agriculture news in marathi, 'Trying to Do All Together For Garment Hub' | Agrowon

गारमेंट हबसाठी सर्वांनी मिळून करू प्रयत्न
टीम अॅग्रोवन
रविवार, 28 जानेवारी 2018

सोलापूर  : सोलापुरातील चादर व टॉवेल जगात प्रसिद्ध आहे. त्याचप्रमाणे सोलापुरात स्वस्तात गणवेश तयार होत असल्याने याचे मार्केटिंग देशातच नव्हे आंतरराष्ट्रीय स्तरावर व्हायला हवे. येथे टेक्‍स्टाइल पार्क आवश्‍यक असून, मेगा क्‍लस्टरसाठी जागेचा शोध सुरू आहे. वस्त्रोद्योगाला पोषक असे सोलापूर गारमेंट हब होण्यासाठी सर्वांनी मिळून प्रयत्न करू, असे प्रतिपादन सहकार, पणन व वस्त्रोद्योगमंत्री सुभाष देशमुख यांनी केले.

सोलापूर  : सोलापुरातील चादर व टॉवेल जगात प्रसिद्ध आहे. त्याचप्रमाणे सोलापुरात स्वस्तात गणवेश तयार होत असल्याने याचे मार्केटिंग देशातच नव्हे आंतरराष्ट्रीय स्तरावर व्हायला हवे. येथे टेक्‍स्टाइल पार्क आवश्‍यक असून, मेगा क्‍लस्टरसाठी जागेचा शोध सुरू आहे. वस्त्रोद्योगाला पोषक असे सोलापूर गारमेंट हब होण्यासाठी सर्वांनी मिळून प्रयत्न करू, असे प्रतिपादन सहकार, पणन व वस्त्रोद्योगमंत्री सुभाष देशमुख यांनी केले.

श्री. सोलापूर रेडिमेड कापड उत्पादक संघातर्फे हॉटेल बालाजी सरोवर प्रीमिअर येथे शनिवारी (ता. २७) सकाळी द्वितीय आंतरराष्ट्रीय गणवेश व वस्त्र प्रदर्शनाचे उद्‌घाटन वस्त्रोद्योगमंत्री श्री. देशमुख यांच्या हस्ते झाले. या वेळी ते बोलत होते.

पालकमंत्री विजयकुमार देशमुख, अध्यक्ष रामवल्लभ जाजू, उपाध्यक्ष नीलेश शाह, मफतलाल इंडस्ट्रीचे ऋषिकेश मफतलाल, विपणन विभागाचे अध्यक्ष एम. बी. रघुनाथ आदी उपस्थित होते.

वस्त्रोद्योगमंत्री श्री. देशमुख पुढे म्हणाले, की धूम्रपानविरोधी कायद्यामुळे येथील विडी उद्योग डबघाईला आला आहे. यातील ७० हजार कामगारांना गारमेंट उद्योगात रोजगार मिळवून देऊ. कौशल्य विकासाच्या माध्यमातून प्रशिक्षण केंद्र सुरू करू. गारमेंट क्‍लस्टर उभारणीसाठी होटगी येथे जागेचा शोध घेत आहोत. त्याचबरोबर चिंचोळी एमआयडीसी, अक्कलकोट रोड येथेही गारमेंट पार्कसाठी प्रयत्न सुरू आहेत. हिरज (ता. उत्तर सोलापूर) येथे रेशीम पार्कसाठी १० एकर जागा मिळाली आहे. २०२२ च्या वस्त्रोद्योग धोरणात विशेष करून गारमेंट उद्योगाला प्राधान्य देणार.

पालकमंत्री श्री. देशमुख म्हणाले, सरकारी धोरणामुळे विडी व यंत्रमाग उद्योग अडचणीत आले आहेत. मात्र १९७० पासून छोट्या गारमेंट उद्योगाचे मोठ्या उद्योगात रूपांतर होत आहे.

इतर बातम्या
शेतकऱ्याने तयार केली डिझेलवरची बाईकसांगली : वाढत्या पेट्रोलच्या सुटकेसाठी...
शेतकऱ्यांना फसविणारे विक्रेते,...सोलापूर : शेतकरी केंद्रबिंदू मानून...
धुळे जिल्ह्यात पूर्वहंगामी कापूस...धुळे : जिल्ह्यात पूर्वहंगामी कापूस लागवडीची...
जळगाव जिल्ह्यात खरिपासाठी मुबलक खतेजळगाव : जिल्ह्यात आगामी खरिपासाठी शेतकऱ्यांची...
कारखान्यांनी थकीत `एफआरपी' त्वरीत...सोलापूर : जिल्ह्यातील साखर कारखान्यांनी थकवलेले...
उत्पादकांसाठी बेदाणा गोडसांगली ः यंदाच्या बेदाणा हंगामात बेदाण्याच्या...
दक्षिण महाराष्ट्रातील कारखान्यांत ८०...सांगली/कोल्हापूर ः साखरेला दर नसल्याने निराश...
अकोला जिल्हा प्रशासन शेतकऱ्यांना देणार...अकोला ः देशात राबवल्या जात असलेल्या प्रधानमंत्री...
केळी दरात किंचित सुधारणाजळगाव ः रावेर, यावलमध्ये केळीची आवक वाढलेली...
ग्रामस्वच्छता अभियानात प्रभाग, गटातून...नगर ः ग्रामीण भागात स्वच्छतेची व्यापी...
​​राज्य सरकार राबविणार मधुमक्षिका मित्र...पुणे : शहरी भागात मधुमक्षिकांचे पोळे दिसले, की ते...
कामाच्या अतिरिक्त ताणामुळे पणन संचालक...पुणे ः पणन संचालकपदी पूर्णवेळ नियुक्ती असताना...
मका चार वर्षांतील नीचांकी पातळीवरनवी दिल्ली ः बजारात मका आवक वाढल्यांतर मागणी कमी...
कासवाच्या लिंगनिर्धारणामागील जनुकीय...गेल्या ५० वर्षांपासून अंडी उबण्याच्या...
सातारा जिल्ह्यात पाणीटंचाई वाढलीसातारा  : जिल्ह्यात पाणीटंचाईच्या झळा वाढू...
ब्राझील, थायलंडचा यंदा इथेनॉलकडे वाढता...कोल्हापूर : आंतरराष्ट्रीय बाजारात सर्वत्रच...
अग्रणी नदी पुन्हा अतिक्रमणाच्या विळख्यातसांगली : तासगाव, कवठेमहांकाळ तालुक्‍यांतील अग्रणी...
पाणलोट, मृदसंधारण घोटाळ्याचा पर्दाफाशपुणे : कृषी खात्यातील पाणलोट व मृदसंधारण...
अरबी समुद्रात चक्रीवादळाचे संकेतपुणे : ‘सागर’ चक्रीवादळापाठोपाठ अरबी समुद्रात...
पुण्यातील डाळिंब, पेरू, चिकू बागांना...पुणे  : जिल्ह्यातील मृग बहारातील डाळिंब,...