agriculture news in marathi, Trouble started in Marathwada, breake rain | Agrowon

मराठवाड्यात तुती लागवडीला लागला ब्रेक
टीम अॅग्रोवन
मंगळवार, 3 जुलै 2018

औरंगाबाद : जमिनीत उपलब्ध नसलेली पुरेशी ओल, पावसाने दडी मारल्याने मराठवाड्यात तुती लागवडीला ब्रेक लागला आहे. नोंदणी झालेल्या १० हजार ८८५ एकर तुती लागवडीसाठी मराठवाड्यात ४ कोटी ८६ लाख ८२ हजार रोपांची उपलब्धता आहे.

औरंगाबाद : जमिनीत उपलब्ध नसलेली पुरेशी ओल, पावसाने दडी मारल्याने मराठवाड्यात तुती लागवडीला ब्रेक लागला आहे. नोंदणी झालेल्या १० हजार ८८५ एकर तुती लागवडीसाठी मराठवाड्यात ४ कोटी ८६ लाख ८२ हजार रोपांची उपलब्धता आहे.

मराठवाड्यात रेशीम विकासासाठी तुती लागवडीचे ३७०० एकराचे उद्दिष्ट देण्यात आले होते. त्यासाठी मराठवाड्यात राबविलेल्या महारेशीम अभियानाच्या माध्यमातून १० हजार ८८५ एकरांची नोंदणी झाली होती. नोंदणी झालेल्या क्षेत्रात तुती लागवडीसाठी जानेवारी व फेब्रुवारीमध्ये रोपनिर्मितीच्या केलेल्या नियोजनामुळे ४ कोटी ८६ लाख ८२ हजार रोपांची उपलब्धता झाली होती. उपलब्ध झालेल्या रोपांच्या लागवडीसाठी पूर्वमोसमी व पावसाळ्याची सुरवात बऱ्या झालेल्या भागात तुतीच्या लागवडीसाठी पुढाकार घेतला गेला. परंतु, सुरवातीनंतर आपला लहरीपणा व दडी मारलेल्या पावसामुळे तुती लागवड करू इच्छिणाऱ्या शेतकऱ्यांनी लागवडीसाठी हात आखडता घेतला आहे. शिवाय रोपांच्या अनुपलब्धतेपायी काड्यांनी लागवड करून रेशीम विस्तारात सहभाग घेऊ इच्छिणाऱ्या शेतकऱ्यांच्या आशेवरही पावसाच्या खंडाने गदा आणली आहे.

अपेक्षेच्या तुलनेत मराठवाड्यात क्षेत्र नोंदणीला शेतकऱ्यांनी उदंड प्रतिसाद दिला. संपूर्ण मराठवाड्यातील आठही जिल्ह्यांतील ७६८ गावांतील प्रति शेतकरी एक एकरप्रमाणे १० हजार ८८५ एकर क्षेत्र तुती लागवडीसाठी नोंदल्या गेले. शिवाय उद्दिष्टाच्या पूर्तीसाठी २ कोटी ३ लाख ५० हजार रोपांची आवश्‍यकता असताना तुतीची ४ कोटी ८६ लाख ८२ हजार रोपे शेतकऱ्यांनी तयार केली. शिवाय लागवडीसाठी मिळालेल्या सल्ल्याचे पालन करत सिंचनाची सोय वा सल्ल्याप्रमाणे पाऊस वा जमिनीत पुरेशी ओल असलेल्या भागात शेतकऱ्यांनी तुतीची लागवड करणे सुरू होते.

तुती लागवडीसाठी जुलै-ऑगस्ट हा पोषक काळ असतो. सिंचनाची पुरेशी सोय असल्याशिवाय वा जमिनीत पुरेशी ओल झाल्याशिवाय शेतकऱ्यांनी तुती लागवडीचा निर्णय घेऊच नये.
- अजय मोहीते, वरिष्ठ तांत्रिक सहायक, जिल्हा रेशीम कार्यालय औरंगाबाद.

एक एकर तुती लागवडीसाठी रोप तयार केलीत. थोडं पाणी उपलब्ध आहे. पण मोसंबीचा आंबे बहार जोमात आहे. जमिनीत पुरेशी ओल नाही अन्‌ आहे ते पाणी देऊ शकत नाही. त्यामुळे तुती लागवडीसाठी पावसाची वाट पाहतोय.
- मदन बोंद्र, शेतकरी देवगाव, ता. पैठण जि. औरंगाबाद.

जी २ जातीची तुतीच्या काड्या तेलंगाणातून आणून रोपांची निर्मिती केली. चॉकीसाठी पोषक असलेल्या जी २ या तुतीच्या वाणांची रोप लागवडीसाठी पावसाने मारलेल्या दडीमुळे खोडा घातलाय. त्यासाठी पावसाची चातकाप्रमाणे वाट पाहतोय.
- दीपक बुनगे, शेतकरी, रामगव्हाण जि. जालना.

इतर अॅग्रो विशेष
अकोला कृषी विद्यापीठात ड्रोनद्वारे...नागपूर ः ड्रोनद्वारे फवारणीचा राज्यातील पहिला...
विदर्भात आज अतिवृष्टीचा इशारा पुणे ः बंगालच्या उपसागरात तयार झालेल्या कमी दाब...
राज्यातील १७ जिल्हे दुष्काळाच्या छायेतमुंबई ः राज्यात मॉन्सूनचे आगमन झाल्यानंतर अनेक...
प्रयत्नवादातून उभारलेला बेकर्स वेव्ह...वडगाव मावळ तालुक्यातील (जि. पुणे) दिवड येथील...
चीनसह बांगलादेशची कापूस आयात वाढणारजळगाव ः देशात आॅगस्टअखेर ११२ लाख हेक्‍टरवर...
भाजीपाला शेतीसह कापूस बीजोत्पादनातील...भाजीपाला पिके तसेच कापूस बीजोत्पादन या पद्धतीतून...
मिर्झापूर ः साखळी शेततळ्यांचे गाव‘मागेल त्याला शेततळे` योजनेअंतर्गत मिर्झापूर (ता...
इजा झाल्यानंतर वनस्पती पाठवतात धोक्याचा...जेव्हा वनस्पतींना इजा होते, त्या वेळी वनस्पतीच्या...
ठिबक नोंदणीवरील विक्रेत्यांच्या...नागपूर  ः ठिबक नोंदणीवरील विक्रेत्यांच्या...
कमी दाब क्षेत्राचे निर्माण; पावसाच्या...पुणे   : बंगालच्या उपसागरात कमी दाबाचे...
पावसाने ताण दिल्यामुळे खरीप धोक्यातपुणे ः राज्यात काही ठिकाणी परतीच्या पावसाने हजेरी...
चांदक-गुळूंब अोढा जोडप्रकल्पाने साधली...सातारा जिल्ह्यातील चांदक-गुळुंब (ता. वाई) हा ओढा...
सोयाबीनवरील पाने खाणाऱ्या अळ्या व...सध्या सोयाबीन पीक काही ठिकाणी शेंगा लागण्याच्या व...
साखरेच्या गोळ्याही करतील वेदना कमीवाढत्या स्थौल्यत्वासारख्या व त्या अनुषंगाने...
राज्यातील विकास सोसायट्यांना रिक्त...सांगली ः राज्यातील विकास सोसायट्यांची संख्या २१...
पावसाच्या तुरळक हजेरीने हलका दिलासापुणे: पावसाच्या दीर्घ खंडानंतर राज्यात दोन...
पुण्यात एक ऑक्टोबरला ‘कृषी कल्चर’ ज्ञान...पुणे ः शेतीमधील बदलत्या तंत्रावर प्रकाश टाकणारा...
पोटॅशचा मोठा तुटवडाजळगाव  ः रेल्वेकडून खत पुरवठादार किंवा खत...
नोकरी गमावली पण रेशीम शेतीतून पत कमावलीसातपुड्याच्या पायथ्याशी वसलेल्या संग्रामपूर...
राज्यात उद्यापासून पावसाचे संकेतपुणे: बंगालच्या उपसागरात तयार होत असलेल्या कमी...