agriculture news in marathi, Tree planting should be a folk force: Deshmukh, Deshmukh | Agrowon

वृक्ष लागवड ही लोकचळवळ व्हावी : सहकारमंत्री देशमुख
टीम अॅग्रोवन
मंगळवार, 3 जुलै 2018

सोलापूर  : पर्यावरणाचा समतोल रहावा, वनाच्छादीत क्षेत्रात वाढ होऊन हरित महाराष्ट्र घडावा, यासाठी यावर्षी १३ कोटी वृक्ष लागवडीचा कार्यक्रम राज्य शासनाने हाती घेतला आहे. लोकांनी स्वयंप्रेरणेने व उत्सफूर्तपणे त्यामध्ये सहभागी व्हावे. हे अभियान एक लोकचळवळ व्हावी, असे मत सहकारमंत्री सुभाष देशमुख यांनी व्यक्त केले.

सोलापूर  : पर्यावरणाचा समतोल रहावा, वनाच्छादीत क्षेत्रात वाढ होऊन हरित महाराष्ट्र घडावा, यासाठी यावर्षी १३ कोटी वृक्ष लागवडीचा कार्यक्रम राज्य शासनाने हाती घेतला आहे. लोकांनी स्वयंप्रेरणेने व उत्सफूर्तपणे त्यामध्ये सहभागी व्हावे. हे अभियान एक लोकचळवळ व्हावी, असे मत सहकारमंत्री सुभाष देशमुख यांनी व्यक्त केले.

राज्य शासनाने यंदा १ ते ३१ जुलै २०१८ या कालावधीत राज्यात १३ कोटी वृक्ष लागवड करण्याचा निर्धार केला आहे. यानिमित्ताने आज दक्षिण सोलापूर तालुक्‍यातील माळकवठे येथे वन व सामाजिक वनीकरण विभागामार्फत वृक्ष लागवडीची सुरवात देशमुख यांच्या हस्ते झाली. या वेळी उपवनसंरक्षक संजय माळी, कृषी उपसंचालक रवींद्र माने, विभागीय वन अधिकारी सुवर्णा माने, माळकवठेचे सरपंच शिवलिंग बगले यांच्यासह ग्रामस्थ, शालेय विद्यार्थी आणि वन व सामाजिक वनीकरणाचे अधिकारी, कर्मचारी उपस्थित होते.

देशमुख म्हणाले, "पर्यावरणाचा होत असलेला ऱ्हास, वनांची घटती संख्या चिंतेची बाब आहे. यावर प्रभावी उपाय म्हणून राज्य शासनातर्फे राज्यात ५० कोटी वृक्षलागवड होणार आहे. यामध्ये मागीलवर्षी ४ कोटी वृक्षलागवड झाली. यंंदा १३ कोटी आणि पुढील वर्षी ३३ कोटी वृक्षलागवड होईल. लागवड केलेल्या वृक्षांचे जतन संगोपन करणे महत्त्वाचे आहे. शासनाने शेतकऱ्यांच्या शेतात, बांधावर वृक्षलागवड करण्यासाठी महात्मा गांधी रोजगार हमी योजनेंतर्गत ( एमआरईजीएस ) नवीन योजना आणली आहे. "

इतर ताज्या घडामोडी
बंद अवस्थेतील कारखाने सहकारी तत्त्वावर...जळगाव : जिल्ह्यात काही साखर कारखाने एकेकाळी जोमात...
कांदा - लसूण पीक सल्लाबहुतांश शेतकऱ्यांच्या शेतामध्ये खरीप कांदा पिकाची...
नांदेड जिल्ह्यात ५१० कोटी रुपये पीक...नांदेड ः नांदेड जिल्ह्यात यंदाच्या खरीप हंगामात...
राष्ट्रीय महामार्गाचे चौपदरीकरण...जळगाव : जळगाव आणि धुळे जिल्ह्यांतून जाणाऱ्या...
अंजनीसह पाच गावांची पाण्याविना आबाळसांगली ः तासगाव तालुक्‍याचा पूर्वभागात भीषण...
सोलापुरात दुष्काळ जाहीर करण्याची मागणीसोलापूर : सोलापूर जिल्ह्यात अद्यापही दमदार पाऊस...
गोंदिया जिल्ह्यात गणेशोत्सवाद्वारे शेती...गोंदिया :गणेशोत्सवाच्या माध्यमातून कृषी...
सातारा जिल्ह्यात स्ट्रॉबेरी लागवडीस...सातारा   ः राज्यभरात गोडव्यासाठी प्रसिद्ध...
सोलापूर जिल्ह्यावर दुष्काळ अन हुमणीचे...सोलापूर   ः जिल्ह्यात यंदाच्या हंगामात...
पीकविमा योजनेतून कंपन्यांचे भले ः विखे...पुणे   ः शेतकऱ्यांच्या पिकांना संरक्षण...
कृषी सल्ला : ऊस, कापूस, सोयाबीन, मका,...ऊस हुमणी किडीच्या नियंत्रणासाठी, फिप्रोनील (०.३...
अार्थिक व्यवस्थापनात राज्य सरकार अपयशी...मुंबई  : काँग्रेसच्या कार्यकाळात राज्याची...
कृषी सल्ला : भात, नागली, आंबा, नारळ,...भात  अवस्था ः पोटरी ते लोंबी बाहेर...
अकोल्यात मूग प्रतिक्विंटल ३८०० ते ५३००...अकोला ः या हंगामात लागवड झालेल्या मुगाची काढणी...
सोयाबीन, मूग, उडदासाठी १९ खरेदी केंद्रे...नगर ः शेतकऱ्यांचा शेतमाल हमीदराने खरेदी करता यावा...
शेतीमाल तारण योजनेत शेतकरी उत्पादक...कोल्हापूर : राज्यात शेतीमाल तारण योजना बाजार...
जळगावात आले २५०० ते ६००० रुपये...जळगाव ः येथील कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये...
सिंदखेडराजा दुष्काळग्रस्त जाहीर कराअकोला : जिल्ह्यात या मोसमात तेल्हारा व अकोट या...
खान्देशातील धरणांत अल्प पाणीसाठा जळगाव : खान्‍देशातील तापी व पांझरा नदीवरील...
कोल्हापूरात धरणे भरली; नद्यांची...कोल्हापूर : केवळ पंधरा दिवसांतच जिल्ह्यातील...