agriculture news in marathi, Trying to set up Textile Park in Akola | Agrowon

बुलडाणा जिल्ह्यात घाटावर सुकाळ; घाटाखाली दुष्काळ
टीम अॅग्रोवन
रविवार, 7 जानेवारी 2018

अकोला : जिल्ह्याच्या औद्योगिक विकासासाठी आणि शेतकरी व सर्वसामान्यांच्या प्रगतीसाठी अकोला येथील औद्योगिक क्षेत्रात डाळमिल हब आणि टेक्स्टाईल पार्क उभारण्याकरिता निश्चितपणे प्रयत्नपणे प्रयत्न करू, अशी ग्वाही राज्याचे उद्योगमंत्री सुभाष देसाई यांनी दिली. ते येथे अायोजित ॲग्रो इंडस्ट्रीज मशिनरीज व फूड प्रोसेसिंग प्रदर्शनाच्या उद्‌घाटनप्रसंगी बोलत होते.

अकोला : जिल्ह्याच्या औद्योगिक विकासासाठी आणि शेतकरी व सर्वसामान्यांच्या प्रगतीसाठी अकोला येथील औद्योगिक क्षेत्रात डाळमिल हब आणि टेक्स्टाईल पार्क उभारण्याकरिता निश्चितपणे प्रयत्नपणे प्रयत्न करू, अशी ग्वाही राज्याचे उद्योगमंत्री सुभाष देसाई यांनी दिली. ते येथे अायोजित ॲग्रो इंडस्ट्रीज मशिनरीज व फूड प्रोसेसिंग प्रदर्शनाच्या उद्‌घाटनप्रसंगी बोलत होते.

पालकमंत्री डॉ. रणजीत पाटील, महापौर विजय अग्रवाल, आमदार गोपीकिशन बाजोरिया, जिल्हाधिकारी आस्तिक कुमार पाण्डेय, कैलास खंडेलवाल, संस्थापक अध्यक्ष भीमराव धोत्रे, बुलडाणा अर्बन बँकेचे अध्यक्ष राधेश्याम चांडक आदी व्यासपीठावर उपस्थित होते.

श्री. देसाई म्हणाले, शेतकऱ्यांच्या विकासासाठी शेतमालावर आधारीत प्रक्रिया उद्योग जास्तीतजास्त प्रमाणात उभारणे गरजेचे अाहे. त्यासाठी फुड प्रोसेसिंग सारखे प्रदर्शन दिशादर्शक ठरू शकते. अकोला येथे डाळमिल हब उभारण्यासाठी उद्योग विभागाकडून निर्णय घेतला जाईल. राज्यात एकूण दहा टेक्स्टाईल पार्क उभारण्याचा शासनाने निर्णय घेतला आहे. यापैकी अमरावती येथे पहिला टेक्स्टाईल पार्क उभारण्यात आला आहे. पुढील टेक्स्टाईल पार्क उभारण्यासाठी अकोल्याला प्राधान्य दिले जाईल. सोबतच कौशल्य विकास केंद्रही उभारण्यात येईल.

एमआयडीसीतील पाण्याचा प्रश्न सोडविण्यासाठी निधीची कमतरता भासू दिली जाणार नाही. अकोला येथील विमानतळाबाबतच्या अडचणी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे पाठपुरावा करून सोडविल्या जातील, असेही त्यांनी सांगितले. पालकमंत्री डॉ. पाटील म्हणाले, शेतकऱ्यांच्या प्रगतीसाठी शेतीला यंत्र आणि तंत्राची जोड मिळणे आवश्यक आहे. त्यासोबतच शेतकऱ्यांनी शेतीसोबतच जोडधंदे करावेत. या वेळी महापौर विजय अग्रवाल, आमदार गोपीकिशन बाजोरिया यांनीही मार्गदर्शन केले. प्रास्ताविक कैलास खंडेलवाल यांनी केले.

इतर ताज्या घडामोडी
पेरूबागेसाठी सघन लागवडीचे तंत्रपेरू बागेमध्ये उत्पादकता वाढवण्यासाठी सघन...
जळगाव बाजार समितीकडून आवाराबाहेर...जळगाव : फळे-भाजीपाला नियमनमुक्तीनंतर बाजार समिती...
जीएम ई. कोलाय जैवइंधननिर्मितीसाठी...जैवइंधनाच्या निर्मितीसाठी जनुकीय तंत्रज्ञानाने...
पुणे विभागात पाणीटंचाई वाढतेयपुणे : वाढत्या उन्हाबरोबरच पुणे विभागातील...
जळगाव जिल्ह्यातील पाणीटंचाई होतेय भीषणजळगाव  ः जिल्ह्यातील पश्‍चिम पट्ट्यात...
गनिमी काव्याने राष्ट्रीय किसान...नाशिक : राष्ट्रीय किसान महासंघातर्फे...
बीड जिल्ह्यात एक लाख क्विंटल तुरीचे...बीड  : शासनाने नाफेडमार्फत केलेल्या तूर...
पुणे जिल्ह्यात भात लागवडीसाठी...पुणे: जिल्ह्यातील भातपट्ट्यातील शेतकऱ्यांनी खरीप...
शिवसेना-भाजपच्या कुरघोडीने युतीवरचे...मुंबई : विधान परिषदेच्या सहा जागांसाठी राज्यातील...
पीककर्ज वाटप सुरू करण्याची स्वाभिमानीची...परभणी : उत्पादनात घट आल्यामुळे तसेच...
सांगली जिल्ह्यात पाणीटंचाई वाढलीसांगली : जिल्ह्यातील ताकारी, म्हैसाळ आणि टेंभू...
नांदेड विभागातील साखर कारखान्यांची...नांदेड : नांदेड विभागातील परभणी, हिंगोली, नांदेड...
नवीन ९९ लाख लाभार्थी घेतील...मुंबई : राष्ट्रीय अन्नसुरक्षा योजनेअंतर्गत आता...
नगर जिल्ह्यातील सहा ठिकाणी हरभरा खरेदी...नगर  ः खरेदी केलेला हरभरा साठवणुकीसाठी जागा...
शेतकऱ्याने तयार केली डिझेलवरची बाईकसांगली : वाढत्या पेट्रोलच्या सुटकेसाठी...
शेतकऱ्यांना फसविणारे विक्रेते,...सोलापूर : शेतकरी केंद्रबिंदू मानून...
धुळे जिल्ह्यात पूर्वहंगामी कापूस...धुळे : जिल्ह्यात पूर्वहंगामी कापूस लागवडीची...
जळगाव जिल्ह्यात खरिपासाठी मुबलक खतेजळगाव : जिल्ह्यात आगामी खरिपासाठी शेतकऱ्यांची...
सोलापुरात गाजर, काकडीचे दर वधारले,...सोलापूर ः सोलापूर कृषी उत्पन्न बाजार समितीच्या...
कारखान्यांनी थकीत `एफआरपी' त्वरीत...सोलापूर : जिल्ह्यातील साखर कारखान्यांनी थकवलेले...