agriculture news in marathi, Trying to giving rent Nashik, Nifad factory from the bank | Agrowon

नाशिक, निफाड कारखाना भाड्याने देण्याचा प्रयत्न
टीम अॅग्रोवन
मंगळवार, 25 सप्टेंबर 2018

नाशिक : कर्जबाजारी व आर्थिक डबघाईमुळे गेल्या काही वर्षांपासून बंद पडलेला नाशिक व निफाड सहकारी साखर कारखाना आता भाडेतत्त्वावर चालविण्यास देण्याचे प्रयत्न नाशिक जिल्हा बॅँकेने सुरू केले आहेत. त्यातून कर्जवसुली करण्याचे बॅँकेचे प्रयत्न आहेत, अशी माहिती सूत्रांनी दिली.

भाडेतत्त्वावर देण्यासाठी निविदा काढण्यात आल्या आहेत. दोन्ही कारखान्यांसाठी चार खासगी कंपन्यांनी तयारी दर्शविली आहे. मात्र पाच ते सहा कोटी रुपये अनामत भरण्यास या कंपन्यांनी असमर्थता व्यक्त केल्याने त्यांना मुदतवाढ देण्यात आली आहे.

नाशिक : कर्जबाजारी व आर्थिक डबघाईमुळे गेल्या काही वर्षांपासून बंद पडलेला नाशिक व निफाड सहकारी साखर कारखाना आता भाडेतत्त्वावर चालविण्यास देण्याचे प्रयत्न नाशिक जिल्हा बॅँकेने सुरू केले आहेत. त्यातून कर्जवसुली करण्याचे बॅँकेचे प्रयत्न आहेत, अशी माहिती सूत्रांनी दिली.

भाडेतत्त्वावर देण्यासाठी निविदा काढण्यात आल्या आहेत. दोन्ही कारखान्यांसाठी चार खासगी कंपन्यांनी तयारी दर्शविली आहे. मात्र पाच ते सहा कोटी रुपये अनामत भरण्यास या कंपन्यांनी असमर्थता व्यक्त केल्याने त्यांना मुदतवाढ देण्यात आली आहे.

नाशिक सहकारी कारखान्याकडे जिल्हा बॅँकेचे १५७, तर निफाड सहकारी कारखान्याकडे १२५ कोटी रुपयांचे कर्ज अनेक वर्षांपासून थकले आहे. कर्जबाजारीपणा, खेळत्या भांडवलाचा अभाव, कर्मचाऱ्यांची देणी, यामुळे आर्थिकदृष्ट्या जर्जर झालेले हे दोन्ही कारखाने बंद पडून जिल्हा बँकेने थकबाकीपोटी जप्त केले आहेत.
त्यामुळे कारखान्याकडे असलेल्या थकबाकीवर चक्रवाढ व्याजाचा डोंगर दिवसागणिक वाढत चालला आहे. शिवाय कारखाना सुरू करण्यासाठी करण्यात आलेले राजकीय व शासकीय प्रयत्नही अनेकवेळा फसल्यामुळे बँकेने कारखाना विक्री करण्यासाठी वेळोवेळी जाहिराती काढल्या, परंतु त्याला प्रतिसाद मिळाला नाही.
शासनानेच सहकारी साखर कारखाने विक्रीवर निर्बंध लावल्यामुळे बॅँकेने विक्रीचा निर्णय बदलून भाडेतत्त्वावर चालविण्याचे प्रयत्न सुरू केले असल्याचे सूत्रांनी सांगितले.

इतर ताज्या घडामोडी
अळिंबी, स्पॉन्सच्या नावीन्यपूर्ण...सर्व वयोगटातील लोंकासाठी अळिंबी हे अत्यंत पोषक...
शेतीमाल विक्रीसाठी १२ शेतकऱ्यांची नोंदणीसांगली ः सांगली जिल्ह्यातील शेतकऱ्यांना उडीद, मूग...
नांदेड, परभणी, हिंगोलीत मूग, उडदाला कमी...नांदेड ः नांदेड, परभणी, हिंगोलीतील कृषी उत्पन्न...
पीक संरक्षण क्षेत्रात ‘महिंद्रा’ची...मुंबई : कृषी अवजारे आणि शेती उत्पादनात देशात...
गिरणारे बाजारातील बेहिशेबी वसुलीला चापनाशिक : गिरणारे (ता. जि. नाशिक) येथील टोमॅटो...
'योग्य आर्थिक व्यवस्थापन हा शेती...नाशिक : ‘‘योग्य आर्थिक व्यवस्थापन हाच शेती...
कपाशीवरील पांढरी माशी, कोळी नियंत्रण...सध्या कोरडवाहू कपाशीवर पांढऱ्या माशी व कोळी या...
जळगावात केळीदरात १०० रुपयांनी वाढजळगाव ः केळी दरात गत आठवड्याच्या अखेरीस...
नागपुरात नव्या सोयाबीनची बाजारात आवक...नागपूर ः बाजारात नव्या सोयाबीनची आवक वाढती असली...
नगरमध्ये कांद्याला सोळाशेचा दरनगर ः जिल्ह्यातील एका उपबाजार समितीसह सात बाजार...
तासगाव बाजार समितीत बेदाण्याची आवक,...सांगली  ः दिवाळी सणाच्या पार्श्‍वभूमीवर...
विसावी सिंचन परिषद अकोला येथे होणारसोयगाव, जि. औरंगाबाद   : येथे रविवारी (ता....
वऱ्हाडात मूग, उडदाला मिळतोय...अकोला  ः या हंगामात लागवड झालेल्या मूग,...
नगर जिल्ह्यात उडदाचे उत्पादन घटलेनगर  ः जिल्ह्यात यंदा सुरवातीपासून पाऊस...
‘स्वाभिमानी’च्या कार्यकर्त्यांनी दाखवले...नगर  : शेतकऱ्यांना दुधाला पाच रुपये अनुदान...
पीक कापणी प्रयोग अहवालानंतर...बुलडाणा   ः कमी पाऊस तसेच पावसातील खंडामुळे...
इंदापूर तालुक्यात तातडीने दुष्काळ जाहीर...भवानीनगर, जि. पुणे  : सरकारने आता तांत्रिक...
पुण्यात आवक कमी झाल्याने भाजीपाल्यांची...पुणे ः राज्यातील दुष्काळी परिस्थितीच्या...
दुष्काळी तालुक्यांतून अकोले, कोपरगावला...नगर : अकोले तालुक्‍यात पाऊस पडण्याच्या प्रमाणात...
सोयाबीनने मोडले शेतकऱ्यांचे कंबरडेअमरावती  ः दिवाळीच्या मोसमात दोन पैसे...