agriculture news in marathi, tree plantation scheme start in nagar district, maharashtra | Agrowon

लावलेली झाडे जोपासण्यात नगर राज्यात पुढे : प्रा. शिंदे
टीम अॅग्रोवन
सोमवार, 2 जुलै 2018

नगर  : राज्यभर वृक्षारोपण केले जात आहे. त्यामुळे राज्य वृक्षारोपणात आदर्श निर्माण करत आहे. झाडे असली तर पाऊस होतो हा निसर्गाचा नियम आहे. त्यामुळे नागरिकांनी वृक्षारोपणात सहभाग घ्यावा. नगर जिल्हा लावलेली झाडे जोपासण्यात राज्यात पुढे आहे, असे प्रतिपादन पालकमंत्री प्रा. राम शिंदे यांनी केले.

नगर  : राज्यभर वृक्षारोपण केले जात आहे. त्यामुळे राज्य वृक्षारोपणात आदर्श निर्माण करत आहे. झाडे असली तर पाऊस होतो हा निसर्गाचा नियम आहे. त्यामुळे नागरिकांनी वृक्षारोपणात सहभाग घ्यावा. नगर जिल्हा लावलेली झाडे जोपासण्यात राज्यात पुढे आहे, असे प्रतिपादन पालकमंत्री प्रा. राम शिंदे यांनी केले.

वडगाव सावताळ (ता. पारनेर) येथे रविवारी (ता. १) पालकमंत्री प्रा. राम शिंदे यांच्या हस्ते वृक्षारोपण करून वृक्षलागवड मोहिमेला प्रारंभ झाला. जिल्हाधिकारी राहुल द्विवेदी, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी विश्वजीत माने, उपवन संरक्षक आदर्श रेड्डी, आदर्श गाव प्रकल्प व संकल्प समितीचे कार्याध्यक्ष पोपटराव पवार, उपमुख्य कार्यकारी अधिकारी प्रशांत शिर्के, सामाजिक वनीकरण विभागाच्या किर्ती जमदाडे, तहसीलदार भारती सागरे, विश्वनाथ कोरडे, वसंत चेडे, सरपंच छाया शिंदे, संजय रोकडे यावेळी उपस्थित होते.

प्रा. शिंदे म्हणाले, की वृक्षलागवड मोहिमेतून नगर जिल्ह्यात ५० लाख ५७ हजार झाडे लावली जाणार आहेत. एक वर्षापासून त्याचे नियोजन केले. ५९ रोपवाटिकांतून रोपे निर्मिती केली आहेत. दुष्काळाचा फेरा टाळण्यासाठी प्रत्येकाने वृक्षलागवड करून त्याची जोपासना करावी. जलयुक्त शिवार अभियानामुळे जिल्हा टॅंकर मुक्तीकडे वाटचाल करत आहे. जिल्ह्यातील विकास कामासाठी निधी भरभरून देतो आहोत. त्यामुळे जिल्हा विकासात आघाडीवर आहे.

राज्य सरकारने चार वर्षांपासून सुरू केलेली जलयुक्त शिवार अभियान ही योजना आता राज्यातील जलसंधारणाला बळकटी देणारी आहे. जेथे माथा आणि पायथ्यावर वन असेल तेथेच पाणी असते. त्यामुळे वृक्षलागवड आणि लावलेली झाडे जोपासणे गरजेचे आहे, असे पोपटराव पवार यांनी सांगितले. राज्यात सुमारे बारा हजार वन समित्या सक्रिय असल्याचे त्यांनी सांगितले.

इतर ताज्या घडामोडी
सरकारच्या ताफ्यात एक हजार इलेक्‍ट्रिक...मुंबई - राज्य सरकारच्या ताफ्यात एक हजार इलेक्‍...
पाचल ठरले स्मार्ट ग्रामरत्नागिरी - शासनाच्या स्मार्ट ग्राम...
पंचगंगा प्रदूषणप्रश्‍नी आयुक्तांना नोटीसकोल्हापूर - जयंती नाल्याचे सांडपाणी थेट...
पदोन्नतीत आरक्षणाचा मार्ग मोकळा;...नवी दिल्ली- अनुसुचित जाती जमातीच्या कर्मचाऱ्यांना...
मुलींना बारावीपर्यंत एसटीचा मोफत पासमुंबई - एसटी महामंडळामार्फत ग्रामीण भागातील...
असा होईल गोकुळ दूध संघ ‘मल्टिस्टेट'कोल्हापूर - जिल्हा सहकारी दूध उत्पादक सहकारी...
वयाच्या 86 वर्षीही सक्रीय राजकारणात डॉ...नवी दिल्ली - देशाचे माजी पंतप्रधान डॉ. मनमोहन...
ड्रोनमुळे कृषी क्षेत्रात क्रांती घडेल...लातूर : वेगवेगळ्या कारणामुळे कृषी क्षेत्र...
लागवड लसूणघासाची...लागवडीसाठी मध्यम ते भारी, चांगला निचरा होणारी,...
जळगाव बाजार समितीत चवळी प्रतिक्विंटल...जळगाव ः येथील कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये...
जलयुक्त शिवारातील जलसंचय सुद्धा आटलाजळगाव : जिल्ह्यात झालेल्या जलयुक्त शिवारच्या...
‘स्वाभिमानी’ची २७ ऑक्‍टोबरला जयसिंगपूर...कोल्हापूर  : यंदाच्या हंगामात ऊस उत्पादकांना...
इंधन दरवाढीच्या निषेधार्थ नगर येथे...नगर  : ``राफेल विमान खरेदीत एक हजार कोटींचा...
तूर, हरभऱ्याच्या चुकाऱ्यासाठी परभणी...परभणी  ः आधारभूत किंमत खरेदी योजनेअंतर्गत...
साताऱ्यातील सोयाबीन उत्पादक...सातारा  ः जिल्ह्यात सोयाबीनची काढणी सुरू...
पुणे विभागात पाणीटंचाई वाढलीपुणे  : पावसाने दडी मारल्याने पुणे विभागात...
पाऊस नसल्याने नगर जिल्ह्यात ऊस लागवडीवर...नगर   ः जिल्ह्यात यंदा आतापर्यंत ३३ हजार १२३...
वऱ्हाडात उडीद, मुगासाठी खरेदी केंद्रे...अकोला  ः या भागात सध्या मूग, उडदाचा हंगाम...
जळगाव जिल्ह्यात नवती केळीचे दर स्थिरजळगाव ः जिल्ह्यात नवती केळीचे दर मागील आठवड्यात...
कोल्हापुरात फळांची आवक मंदावली,...कोल्हापूर : येथील कृषी उत्पन्न बाजार समितीत या...