हरिनामाच्या गजराने त्र्यंबकनगरी दुमदुमली

हरिनामाच्या गजराने त्र्यंबकनगरी दुमदुमली
हरिनामाच्या गजराने त्र्यंबकनगरी दुमदुमली

त्र्यंबकेश्वर, जि. नाशिक : संतश्रेष्ठ निवृत्तिनाथ महाराज यात्रेसाठी शुक्रवारी (ता.12) लाखो भाविक सिंहस्थनगरी म्हणून ओळख असणाºया श्री क्षेत्र त्र्यंबकेश्वरला दाखल झाले. वारकरी संप्रदायाचे अध्वर्यु, संतश्री निवृत्तिनाथ महाराज यांच्या यात्रेसाठी येथे भक्तांचा मेळा भरला आहे. सर्वत्र विठुरायाचा जयघोष सुरू आहे. हरिनामाच्या गजराने त्र्यंबकनगरी दुमदुमली आहे.

त्र्यंबकेश्वर संतश्रेष्ठ निवृत्तिनाथ महाराज यात्रेसाठी लाखो भाविक सिंहस्थनगरी म्हणून ओळख असणाºया श्री क्षेत्र त्र्यंबकेश्वरला दाखल झाले. वारकरी संप्रदायाचे अध्वर्यु, संतश्री निवृत्तिनाथ महाराज यांच्या यात्रेसाठी येथे भक्तांचा मेळा भरला एवढेच नव्हे तर खास यात्रा बघण्यासाठी विदेशातूनदेखील हल्ली पर्यटक आले आहेत. बारा वर्षातून एकदा भरणारा सिंहस्थ कुंभमेळा व दरवर्षी भरणारा संत निवृत्तिनाथ महाराज यात्रेचा हा ‘महाइव्हेंट’ पाहण्यासाठी व त्याचा अनुभव घेण्यासाठी परदेशी पाहुणे आता येऊ लागले आहेत. अशा या यात्रेसाठी परिवहन महामंडळाच्या बसेस गच्च भरून दाखल झाल्या.

बोला पुंडलिक वरदा हरी विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम.. पंढरीनाथ महाराज की जय.. निवृत्तिनाथ महाराज की जय..! असा जयघोष करीत सकाळपासूनच बस, ट्रॅक्टर, ट्रक व पायी दिंड्यांमधून निवृत्तिनाथ महाराजांचा जय जयकार सुरू राहिला..

धन्य धन्य निवृत्ती देवा काय महिमा वर्णावा, शिवअवतार धरून केले त्रैलोक्य पावन, समाधी त्र्यंबक शिखरी, मागे शोभे ब्रह्मगिरी असा आदरयुक्त गौरव संत नामदेव महाराजांनी आपल्या अभंगात केला आहे. दिंडी म्हणजे केवळ हौस नाही की मौज नाही, दिंडी म्हणजे साधना आहे. पायी दिंडीने शेकडो मैल चालणे तेव्हा तर धड रस्तेही नव्हते. दगड गोटे खाच खळगे काटेकुटे यातून मार्ग काढीत त्र्यंबकला वारीसाठी यावे लागे. आता तर सर्व सोयी उपलब्ध झाल्या. त्यामुळे लाखो भाविक दरवर्षी पायी चालत त्र्यंबकेश्वरची वाट तुडवित यात्रेला येत असतात.

सकळही तिर्थे निवृत्तीच्या पायी तेथे बुडी देई माङया मना म्हणुनच संतश्रेष्ठ निवृत्तीनाथ महाराजांनी संजीवन समाधी घेण्यासाठी त्र्यंबकेश्वर क्षेत्र निवडले. कारण त्र्यंबकेश्वर हे तिर्थक्षेत्र त्रिसंध्या क्षेत्र आहे. संत निवृत्तीनाथ महाराज यात्रेनिमित्त जिल्हा पोलीस दलातर्फे तगडा पोलीस फोर्स तैनात केला आहे.त्यात नाशिकचे पोलीस अधिक्षक (ग्रामीण) संजय दराडे यांच्या मार्गदर्शना खाली यात्रा कालावधीत लावण्यात आला आहे. या बंदोबस्तात एक पोलीस उपअधिक्षक तीन पोलीस निरीक्षक सात सहायक पोलीस निरीक्षक चोवीस पोलीस उपनिरीक्षक 173 पोलीस कॉन्स्टेबल साठ महिला पोलीस कॉन्स्टेबल तर एकावन्न वाहतुक शाखेचे कर्मचारी सज्ज आहेत.

परिवहन महामंडळाच्या वतीने जवळपास 300 बसेसचे नियोजन केले आहे. याबरोबरच आवश्यकते नुसार बसेस वाढविण्यासाठी विभाग नियंत्रक यामिनी जोशी प्रयत्नशील आहेत.याशिवाय गुरुवार (ता.11) पासुन यात्रा बस स्थानक गावाबाहेरील जव्हार फाटा बस स्थानकावर कार्यरत आहेत. त्यामुळे तीन दिवस गावात बस येणार नसल्याचे स्थानक प्रमुख शरद झोले यांनी सांगीतले.

संत निवृत्तीनाथ यात्रेत विशेष करुन वारकरी भाविकांमध्ये शेतकरी वर्ग मोठ्या प्रमाणात असतो. यासाठी तालुका कृषि विभागामार्फत शेतकर्यांसाठी असलेल्या विविध उपयुक्त योजनांची माहिती छापलेल्या कापडी पिशव्याचे वाटप करण्यात आले. याबरोबरच राजिगरा लाडवांचे देखील वटप करण्यात आले. या उपक्रमात तालुका कृषी अधिकारी अजय सुर्यवंशी यांच्या मार्गदर्शनाखाली सर्व अधिकारी क्षेत्रीय अधिकारी विस्तार अधिकारी आदींनी सहभाग घेतला.

वनवासी कल्याण आश्रम व ग्रामविकास मंच गिरणारे यांच्या वतीने स्वयंसेवकांचे एक पथक दाखल झाले असुन जिल्हा आदिवासी आघाडीचे अध्यक्ष लक्ष्मण सावजी यांच्या नेतृत्वाखाली निर्मल वारी प्रकल्पात जनजागृती व प्रबोधन यात्रेत करीत आहेत. अशा अनेक सेवाभावी संस्थांनी निर्मल वारी यशस्वी करण्यासाठी पालिकेच्या निर्मल वारी मध्ये सहभाग नोंदविला आहे. तसेच हरीत ग्रुप आदींसारख्या अनेक संस्था उत्स्फूर्तपणे सहभागी झाल्या.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com