agriculture news in marathi, Tricolor clashes for Karmala Bazar committee | Agrowon

करमाळा बाजार समितीसाठी अखेर तिरंगी लढत
टीम अॅग्रोवन
रविवार, 2 सप्टेंबर 2018

सोलापूर : करमाळा कृषी उत्पन्न बाजार समितीच्या निवडणुकीच्या १८ जागांपैकी तीन जागा यापूर्वीच बिनविरोध झाल्या आहेत. आता उर्वरित १५ जागांसाठी ४४ उमेदवार निवडणूक रिंगणात उतरले आहेत. आमदार नारायण पाटील आणि माजी आमदार जयवंतराव जगताप या दोघांचे एक, माजी आमदार श्यामलताई बागल यांचे स्वतंत्र, तर जिल्हा परिषदेचे अध्यक्ष संजय शिंदे यांनी भाजपशी हातमिळवणी करत स्वतःचे पॅनेल या निवडणुकीत उभे केले आहे. त्यामुळे बाजार समितीसाठी अपेक्षेप्रमाणे या तीन पॅनेलमध्ये तिरंगी लढत रंगणार आहे. या निवडणुकीसाठीही पहिल्यांदाच शेतकरी मतदान करणार आहेत.

सोलापूर : करमाळा कृषी उत्पन्न बाजार समितीच्या निवडणुकीच्या १८ जागांपैकी तीन जागा यापूर्वीच बिनविरोध झाल्या आहेत. आता उर्वरित १५ जागांसाठी ४४ उमेदवार निवडणूक रिंगणात उतरले आहेत. आमदार नारायण पाटील आणि माजी आमदार जयवंतराव जगताप या दोघांचे एक, माजी आमदार श्यामलताई बागल यांचे स्वतंत्र, तर जिल्हा परिषदेचे अध्यक्ष संजय शिंदे यांनी भाजपशी हातमिळवणी करत स्वतःचे पॅनेल या निवडणुकीत उभे केले आहे. त्यामुळे बाजार समितीसाठी अपेक्षेप्रमाणे या तीन पॅनेलमध्ये तिरंगी लढत रंगणार आहे. या निवडणुकीसाठीही पहिल्यांदाच शेतकरी मतदान करणार आहेत. त्यामुळे कोणाच्या पारड्यात ही मते पडणार, याकडे सर्वांच लक्ष लागले आहे.

व्यापारी मतदारसंघातून विजय गुगळे, मयूर दोशी आणि हमाल-तोलार मतदारसंघातून वासुदेव रोडगे असे तिघे यापूर्वीच बिनविरोध निवडून आले आहेत. आता १५ जागांसाठी ही लढत होत आहे. पैकी एक मतदारसंघ वगळता सगळीकडे तिरंगी सामना होणार आहे. बाजार समितीत माजी आमदार जयवंतराव जगताप यांची सत्ता आहे. आमदार नारायण पाटील हे पहिल्यापासून जगताप यांच्या पाठीशी ठाम आहेत. आमदार नारायण पाटील-माजी आमदार जयवंतराव जगताप यांची युती झाल्याने त्यावर शिक्कामोर्तब झाले आहे.

बागल गट स्वतंत्र लढत असून जिल्हा परिषद अध्यक्ष संजय शिंदे गटाने भाजपला बरोबर घेतले आहे. शिंदे गटाने भाजपला अवघ्या दोन जागा दिल्या आहेत. बाजार समितीचे विद्यमान सभापती जयवंतराव जगताप हे वांगी व केम मतदारसंघातून तर "मकाई''चे अध्यक्ष दिग्विजय बागल पोथरे गणातून निवडणूक लढवत आहेत. त्यांच्या विरोधात जयवंतराव जगताप यांचे चिरंजीव शंभुराजे जगताप मैदानात आहेत. वांगी गणात शिंदे गटाचा उमेदवार नाही, तर जातेगाव गणात पाटील-जगताप युतीचा उमेदवार नाही. बागल गटाने १५ जागांवर आपले उमेदवार उभे केले आहेत. या निवडणुकीत मोहिते-पाटील गटाने पाटील-जगताप युतीला बिनशर्त पाठिंबा दिला आहे. सध्या प्रचाराचा धुराळा उडाला असून, येत्या ९ सप्टेंबरला मतदान होणार आहे.

इतर ताज्या घडामोडी
अकोल्याला रब्बीसाठी हरभऱ्याचे वाढीव...अकोला  ः जिल्ह्यात रब्बी हंगामासाठी...
दुष्काळाची व्यथा मांडताना महिला...निल्लोड, जि. औरंगाबाद : विहिरींनी तळ गाठला, मक्‍...
कोल्हापूर जिल्ह्यात खरीप पिकांच्या...कोल्हापूर  : खरीप पिकांची काढणी वेगात...
सोलापुरातील अडचणीतील शेतकऱ्यांसाठी आश्‍...सोलापूर  ः सोलापूर जिल्ह्यात दुष्काळाची...
नगरमधील ४३३८ शेतकऱ्यांची शेतीमाल...नगर  ः आधारभूत किमतीने मूग, उडीद, सोयाबीनची...
जळगाव जिल्ह्यात ज्वारीच्या पेरणीला...जळगाव : जिल्ह्यात रब्बीतील ज्वारी पेरणीकडे...
ढगाळ वातावरणामध्ये द्राक्ष पिकात...सांगली, मिरज व सोलापूर येथील काही भागांमध्ये हलके...
हुमणी अळीचे एकात्मिक व्यवस्थापनगेल्या काही वर्षांपासून राज्याच्या विविध...
पुणे जिल्ह्यात रब्बीसाठी १९ हजार...पुणे : पुणे जिल्ह्यात रब्बी हंगामाची तयारी सुरू...
सोलापूर जिल्हा बॅंकेकडून ७० हजार...सोलापूर  : सोलापूर जिल्हा बॅंकेच्या सव्वा...
सोयाबीन खरेदी केंद्रे सुरू होईनातसातारा : जिल्ह्यात खरिप पिकांची काढणी अंतिम...
भाजीपाला सल्लासध्याच्या काळात बाजारपेठेची मागणी लक्षात घेऊन...
कृषी सल्ला : ऊस, कापूस, तूर, गहू, हरभरा...ज्या ठिकाणी पाण्याचा ताण बसत आहे, त्या ठिकाणी...
हाताचा नाकाशी होणाऱ्या संपर्कातूनही...न्यूमोनियाकारक जिवाणू हा नाकाला हात लावणे,...
खानदेशात खरिपातील ज्वारीची आवक सुरुजळगाव : खानदेशात अनेक भागांत ज्वारीची मळणी जवळपास...
परभणी जिल्ह्यात मुगाची उत्पादकता एकरी १...परभणी : यंदा परभणी जिल्ह्यात मुगाची सरासरी...
पुणे जिल्ह्यात चाराटंचाईपुणे   ः पुणे जिल्ह्यातील पूर्व पट्ट्यात...
नगर - मराठवाड्यात पाण्यावरून संघर्षाची...नगर ः पुरेसा पाऊस झाला नसल्याने यंदा...
‘महसूल’च्या जागेवर चाऱ्याच्या...यवतमाळ  ः पांढरकवडा व राळेगाव तालुक्‍यांतील...
सातारा जिल्ह्यात ७७३ एकरांवर तुती लागवडसातारा  ः जिल्ह्यात रेशीम शेती करण्याकडे...