agriculture news in marathi, transporters strike stop the onion transport | Agrowon

वाहतूकदारांच्या संपामुळे ६० लाखांची कांदा वाहतूक ठप्प
टीम अॅग्रोवन
शुक्रवार, 1 जून 2018

लासलगाव, जि. नाशिक :  इंधनाच्या दरात दररोज वाढ होत असून, डिझेलचे भाव ७२ रुपये ५० पैशांपर्यंत गेल्याने लासलगाव येथील मालवाहतूकदार संघटनेकडून सोमवारी (ता. २८) एक दिवसाचा लाक्षणिक संप करण्यात आला. वाहतुकादारांच्या या लाक्षणिक संपामुळे लासलगावमधून फक्त एकाच दिवसात साेमवारी ५० ते ६० लाख रुपयांचा कांदा बाहेरगावी जाऊ शकला नाही. अशीच इंधन दरवाढीची परिस्थिती कायम राहिली तर ट्रकचा बेमुदत संपाचा इशारा वाहतूकदार संघटनेने दिला आहे.

लासलगाव, जि. नाशिक :  इंधनाच्या दरात दररोज वाढ होत असून, डिझेलचे भाव ७२ रुपये ५० पैशांपर्यंत गेल्याने लासलगाव येथील मालवाहतूकदार संघटनेकडून सोमवारी (ता. २८) एक दिवसाचा लाक्षणिक संप करण्यात आला. वाहतुकादारांच्या या लाक्षणिक संपामुळे लासलगावमधून फक्त एकाच दिवसात साेमवारी ५० ते ६० लाख रुपयांचा कांदा बाहेरगावी जाऊ शकला नाही. अशीच इंधन दरवाढीची परिस्थिती कायम राहिली तर ट्रकचा बेमुदत संपाचा इशारा वाहतूकदार संघटनेने दिला आहे.

आशिया खंडातील नावाजलेली बाजारपेठ म्हणून लासलगाव कृषी उत्पन्न बाजार समितीचा नावलौकिक अाहे. लासलगाव बाजार समितीत दररोज २० ते २२ हजार क्विंटल कांदे व तीन ते चार हजार क्विंटल धान्याची आवक होत असते. येथे खरेदी झालेला शेतीमाल ट्रक व इतर वाहनांच्या साह्याने बाहेरगावी, रेल्वेपर्यंत अथवा जहाजापर्यंत पाठविला जाताे. गेल्या अनेक दिवसांपासून मालवाहतूक करणाऱ्या चालकांमध्ये इंधन दरवाढीमुळे नाराजीचा सूर पाहायला मिळत अाहे. 

लासलगाव शहरात मालवाहतूकदार संघटना कार्यरत असून, या संघटनेमध्ये २०० ट्रकचा समावेश आहे. सोमवारी इंधन दरवाढीला कंटाळलेल्या मालवाहतूकदारांनी एक दिवसाचा लाक्षणिक संप पुकारून सरकारला ‘आतातरी इंधनाचे दर कमी करा’ असा इशारा या निमित्ताने दिला. 

लासलगाव शहरातील रेल्वे स्टेशनरोड परिसरात सुमारे २०० ट्रक इंधन दरवाढीला कंटाळून साेमवारी उभे करण्यात अाले हाेते. यामुळे शहरातून बाहेर जाणारा कच्चा माल व कांदा माेठ्या प्रमाणात पडून होता. एक दिवसाच्या लाक्षणिक संपामध्ये बाळासाहेब होळकर, दीपक खांदे, महेश होळकर, दत्तात्रय ठाकरे, सागर पवार, सलीम शेख, गोरख सोनवणे, दत्तू जाधव, इस्माईल शेख, संजय होळकर, सचिन गायकवाड, सुफियान शेख, शरद कोटकर, सोमनाथ विंचू, बापू शिंदे, कैलास काळे, बंटी होळकर, मारुती हरळे यांच्यासह अनेक मालवाहतूकदारांनी सहभागी होत दरवाढीचा निषेध केला. अांदाेलनास शेतकऱ्यांनीही पाठिंबा दिला. 

सर्वाधिक फटका कांदा दरास बसणार 
लासलगाव बाजार समितीत सध्या मोठ्या प्रमाणात उन्हाळ कांद्याची आवक होत आहे. दररोज २० ते २२ हजार क्विंटल कांदा लासलगाव येथे परिसरातील शेतकरी विक्रीसाठी अाणतात. केंद्र सरकार इंधनाचे वाढवत असल्यामुळे एक दिवसाचा लाक्षणिक संप मालवाहतूकदारांनी केल्याने सुमारे ५० लाख रुपयांचा कांदा बाहेरगावी जाऊ शकला नाही. त्यातच इंधनाचे भाव असेच वाढत राहिले, तर बेमुदत संपाचा इशारा लासलगाव येथील मालवाहतूकदार संघटनेने दिल्याने कांद्याला या इंधन दरवाढीचा फटका बसण्याची शक्यता नाकारता येत नाही.

इंधनाचे दर कमी करावेत 
दरराेज इंधन दरवाढीचा सामना करावा लागताेय. याला कंटाळून आम्ही लाक्षणिक संप केला. मात्र, शासनाने यात लक्ष घालून इंधनाचे दर तातडीने कमी करावेत. अन्यथा, आम्ही ट्रकचा बेमुदत बंद पाळणार आहोत, असे मालवाहतूकदार संघटना सदस्य बाळासाहेब होळकर यांनी सांगितले.

इतर ताज्या घडामोडी
संघर्ष गोकुळ ‘मल्टिस्टेट’चाकोल्हापूर जिल्हा दूध संघ (गोकुळ) मल्टिस्टेट...
'दारुमुळे दरवर्षी अडीच लाखापेक्षा जास्त...नवी दिल्ली- दारूमुळे दरवर्षी जवळपास अडीच...
जालन्यात पाण्यात बुडून तिघांचा मृत्यूजालना : गणपती बाप्पांचे विसर्जन करताना जालना...
शिखर, रोहितने पाकला धुतले; भारत अंतिम...दुबई : पाकिस्तानने उभारलेल्या 237 धावांचा सहजी...
खानदेशात मध्यम पाऊस; नंदुरबारला हुलकावणीजळगाव : खानदेशात शुक्रवारी (ता.२१) मध्यरात्री व...
पुणे जिल्ह्यात ढगाळ हवामानपुणे  : जिल्ह्यात आठवड्याच्या सुरवातीला...
खानापूर घाटमाथ्यावर तीव्र पाणीटंचाई सांगली  : घाटमाथ्यावर पावसाने ओढ दिली आहे....
नगर जिल्ह्यात साडेसहा लाख हेक्‍टरवर...नगर  ः जिल्ह्यात रब्बी हंगामात सहा लाख ५२...
कौशल्यावर आधारित उपक्रम ‘रयत’मध्ये सुरू...सातारा  ः केवळ पुस्तकी नव्हे तर कौशल्यावर...
नियमित कर्ज भरणाऱ्या शेतकऱ्यांचा अकोला...अकोला  ः नियमित कर्जाची परतफेड करणाऱ्या...
सांगली जिल्ह्यात पाणीप्रश्‍न पेटण्याची...सांगली  : पावसाने दिलेली उघडीप आणि पावसाळा...
अकोला, बुलडाण्यात सर्वदूर पाऊसअकोला   ः वऱ्हाडातील अकोला, बुलडाणा या...
सावधान... अल्झायमर आला उंबरठ्यावर ! कोल्हापूर : मंगळवार पेठेतल्या विठ्ठल मंदिरात रोज...
परभणीत हिरवी मिरची प्रतिक्विंटल ६०० ते...परभणी ः येथील जुना मोंढा भागातील फळे-भाजीपाला...
भातावरील तुडतुडे प्रादुर्भावाकडे...सध्या खरीप हंगामातील भात पीक बहुतेक ठिकाणी...
कमी तीव्रतेच्या वणव्यांचाही मातीच्या...कमी तीव्रतेचे वणवे किंवा मर्यादित प्रमाणात...
ढगाळ वातावरणाने खानदेशात सोयाबीन मळणीला...जळगाव : खानदेशातील धुळे, नंदुरबार व जळगाव...
माळेगावकरांचा औद्योगिक वसाहतीच्या...नाशिक : माळेगाव औद्योगिक वसाहतीच्या टप्पा क्रमांक...
परभणीत व्यापाऱ्यांचे असहकार आंदोलन सुरूचपरभणी ः परभणी कृषी उत्पन्न बाजार समितीअंतर्गत...
सांगली जिल्ह्यात द्राक्ष क्षेत्रात वाढसांगली  ः दर्जेदार द्राक्ष उत्पादनासाठी...