agriculture news in marathi, Tree credits option from the forest department | Agrowon

वन विभागाच्या कार्यउद्दिष्टात ट्री क्रेडिट, ईकाे टुरिझम
टीम अॅग्रोवन
मंगळवार, 28 नोव्हेंबर 2017

पुणे : वनविभागाचे २०१७-१८ च्या कार्यउद्दिष्टात (केआरए) आगामी पावसाळ्यात ४ काेटी वृक्ष लागवड बराेबरच, कार्बन क्रेडिटच्या धर्तीवर ट्री क्रेडिट याेजनेचा समावेशदेखील करण्यात आला आहे. यामुळे पुढील वर्षी ट्री क्रेडिट योजना सुरू हाेण्याची दाट शक्यता निर्माण झाली आहे.

या याेजनेमध्ये वनक्षेत्राबराेबर वृक्षलागवडीतून शेतकऱ्यांना उत्पन्नाचा शाश्‍वत स्र ाेत उपलब्ध करून देण्यात येणार आहे. अखिल भारतीय सेवा (कार्यमूल्यांकन अहवाल) नियमावलीनुसार भारतीय वनसेवा अधिकाऱ्यांच्या कार्यमूल्यांकनासाठी वर्षाच्या सुरवातीस संबंधित अधिकाऱ्यांसाठी उद्दिष्ट्ये (केआरए) ठरवून दिली जातात.

पुणे : वनविभागाचे २०१७-१८ च्या कार्यउद्दिष्टात (केआरए) आगामी पावसाळ्यात ४ काेटी वृक्ष लागवड बराेबरच, कार्बन क्रेडिटच्या धर्तीवर ट्री क्रेडिट याेजनेचा समावेशदेखील करण्यात आला आहे. यामुळे पुढील वर्षी ट्री क्रेडिट योजना सुरू हाेण्याची दाट शक्यता निर्माण झाली आहे.

या याेजनेमध्ये वनक्षेत्राबराेबर वृक्षलागवडीतून शेतकऱ्यांना उत्पन्नाचा शाश्‍वत स्र ाेत उपलब्ध करून देण्यात येणार आहे. अखिल भारतीय सेवा (कार्यमूल्यांकन अहवाल) नियमावलीनुसार भारतीय वनसेवा अधिकाऱ्यांच्या कार्यमूल्यांकनासाठी वर्षाच्या सुरवातीस संबंधित अधिकाऱ्यांसाठी उद्दिष्ट्ये (केआरए) ठरवून दिली जातात.

त्याअंतर्गत वर्ष २०१७-१८ साठीचा ‘केआरए’ निश्चित केला आहे. मात्र २०१७ वर्ष संपत आल्यानंतर केआरए निश्‍चित करण्यात आले असून, उर्वरित चार महिन्यांत केआरए पूर्ण हाेणार का, याबाबत प्रश्‍न उपस्थित हाेत आहे.

विविध केआरएंमध्ये या आर्थिक वर्षात राज्यात ४० हजार हेक्टर जागेवर चार कोटी वृक्षांची लागवड करण्याचे ध्येय ठेवले आहे. ग्रामीण भागातील वृक्षताेडीला आळा घालण्यासाठी वनक्षेत्रात राहणाऱ्या १० हजार कुटुंबांना एलपीजी गॅस उपलब्ध करून देण्यात येणार आहे. वनालगत असणाऱ्या ग्रामस्थांना पूरक उद्याेगासाठी वनपर्यटनाला चालना देण्यासाठी ईकाे टुरिझम धोरणाची अंमलबजावणी करणे, यासाठीही प्रयत्न केले जाणार आहेत.

श्यामाप्रसाद मुखर्जी जन वनविकास योजनेअंतर्गत राज्यातील १०० गावांच्या निवडीतून परिसरातील वनक्षेत्राचा विकास करण्यात येणार आहे. तर विविध अभयारण्यातील ५० गावे दत्तक घेतली जाणार आहेत. आगामी २०१८-१९ या वर्षात वृक्षरोपणासाठी २० कोटी बियाणांची निर्मिती केली जाणार आहे. संरक्षित वनक्षेत्रातील चार गावांचे अन्य पुनवर्सन केले जाणार आहे. राज्यात वृक्षाराेपण आणि त्यांच्या संरक्षणासाठी ‘ग्रीन आर्मी‘ स्थापन करण्यात येणार असून, त्या माध्यमातून एक कोटी स्वयंसेवकांची नाेंदणी केली जाणार आहे.

रानमेवा विक्री केंद्र सुरू करणार
वनक्षेत्रातील विविध रानमेवा, बांबूपासून केल्या जाणाऱ्या विविध वस्तूंप्रमाणे अनेक उत्पादने घेतली जातात. या उत्पादनांना बाजारपेठ मिळवून देण्याच्या उद्देशाने वन व महसूल विभागाच्या प्रत्येक विभागात वन-धन योजनेंतर्गत एक विक्री केंद्र सुरू करण्याचे उद्दिष्ट ठेवण्यात आले आहे.

इतर बातम्या
महाबळेश्वरमध्ये हिमकणांची चादरमहाबळेश्वर, जि. सातारा  ः राज्यात सर्वत्र...
जलयुक्तमधील 'सुरूंग' कामाला पोलिस...पुणे : जलयुक्त शिवाराचा निधी गडप करण्यासाठी कृषी...
बोंडअळीग्रस्त, धान उत्पादकांना संयुक्त...मुंबई : राज्यात गुलाबी बोंडअळी आणि धान...
लाळ्या खुरकूत लस पुरवठा विलंबाच्‍या...पुणे  ः लाळ्या खुरकूत लसींच्या पुरवठ्याच्या...
कोरडे, उष्ण हवामान राहून तापमानाची...महाराष्ट्रासह दक्षिण, मध्य, उत्तर व ईशान्य...
नेदरलॅंडमध्ये साठवण, निर्यातीसाठी खास...वातावरणातील बदल लक्षात घेता कांदा पिकांच्या नव्या...
मंत्रालयासमोर शेतकऱ्याचा आत्मदहनाचा...मुंबई : धुळे जिल्ह्यातील शेतकरी धर्मा पाटील...
राळेगणसिद्धीत अण्णा हजारे यांच्या...नगर : शेतमालाला दर मिळण्यासह अन्य...
‘एल निनो’चा यंदा माॅन्सूनला धोका नाहीपुणे ः प्रशांत महासागरातील ‘एल निनो’ सप्टेंबर...
मागासवर्गीय तरुणांना उद्योगासाठी कर्जमुंबई  : मागासवर्गीय बेरोजगार तरुणांना...
चाऱ्याचा होतोय कोळसाअकोला ः अत्यल्प पाऊस, विदर्भ, मराठवाड्यातील कोरडे...
हमीभाव खरेदी केंद्रांवर हमालीच्या...अकोला : अाधारभूत किमतीने सुरू असलेल्या तूर...
मध्य महाराष्ट्र, काेकणात हलक्या पावसाचा...पुणे : पावसाला पोषक हवामान होत असल्याने...
भारत हवामान बदलाला सर्वांत संवेदनशीललंडन ः भारत हा जागातील सर्वांत जास्त हवामान...
‘अविश्वास’ला विश्वास ठरावाने उत्तरमुंबई : विधानसभा अध्यक्ष हरिभाऊ बागडे...
सरकारने लोकशाहीचा खून केला : विरोधकांचा...मुंबई : विधानसभा अध्यक्षांविरोधात प्रस्ताव दाखल...
पुणे जिल्ह्यात होणार दोन हजार ९६ पीक... पुणे   ः रब्बी हंगामातील पिकांची...
पुणे जिल्ह्यात ११ हजार कांदा चाळींची...पुणे  ः कांद्याचे अधिक उत्पादन झाल्यास...
लोकपाल, हमीभावासाठी अण्णांचा रामलीलावर...नवी दिल्ली : लोकसभा निवडणुकीत आश्वासन देऊनही मोदी...
तेवीस कारखान्यांकडून ७७ लाख ६३ हजार टन... औरंगाबाद  : मराठवाडा व खानदेशातील पाच...