अधिकाऱ्याची चौकशी करण्याऐवजी त्याला पदोन्नती शासन देते. याच अधिकाऱ्याला दहा महिन्यांत हवे तेथे बदली मिळते. मंत्र्यांच्या चिठ्या आणून काही अधिकारी मलर्ईदार पदांवर बेधडक बदली करून आणतात. मात्र, आमच्यासारखे खालच्या श्रेणीतील कर्मचारी दोन दोन वर्षांपासून विनंती बदल्यांची वाट बघत आहेत,` अशी हताश प्रतिक्रिया काही कर्मचाऱ्यांनी व्यक्त केली.

`मुदतपूर्व बदल्या रखडल्याने मंत्रालयातून कृषी आयुक्तालयाला (क्रमांक १०१७-३२५-१६) पत्र पाठवून तीव्र नाराजी व्यक्त करण्यात आली आहे. आयुक्तालयातून बदल्यांचे प्रस्ताव मंत्रालयात मान्यतेसाठी पाठविण्यात आलेले नाहीत. या बदल्या रखडल्यामुळे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, कृषिमंत्री चंद्रकांत पाटील, कृषिराज्यमंत्री सदाभाऊ खोत तसेच इतर लोकप्रतिनिधींकडून वारंवार विचारणा केली जात आहे,` अशी माहिती सूत्रांनी दिली.

मंत्रालयात ऑगस्ट अखेरपर्यंत फक्त नागपूर, लातूर, ठाणे आणि कोल्हापूर भागातील कृषी सहायकांच्या आंतरसंभागीय व मुदतपूर्व बदल्यांचे प्रस्ताव प्राप्त आले होते. मात्र, अमरावती, औरंगाबाद, नाशिक आणि पुणे विभागातील प्रस्ताव न गेल्यामुळे अडचणी येत असल्याचे सूत्रांचे म्हणणे आहे.

मुदतपूर्व बदल्यांनाही समुपदेशात आणा
राज्यातील कृषी कर्मचाऱ्यांच्या गट कमध्ये कृषी सहायक, पर्यवेक्षक, वरिष्ठ लिपिक, कनिष्ठ लिपिक, सहायक अधीक्षक, आरेखक, अनुरेखक आणि वाहनचालकांचा समावेश असतो. मुदतपूर्व बदल्यांमध्ये या कर्मचाऱ्यांवर अन्याय होतो. मात्र, लक्ष्मीदर्शन झाल्याशिवाय मंत्रालयात देखील फाईल पुढे सरकत नाही. त्यामुळे या बदल्यांचे अधिकार आयुक्तांना देऊन समुपदेशन पद्धतीने पारदर्शक बदल्या कराव्यात, अशी मागणी कर्मचाऱ्यांनी केली आहे.

इतर अॅग्रो विशेष
दुष्काळी परिस्थितीतून जनतेला बाहेर...पंढरपूर : राज्यातील दुष्काळी परिस्थितीतून जनतेला...
पडला सत्याचा दुष्काळ, बहू झाला घोळराज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी २३...
चारा नियोजनातील ‘दुष्काळ’राज्यात आजपासून हिवाळी अधिवेशन सुरू होणार आहे....
मोहोळमध्ये ‘हुमणी‘ने १७ हजार एकरांचे...मोहोळ, जि. सोलापूर : तालुक्‍यातील सात महसुली...
पॉलिथिन पिशव्यांचा वापर थांबविण्याचे...पुणे   : राज्यातील कृषी तसेच वन विभागातील...
ढगाळ हवामानामुळे थंडी गायब; आजही...पुणे : अरबी समुद्रात असलेल्या तीव्र कमी दाब...
तमिळनाडूच्या धर्तीवर मराठा समाजाला...मुंबई : मूळ आरक्षणाला धक्का न लावता तमिळनाडूच्या...
ब्लॉक प्रिंटिंग व्यवसायातून आर्थिक...पूर्व विदर्भातील भंडारा, वर्धा या जिल्ह्यांत...
दुष्काळग्रस्तांना सरसकट हेक्टरी ५० हजार...मुंबई : राज्यात यंदा १९७२ पेक्षाही भयंकर...
दूध अनुदान योजनेस ३१ जानेवारीपर्यंत...पुणे : राज्यात उत्पादित होणाऱ्या (पिशवी बंद...
आता कोठे धावे मन । तुझे चरण देखलिया...पंढरपूर, सोलापूर (प्रतिनिधी) :  आता कोठे...
मराठवाड्यात रब्बीची केवळ १९ टक्‍केच...औरंगाबाद : मराठवाड्यात यंदा दुष्काळाची छाया किती...
केळीच्या आगारातून आखातात जाणार ४००...जळगाव ः केळीचे आगार असलेल्या जळगाव जिल्ह्यातून...
महाकॉट ब्रॅण्डची चमक पडली फिकीजळगाव ः पूर्व विदर्भ, उत्तर मराठवाडा व खानदेशातील...
शेतीला मिळाली पूरक उद्योगाची साथअंबाणी (जि. सातारा) येथील सौ. सुरेखा पांडुरंग...
दक्षिण कोकण, पश्‍चिम महाराष्ट्रात आज...पुणे : दक्षिण भारतामध्ये असलेल्या ‘गज’...
अभ्यास अन् नियोजनातून शेती देते समाधाननाशिक शहरातील प्रख्यात हृदयरोगतज्ज्ञ डॉ. अनिरुद्ध...
‘सीसीआय’ची कापूस खरेदी मंगळवारपासून...जळगाव : कापूस खरेदीसंबंधी जिनिंगमध्ये केंद्र...
दुष्काळ, मराठा आरक्षण अधिवेशनात गाजणारमुंबई : उद्यापासून (ता. १९) मुंबईत सुरू होत...
शेतकऱ्यांच्या विधवांचे २१ला मुंबईत...मुंबई : देशभरात विविध शेतकऱ्यांचे मोर्चे...