agriculture news in Marathi, trible farmers agitation countinue at second day, Maharashtra | Agrowon

आदिवासी बांधवांचे दुसऱ्या दिवशीही आंदोलन सुरूच
टीम अॅग्रोवन
शनिवार, 10 फेब्रुवारी 2018

जळगाव  ः जिल्हाधिकारी किशोर राजेनिंबाळकर यांनी मोर्चेकऱ्यांमध्ये रस्त्यावर येऊन निवेदन स्वीकारण्यास नकार दिल्याने आदिवासी बांधवांनी शुक्रवारीही (ता. ९) जिल्हाधिकारी कार्यालयासमोर जोरदार घोषणाबाजी करून आंदोलन केले. 

जळगाव  ः जिल्हाधिकारी किशोर राजेनिंबाळकर यांनी मोर्चेकऱ्यांमध्ये रस्त्यावर येऊन निवेदन स्वीकारण्यास नकार दिल्याने आदिवासी बांधवांनी शुक्रवारीही (ता. ९) जिल्हाधिकारी कार्यालयासमोर जोरदार घोषणाबाजी करून आंदोलन केले. 

आदिवासी बांधवांचा प्रचंड जनसमुदाय जिल्हाधिकारी कार्यालयासमोर ठिय्या मांडून बसला होता. लोकसंघर्ष मोर्चाच्या नेतृत्वामध्ये गुरुवारी शहरातील श्‍यामाप्रसाद मुखर्जी उद्यानापासून वनहक्क कायद्यासंबंधी मोर्चा काढण्यात आला होता. त्यात सुमारे दोन हजार आदिवासी बांधव, महिला सहभागी झाले. हा मोर्चा गुरुवारी दुपारी जिल्हाधिकारी कार्यालयानजीक पोचल्यानंतर मोर्चेकऱ्यांनी जिल्हाधिकारी जोपर्यंत आपल्याकडे रस्त्यावर येऊन निवेदन स्वीकारत नाहीत, तोपर्यंत हे आंदोलन सुरूच राहील, अशी ठाम भूमिका मांडली.

जिल्हाधिकारी गुरुवारी सायंकाळपर्यंत कुठल्याशा कामानिमित्त कार्यालयाबाहेर होते. ते सायंकाळी कार्यालयात परतले. परंतु शिष्टाचार मोडून मोर्चेकऱ्यांमध्ये निवेदन स्वीकारायला जिल्हाधिकारी राजेनिंबाळकर गेले नाहीत. रात्री ९.४५ वाजेपर्यंत जिल्हाधिकारी कार्यालयात निवेदन स्वीकारायला बसले होते. त्यांच्यासोबत जिल्हा परिदेचे अतिरिक्त सीईओ संजय मस्कर, वन विभागाचे अधिकारी आदी होते; पण जिल्हाधिकारी निवेदन स्वीकारायला आपल्याकडे न आल्याने मुख्य रस्त्यावर मोर्चेकऱ्यांनी जिल्हाधिकारी कार्यालयासमोरील ठिय्या मांडला.

गुरुवारी रात्रभर अनेक मोर्चेकरी कार्यालयाबाहेर बसून होते. नंतर शुक्रवारीही हे आंदोलन सुरूच राहिले. मोर्चेकरी मुख्य रस्त्यावर बसल्याने वाहतूक जवळपास बंद झाली. वातावरण तणावाचे बनले. मोर्चेकऱ्यांनी लढेंगे, जितेंगे..., आमू आखा एक से..., अशी घोषणाबाजी केली. जिल्हाधिकारी कार्यालयाच्या मुख्य प्रवेशद्वारांनजीक पोलिस बळ नियुक्त करण्यात आले होते. तसेच बॅरिकेड्स लावून मोर्चेकऱ्यांना जिल्हाधिकारी कार्यालयात येण्यापासून रोखण्यात आले.

या सगळ्या वातावरणात गोंधळ आणि लोटालोटीही सुरू झाली. दुपारपर्यंत अशी स्थिती होती. मोर्चात लोकसंघर्ष मोर्चाच्या प्रतिभा शिंदे, मुकुंद सपकाळे, सचिन धांडे, चंद्रकांत चौधरी आदी सहभागी झाले होते.

इतर अॅग्रो विशेष
जलदगती मार्गाने निर्जलपर्वाकडे...‘‘पाण्याची उपलब्धता कमी होत जाणे हे हवामान बदलाचे...
पुढचं पाऊलप्र बोधन आणि संघर्षाच्या माध्यमातून गेली चौदा...
नोकरशहांच्या दुर्लक्षामुळे जल...राज्यात दुष्काळग्रस्त गावे वाढत असून, जलाशयांची...
ठिबक सिंचनातील आधुनिक तंत्रज्ञान : अरुण...राज्यात लागवडीखालील २२५ लाख हेक्टर क्षेत्रांपैकी...
परंपरागत जल व्यवस्थांचा संपन्न वारसा :...परंपरागत जल व्यवस्थांमधून घेण्याजोग्या आणि आजही...
कोरडवाहूचे जल व्यवस्थापन : चिपळूणकर,...पाण्याचे व्यवस्थापन हे केवळ बागायती पिकांसाठी...
फड पद्धतीमुळे झाला कायापालट : दत्ता...फड या जल व्यवस्थापन पद्धतीचे तंत्र अगदी सोपे आहे...
समन्यायी जल व्यवस्थापनाला पर्याय नाही...लोकशाहीकरण वा पुनर्संजीवक विकास ही फुकाफुकी...
डोळ्यांत अंजन घालणारी नागलीची कहाणी :...योग्य पीकपद्धती विकसित केली नाही तर जल व्यवस्थापन...
जल व्यवस्थापनाची सप्तपदी : नागेश टेकाळेनिसर्गदेवतेने दिलेला जलरूपी प्रसाद आज आपण तिने...
जल व्यवस्थापन हाच कळीचा मुद्दा... :...पर्यावरणातील बदल, दुष्काळ, मातीचे बिघडणारे आरोग्य...
जल व्यवस्थापनासाठी हवी लोकचळवळलक्षावधी हेक्टर जमीन, हजारो टीएमसी पाणी आणि...
चैत्र यात्रेनिमित्त भाविकांनी दुमदुमला...ज्योतिबा डोंगर, जि. कोल्हापूर  : ‘...
विदर्भात वादळी पावसाची शक्यतापुणे : पूर्वमोसमी पावसाच्या सरींमुळे...
‘ॲग्रोवन'चा आज १४वा वर्धापन दिन; जल...पुणे : लाखो शेतकऱ्यांच्या कुटुंबातील घटक बनलेल्या...
यंदा बीटी कापूस बियाणे मुबलक : कृषी...पुणे : राज्याच्या कापूस उत्पादक भागातील...
फलोत्पादन अनुदान अर्जासाठी शेवटचे चार...पुणे : एकात्मिक फलोत्पादन अभियानातून (एमआयडीएच)...
वीज पडून जाणारे जीव वाचवामागील जूनपासून सुरू झालेला नैसर्गिक आपत्तींचा कहर...
जल व्यवस्थापनाच्या रम्य आठवणीजलव्यवस्थापनाचे धडे घेण्यासाठी कुठलेही पुस्तक...
कापूस उत्पादकतेत भारताची पीछेहाटजळगाव ः जगात कापूस लागवडीत पहिल्या क्रमांकावर...