संपाला तुमसर तालुक्‍यातील शेतकऱ्यांचा पाठिंबा

संपाला तुमसर तालुक्‍यातील शेतकऱ्यांचा पाठिंबा
संपाला तुमसर तालुक्‍यातील शेतकऱ्यांचा पाठिंबा

भंडारा  ः किसान एकता मंच आणि राष्ट्रीय किसान महासंघ यांच्या नेतृत्वात देशातील १७० पेक्षा अधिक संघटनांनी १ ते १० जून दरम्यान देशव्यापी शेतकरी संपाची हाक दिली आहे. या आंदोलनाला तुमसर तालुक्‍यातील शेतकऱ्यांच्या विविध संघटना, शेतमजूर तसेच दुग्ध उत्पादकांनी पाठिंबा जाहीर केला आहे.  शेतकऱ्यांच्या या आंदोलनाला पाठिंबा देण्यासाठी तुमसर येथे एका बैठकीचे आयोजन करण्यात आले. या वेळी मानवाधिकार कल्याण समितीचे अध्यक्ष तसेच जिल्हा परिषद सदस्य के. के. पंचबुद्धे, देवराव बोंदरे, मदन शेंडे, मनोहर बहिले, नानाजी माहूले, नानाजी बोंदरे, गजानन बुद्धे, चारगावचे सरपंच लक्ष्मण ढबाले, ब्राम्हणीचे सरपंच रामप्रसाद काहलकर, दयाल झंझाड, गळीराम बांडेबूचे, सहादेव तूरकर, शिवशंकर बोंदरे, शामराव पाटील, विपील कुंभारे, खेमराज आडमने, संजू टिकपाचे, संतोष ठाकरे, रवी सपाटे, दिलीप सपाटे, श्रीराम शेंडे यांच्यासह शेतकरी मोठ्या संख्येने उपस्थित होते. बैठकीत शेतकऱ्यांच्या या आंदोलनाला पाठिंबा जाहीर करण्यात आला.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com