agriculture news in marathi, `Try to improve the quality of the mango` | Agrowon

`आंब्याचा दर्जा सुधारण्यासाठी प्रयत्न व्हावा`
टीम अॅग्रोवन
शुक्रवार, 22 मार्च 2019

वेंगुर्ले, जि. सिंधुदुर्ग :  कोकणातील आंबा उत्पादकांनी एकत्र येऊन आंब्याचा दर्जा सुधारण्यासाठी प्रयत्न करावा. त्याचा उत्पादकांना फायदा होईल, असा आशावाद शेतकरी मेळाव्यात तज्ज्ञांनी व्यक्त केला.

महाराष्ट्र चेंबर्स ऑफ कॉमर्स इंडस्ट्रीज ॲग्रीकल्चर, सिंधुदुर्ग फार्मर प्रोड्यूसर कंपनीतर्फे फळ संशोधन केंद्रात शेतकरी मेळावा घेण्यात आला.

चांगल्या दर्जाच्या आंब्याचे उत्पादन करणे हे आव्हान बनले आहे. सेंद्रिय पद्धतीने त्याचे उत्पादन घेण्यासाठी मार्गदर्शन होणे गरजेचे आहे.

वेंगुर्ले, जि. सिंधुदुर्ग :  कोकणातील आंबा उत्पादकांनी एकत्र येऊन आंब्याचा दर्जा सुधारण्यासाठी प्रयत्न करावा. त्याचा उत्पादकांना फायदा होईल, असा आशावाद शेतकरी मेळाव्यात तज्ज्ञांनी व्यक्त केला.

महाराष्ट्र चेंबर्स ऑफ कॉमर्स इंडस्ट्रीज ॲग्रीकल्चर, सिंधुदुर्ग फार्मर प्रोड्यूसर कंपनीतर्फे फळ संशोधन केंद्रात शेतकरी मेळावा घेण्यात आला.

चांगल्या दर्जाच्या आंब्याचे उत्पादन करणे हे आव्हान बनले आहे. सेंद्रिय पद्धतीने त्याचे उत्पादन घेण्यासाठी मार्गदर्शन होणे गरजेचे आहे.

यासाठी एकत्रित वयवस्थापन शेतकऱ्यापर्यंत जाणे महत्वाचे आहे. कोकणात अतिउच्च दर्जाचे वातावरण आंबा उत्पादनासाठी आहे. दर्जेदार आंबा उत्पादनासाठी विविध पातळ्यांवर प्रयत्न आवश्यक आहेत. यासाठी शेतकरी शास्त्रज्ञ व तंत्रज्ञान यात समन्वय आवश्यक असल्याचे डॉ. बी एन. सावंत यांनी सांगितले.

एम. बी. दळवी यांनी आंबा उत्पादन करताना शेतकऱ्यांना येणाऱ्या अडचणींची माहिती दिली.

आंब्यावर हवामानाचा गेल्या काही दिवसांपासून सातत्याने प्रतिकूल परिणाम होत आहे. योग्य मार्गदर्शन नसल्याने आंबा उत्पादकांना नुकसानीला सामोरे जावे लागत आहे. याचाच परिणाम आंब्याचा दर्जा व त्याच्या मार्केटिंग यावर होत आहे. कोकणवासीयांसाठी ही नक्कीच अडचणीची गोष्ट आहे. कृषी विभाग, उत्पादक, संशोधन केंद्रे यांनी पुढाकार घ्यावा, अशी अपेक्षा आंबा उत्पादकांनी व्यक्त केली.

एकी निर्माण झाल्यास यातून चांगला संदेश उत्पादकांपर्यंत जाईल. त्याचा फायदा कोकणातील आंब्याला होऊ शकेल, असे डॉ. जे. एल. पाटील, बाळासाहेब परुळेकर, डॉ श्रीकृष्ण परब यांनी सांगितले. मिलिंद प्रभू यांनी स्वागत केले. आनंद करपे यांनी सूत्रसंचालन केले.

इतर बातम्या
विठ्ठल-रुक्मिणी मंदिर समितीला चैत्री...सोलापूर : गेल्या आठवड्यात झालेल्या चैत्री...
अकोला जगात ‘हॉट’ शहरांच्या यादीतअकोला : मागील दोन दिवसांपासून या भागात उष्णतेचे...
दुष्काळी भागात दाहकता वाढलीसावळज, जि. सांगली : कायमस्वरूपी दुष्काळी भाग...
फळबाग वाचविण्यासाठी सलाइनद्वारे पाणी जिंतूर, जि. परभणी : जिल्ह्यात उद्भवलेल्या...
विकासासाठी पुन्हा एकदा संधी द्या :...नाशिक : लोकसभेची ही निवडणूक विकासाची, सामान्य...
राहुल गांधी यांची आज संगमनेरात सभानगर : शिर्डी लोकसभा मतदारसंघातील काॅँग्रेसचे...
सिन्नर तालुक्यात दुष्काळाने डाळिंब...नाशिक  : पाऊस कमी झाल्याने संपूर्ण सिन्नर...
रिसोड बाजार समितीच्या सभापतिपदी सुमन...वाशीम : जिल्ह्यातील रिसोड कृषी उत्पन्न बाजार...
निवडणूक संपली, आता तरी दुष्काळी...सांगली ः लोकसभेची आचारसंहिता एक महिन्यापासून सुरू...
विदर्भात उष्णतेची लाटपुणे ः मराठवाडा ते उत्तर तमिळनाडू आणि दक्षिण मध्य...
शेडनेटगृह अनुदानाचे राज्यस्तरीय दरपत्रक...पुणे : धोरणात्मक कामकाजापासून शेतकरी प्रतिनिधींना...
चौथ्या टप्प्यात १०९ कोट्यधीश उमेदवार...मुंबई ः राज्यातील चौथ्या टप्प्याची निवडणूक...
पुणे ः खरिपासाठी एक लाख ८५ हजार टन...पुणे ः पुणे जिल्ह्यात खरीप हंगामाची तयारी सुरू...
ढाकणी पाणी भरणा केंद्र अत्यवस्थदहिवडी, जि. सातारा : दुष्काळाची दाहकता गंभीर रूप...
राज्यातील काॅँग्रेस प्रायव्हेट लिमिटेड...नगर ः ‘‘राज्यातील काॅँग्रेस प्रायव्हेट लिमिटेड...
कपाशीच्या नांदेड ४४ बीटी बियाण्याची ५...परभणी ः महाबीज आणि वसंतराव नाईक मराठवाडा कृषी...
वनस्पतीच्या ताण स्थितीतील संदेश यंत्रणा...वनस्पतीतील ताणाच्या स्थितीमध्ये कार्यरत होणाऱ्या...
ऑस्ट्रेलियातील सुपरमार्केटची दुष्काळाशी...ऑस्ट्रेलियातील एका सुपर मार्केटने दुष्काळाशी...
गोदावरीत प्रदूषण केल्यास होणार कारवाईनाशिक : नाशिक शहरातून वाहणाऱ्या गोदावरी...
सोलापुरात टंचाई निवारणाचा भार...सोलापूर : सोलापूर जिल्ह्याचा ग्रामीण भाग...