agriculture news in Marathi, Trible farmer agitation for demands, Maharashtra | Agrowon

आमू आखा एक से...
टीम अॅग्रोवन
शुक्रवार, 9 फेब्रुवारी 2018

जळगाव  ः आमू आखा एक से..., जंगल जमीन कुणीन छे, आमीन छे, आमीन छे... अशा घोषणांनी शहर गुरुवारी (ता. ८) दणाणून सोडले. निमित्त होते आदिवासी वांधवांच्या वनहक्क कायद्यासंबंधी लोकसंघर्ष मोर्चातर्फे काढण्यात आलेल्या मोर्चाचे...

दुपारी शहरातील डॉ. श्‍यामाप्रसाद मुखर्जी उद्यानाजवळून हा मोर्चा काढण्यात आला. नेतृत्व लोकसंघर्ष मोर्चाच्या प्रतिभा शिंदे यांनी केले. मोर्चात यावल, चोपडा, रावेर, मुक्ताईनगर, चाळीसगाव इतर भागांतील आदिवासी बांधवांसह आंबेडकरी चळवळीचे कार्यकर्ते, पदाधिकारी मोठ्या संख्येने सहभागी झाले. अतिशय शिस्तीने हा मोर्चा निघाला. 

जळगाव  ः आमू आखा एक से..., जंगल जमीन कुणीन छे, आमीन छे, आमीन छे... अशा घोषणांनी शहर गुरुवारी (ता. ८) दणाणून सोडले. निमित्त होते आदिवासी वांधवांच्या वनहक्क कायद्यासंबंधी लोकसंघर्ष मोर्चातर्फे काढण्यात आलेल्या मोर्चाचे...

दुपारी शहरातील डॉ. श्‍यामाप्रसाद मुखर्जी उद्यानाजवळून हा मोर्चा काढण्यात आला. नेतृत्व लोकसंघर्ष मोर्चाच्या प्रतिभा शिंदे यांनी केले. मोर्चात यावल, चोपडा, रावेर, मुक्ताईनगर, चाळीसगाव इतर भागांतील आदिवासी बांधवांसह आंबेडकरी चळवळीचे कार्यकर्ते, पदाधिकारी मोठ्या संख्येने सहभागी झाले. अतिशय शिस्तीने हा मोर्चा निघाला. 

हा मोर्चा रल्वे स्टेशन परिसरातील डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचा पुतळा, नेहरू चौक, टॉवर चौक, चित्रा चौक, व. वा. व्यापारी संकुल परिसर पुढे छत्रपती शिवाजी महाराज पुतळा, स्वातंत्र्य चौक असा फिरला. पुढे जिल्हाधिकारी कार्यालयात मोर्चाचा समारोप झाला. मोर्चाच्या अग्रभागी लाल बावटाचे झेंडेधारक आदिवासी शेतकरी सहभागी झाले. वनजमिनी आमचा हक्क, आमू आखा एक से..., अशा घोषणा या झेंड्यावर लिहिल्या होत्या. मोर्चात प्रकाश बारेला, भरत बारेला, फिरोज तडवी, सोमनाथ माळी, केशव वाघ, चंद्रकांत चौधरी, पन्नालाल मावळे, श्‍याम फुलगावकर, धर्मा बारेला, फईम पटेल, खुशाल अप्पा, मुकुंद सपकाळे, संजय महाजन आदी सहभागी झाले.

जिल्हा प्रशासनाला मागण्यांचे सविस्तर निवेदन देण्यात आले. त्यात आदिवासी बांधव पिढ्यान्‌पिढ्या ज्या जमिनी कसत आहेत, त्या त्यांना मिळाव्यात यासाठी तत्कालीन आघाडी सरकारने वनहक्क कायदा आणला. परंतु जळगाव जिल्ह्यातील अनेक आदिवासी बांधवांना आपल्या जमिनी मिळालेल्या नाहीत. सामुदायिक वनहक्कांबाबत प्रशासकीय पातळीवरच स्पष्टता नाही. जे १७७३ वनदावे प्रशासनाने मान्य केले, त्यातील दावेदाराने मागणी केलेले क्षेत्र व प्रत्यक्ष मंजूर क्षेत्र यात मोठी तफावत आहे.

वन विभाग संबंधित वनक्षेत्राचे अभिलेखे उपलब्ध करून देत नाही. अनेक दावे पुरावे सादर केलेले असताना फेटाळले. एकपेक्षा अधिक पुरावे असलेल्या दावेदारांचे दावे गावपातळीवरील पुनर्पडताळणी समितीकडे न सोपविता प्रशासनाने थेट आपल्याकडे मागवून घ्यावेत आदी मागण्या करण्यात आल्या. चाळीसगाव, बोदवड आदी ठिकाणी वनाधिकार समिती कायद्यानुसार गठित केलेली नाही आदी अनेक मागण्या करण्यात आल्या.

 

इतर अॅग्रो विशेष
अकोला जिल्हा प्रशासन शेतकऱ्यांना देणार...अकोला ः देशात राबवल्या जात असलेल्या प्रधानमंत्री...
दक्षिण महाराष्ट्रातील कारखान्यांत ८०...सांगली/कोल्हापूर ः साखरेला दर नसल्याने निराश...
सीताफळाच्या योग्य जातींची करा लागवडमहाराष्ट्रात सीताफळाच्या झाडांचे काही नैसर्गिक...
उत्पादकांसाठी बेदाणा गोडसांगली ः यंदाच्या बेदाणा हंगामात बेदाण्याच्या...
केळी दरात किंचित सुधारणाजळगाव ः रावेर, यावलमध्ये केळीची आवक वाढलेली...
मका चार वर्षांतील नीचांकी पातळीवरनवी दिल्ली ः बजारात मका आवक वाढल्यांतर मागणी कमी...
कामाच्या अतिरिक्त ताणामुळे पणन संचालक...पुणे ः पणन संचालकपदी पूर्णवेळ नियुक्ती असताना...
​​राज्य सरकार राबविणार मधुमक्षिका मित्र...पुणे : शहरी भागात मधुमक्षिकांचे पोळे दिसले, की ते...
ग्रामस्वच्छता अभियानात प्रभाग, गटातून...नगर ः ग्रामीण भागात स्वच्छतेची व्यापी...
केसर आंबा पाडाला आलाय...औरंगाबाद : आपली चव, गंध आणि रूपाने ग्राहकांना...
बदल्या समुपदेशनानेच...पुणे : राज्याच्या कृषी विभागात समुपदेशनाने बदल्या...
अरबी समुद्रात चक्रीवादळाचे संकेतपुणे : ‘सागर’ चक्रीवादळापाठोपाठ अरबी समुद्रात...
पाणलोट, मृदसंधारण घोटाळ्याचा पर्दाफाशपुणे : कृषी खात्यातील पाणलोट व मृदसंधारण...
ब्राझील, थायलंडचा यंदा इथेनॉलकडे वाढता...कोल्हापूर : आंतरराष्ट्रीय बाजारात सर्वत्रच...
बारमाही भाजीपाला शेतीला नर्सरी...ब्राह्मणगाव (जि. नाशिक) येथील केवळ वाघ पूर्वी...
सुधारित तंत्राची मिळाली गुरुकिल्लीअकोला जिल्ह्याचे मुख्य उन्हाळी पीक कांद्याची...
भाराभर चिंध्या राज्यात १२७ वा पशुसंवर्धन दिन नुकताच साजरा...
मथुरेचं दूध का नासलं?राज्यात मे महिन्याचे तापमान यंदा नैसर्गिक आणि...
चिमुरड्याच्या कॅमेऱ्यात कैद आनंदी शेतकरीआपल्याकडील शेतकरी आनंदी असू शकतो का? उत्तर...
‘अ’तंत्र निकेतनपुरेसा अभ्यास आणि तयारीअभावी, यंत्रणेचा विरोध...