agriculture news in marathi, Tulle planted in Marathwada | Agrowon

मराठवाड्यात तुती लागवडीस प्रारंभ
टीम अॅग्रोवन
गुरुवार, 28 जून 2018

औरंगाबाद : रेशीम विकासासाठी तुती लागवड महत्त्वाची अाहे. त्यासाठी ३७०० एकराचे उद्दिष्ट मिळालेल्या मराठवाड्यात १० हजार ८८५ एकराची नोंदणी झाली आहे. तुती लागवडीसाठी ४ कोटी ८६ लाख ८२ हजार रोपांची निर्मिती करण्यात आली असून, महारेशीम अभियानात नोंदणी केलेल्या शेतकऱ्यांनी लागवडीसाठी अपेक्षित पाऊस व सिंचनाची सोय असलेल्या भागात तुती लागवडीचा श्रीगणेशा केला आहे.

औरंगाबाद : रेशीम विकासासाठी तुती लागवड महत्त्वाची अाहे. त्यासाठी ३७०० एकराचे उद्दिष्ट मिळालेल्या मराठवाड्यात १० हजार ८८५ एकराची नोंदणी झाली आहे. तुती लागवडीसाठी ४ कोटी ८६ लाख ८२ हजार रोपांची निर्मिती करण्यात आली असून, महारेशीम अभियानात नोंदणी केलेल्या शेतकऱ्यांनी लागवडीसाठी अपेक्षित पाऊस व सिंचनाची सोय असलेल्या भागात तुती लागवडीचा श्रीगणेशा केला आहे.

रेशीम उद्योगाने मराठवाड्यातील दुष्काळ व नैसर्गिक आपत्तीच्या झळा सहन करणाऱ्या शेतकऱ्यांना सुरक्षित व शाश्वत उत्पादन व उत्पन्नाचा पर्याय उपलब्ध करून दिला आहे. मराठवाड्यातील शेतकऱ्यांच्या पसंतीस उतरलेल्या रेशीम उद्योगावाच्या विस्ताराचे काम रेशीम विभागाने राबविलेल्या महारेशीम अभियानातून झाले आहे. राज्यात रेशीम उद्योगाच्या विस्तारासाठी देण्यात आलेल्या तुती लागवडीच्या उद्दिष्टात मराठवाड्यात ३७०० एकरावर तुतीची लागवड होणे अपेक्षित होते. परंतु अपेक्षेच्या तुलनेत मराठवाड्यात क्षेत्र नोंदणीला शेतकऱ्यांनी उदंड प्रतिसाद दिला.

महारेशीम अभियानात नोंदणी केल्यानंतर तीन एकरांसाठी रोपनिर्मिती सुरू केली. जवळपास पंधरा हजार रोपांची निर्मिती झाली. नैसर्गिकरीत्या होणारी मर व एकराप्रमाणे लागणारी रोपे उपलब्ध करून लागवड करतो आहे.
- शहादेव ढाकणे, शेतकरी, देवगाव, ता. पैठण, जि. औरंगाबाद.

महारेशीम अभियानाला उदंड प्रतिसाद मिळाला. उद्दिष्टाच्या तुलनेत दुप्पटीपेक्षा जास्त रोपांची निर्मिती झाल्याने उपलब्ध रोपांच्या माध्यमातून प्रतीएकर ५५०० रोपे लक्षात घेता ८८८६ एकरांवर तुती लागवड अपेक्षित आहे. नोंदणी केल्यानुसार उर्वरित शेतकरीही काडी किंवा रोपांची उपलब्धता करून तुतीची लागवड करतील, अशी आशा आहे.
- दिलीप हाके,
सहायक संचालक (रेशीम), औरंगाबाद

इतर ताज्या घडामोडी
कळमणा बाजार समितीत गव्हाची आवक वाढलीनागपूर ः बाजारात गव्हाची आवक वाढली असून सरासरी...
जळगाव बाजार समितीत हिरव्या मिरचीचे दर...जळगाव ः कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये हिरव्या...
जंगलातून होणाऱ्या नत्र प्रदूषणाचे...अमेरिकन वनसेवेतील शास्त्रज्ञांनी जंगलातून...
वनस्पती अवशेषापासून स्वस्त, शाश्वत हवाई...पिकांचे अवशेष आणि झाडांची लाकडे यांच्यापासून...
नगरला चिंच प्रतिक्विंटल ७००० ते १३५००...नगर ः नगर कृषी उत्पन्न बाजार समितीत अन्य भुसार...
थकीत चुकाऱ्यांसाठी स्वाभिमानी आक्रमकबुलडाणा : जिल्ह्यात शेतकऱ्यांनी तूर, मूग, उडदाची...
सोलापूरसाठी उजनीतून पाणी सोडलेसोलापूर : उजनी धरणातून भीमा नदीपात्रात सोलापूर...
लासुर्णेमध्ये जिल्हा बॅंकेसमाेर...वालचंदनगर, जि. पुणे ः लासुर्णे (ता. इंदापूर)...
अकोला, बुलडाण्यात अर्ज दाखल करण्यासाठी...अकोला : लोकसभा निवडणूकीसाठी उमेदवारी अर्ज दाखल...
परभणी जिल्ह्यात मनरेगाअंतर्गत १४६...परभणी ः महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार...
नगर : अकोल्यात कांदा प्रतिक्विंटल ११००...नगर ः जिल्ह्यातील राहुरी, राहाता, अकोले पारनेर...
जळगाव, धुळे, नंदुरबारमध्ये रंगणार...जळगाव ः खानदेशात रावेर वगळता नंदुरबार, धुळे व...
गरिबांना वार्षिक ७२ हजारांच्या हमीचे...नवी दिल्ली : लोकसभा निवडणुकीसाठी कॉंग्रेसने...
नांदेड जिल्ह्यात तूर उत्पादकता...नांदेड  ः नांदेड जिल्ह्यात २०१८-१९ मधील खरीप...
कानिफनाथ महाराज समाधी दर्शनासाठी...मढी, जि. नगर  : भटक्यांची पंढरी अशी ओळख...
सोशल मीडियावर चढला निवडणुकांचा ज्वरनागपूर ः सोशल मीडियावरच पक्ष पदाधिकारी,...
हवाई दलात चार ‘चिनुक' हेलिकॉप्टर सामीलचंडीगड ः ‘चिनुक' हेलिकॉप्टरमुळे परिस्थितीत...
नाट्यमय घडामोडीत काॅँग्रेसने चंद्रपूरचा...चंद्रपूर  ः विनायक बांगडे यांच्या उमेदवारीला...
सातारा जिल्ह्यात ऊस गाळप हंगाम अंतिम...सातारा ः जिल्ह्यातील साखर गाळप हंगाम अंतिम...
पाणी अमूल्य असल्याने जनजागृतेची गरज ः...कोल्हापूर : ‘‘पाण्यासाठी व्यापक जनजागृती होणे...