agriculture news in marathi, Tupkar-Patole meeting raised many question | Agrowon

तुपकर-पटोले यांच्या भेटीने अनेकांच्या भुवया उंचावल्या
टीम अॅग्रोवन
गुरुवार, 9 नोव्हेंबर 2017

अकोला : भाजपचे खासदार नाना पटोले गेले काही दिवसांपासून सातत्याने सरकारवर टीका करत आहेत. अद्यापही त्यांची ‘मन की बात’ कुणालाच समजलेली नाही. मात्र खासदार पटोले यांनी बुलडाणा जिल्हा दौऱ्यावर असताना चिखली येथे स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे नेते रविकांत तुपकर यांच्याशी तासभर बंद द्वार चर्चा केल्याने अनेकांच्या भुवया उंचावल्या अाहेत. या चर्चेत सोयाबीन, कापूस अाणि धान उत्पादक शेतकऱ्यांच्या समस्यांवर सामूहिक अांदोलनाची रणनिती अाखल्याचे सांगितले जात आहे.

अकोला : भाजपचे खासदार नाना पटोले गेले काही दिवसांपासून सातत्याने सरकारवर टीका करत आहेत. अद्यापही त्यांची ‘मन की बात’ कुणालाच समजलेली नाही. मात्र खासदार पटोले यांनी बुलडाणा जिल्हा दौऱ्यावर असताना चिखली येथे स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे नेते रविकांत तुपकर यांच्याशी तासभर बंद द्वार चर्चा केल्याने अनेकांच्या भुवया उंचावल्या अाहेत. या चर्चेत सोयाबीन, कापूस अाणि धान उत्पादक शेतकऱ्यांच्या समस्यांवर सामूहिक अांदोलनाची रणनिती अाखल्याचे सांगितले जात आहे.

रविकांत तुपकर हे स्वाभिमानी शेतकरी संघटना सरकारमधून बाहेर पडल्यापासून सातत्याने सरकारविरोधी टीका करीत अाहेत. तसेच खासदार पटोलेदेखील श्री. तुपकरांच्या साथीने सोयाबीन, कापूस तसेच धान उत्पादक शेतकऱ्यांच्या प्रश्नावर मोठा लढा उभा करण्याची शक्यता अाहे.

खासदार पटोले यांनी खासदार राजू शेट्टी यांच्या नेतृत्वात २० नोव्हेंबरला कोल्हापूरला निघणाऱ्या मोर्चात सहभागी होणार असल्याचे अाधीच म्हटले अाहे. त्यादृष्टीने या बैठकीचे महत्त्व वाढले.

खासदार पटोले यांची भाजप सरकारवरील नाराजी अद्यापही कुणाला कळालेली नाही. श्री. पटोले देखील मिळेल तेव्हा टीका करण्याची संधी सोडत नाहीत. त्यामुळेच अाता विरोधकही त्यांचे चाहते बनत अाहेत. तुपकरांनी तर सध्या सरकारविरुद्ध टीकेचे सत्रच सुरू केले आहे. हे दोन्ही आक्रमक शेतकरी नेते एकत्र आल्यास विदर्भात शेतकरी चळवळ वाढू शकते.

खासदार पटोले व तुपकर यांनी चिखलीत एका कार्यक्रमात सोबतच उपस्थिती लावली होती. यावेळी त्यांनी भाजप सरकारवर हल्ला चढविला. सोयाबीन, कापूस व धान उत्पादक शेतकरी सरकारच्या चुकीच्या धोरणामुळे देशोधडीला लागले. शासनाने नोटाबंदी, जीएसटीसारखे निर्णय घेऊन शेतकरी तसेच सर्वसामान्य जनतेचे जगणे मुश्कील केल्याचा आरोप केला.

या कार्यक्रमात खासदार पटोलेंनी, रविकांत तुपकर हे माझे छोटे बंधू असल्याचे व शेतकरी शेतमजुरांचे खरे नेते असल्याचे सांगत त्यांना जनतेने साथ दिली पाहिजे, असे अावाहन केले होते. या कार्यक्रमानंतर दोघांमध्ये तासभर बंद द्वार चर्चा झाली.

इतर बातम्या
ऊस टोळी देण्‍याच्‍या आमिषाने फसवणूकसांगली - ऊस तोड टोळी पुरवण्याच्या आमिषाने शेतकरी...
थंडीने काजू मोहोरला...!देवरूख, रत्नागिरी : जानेवारी महिना...
ससून डॉक मत्स्योद्योग सहकारी संस्थेची...मुंबई ः रायगड जिल्ह्यातील एका छोट्या गावात खलाशी...
भंडारा जिल्हा परिषदेचा गड काँग्रेस-...भंडारा : जिल्हा परिषद अध्यक्षपदी काँग्रेसचे रमेश...
'कोरेगाव भीमासारखे प्रकार घडू शकतात'मुंबई : कोरेगाव भीमा घटना हिंसाचारामुळे...
रविकांत तुपकरांची लाेकसभेसाठी माढामधून...अकाेला : स्वाभिमानी शेतकरी संघटनेची मुलख मैदानी...
कायदा हातात घेण्याची वेळ आणू नकाउस्मानाबाद : आम्ही कायदा हातात घेत नाही, तशी...
साताऱ्यात हरभऱ्याची साडेसत्तावीस हजार...सातारा: हरभऱ्याचा फायदेशीर ठरणारा बिवड तसेच...
जळगाव येथे तुरीला मिळतोय हमीभावापेक्षा...जळगाव ः तुरीचे उत्पादन यायला सुरवात झाली, तरीही...
परभणी, हिंगोलीत सात लाख क्विंटल कापूस...परभणी : राज्य सहकारी कापूस उत्पादक महासंघाच्या...
‘कळमणा बाजार’ निवडणूक जुन्या पणन...नागपूर : येथील कळमणा बाजार समितीच्या निवडणुका...
पाणीटंचाईमुळे आटपाडीतील रब्बी पिके धोक्...सांगली : आटपाडी तालुक्‍यात पाणीटंचाईमुळे रब्बी...
वाशीममध्ये सोयाबीनची झेप ३४००...अकोला : गेल्या काही दिवसांपासून सोयाबीनच्या दरात...
‘निर्यात सुविधा केंद्रा’साठी प्रस्ताव...पुणे : राज्यातून अधिकाधिक शेतमाल निर्यात व्हावा,...
माहिती तंत्रज्ञानाचा वापर 'कृषी'त हवासोलापूर : "शेतकऱ्यांची ज्ञान, तंत्रज्ञान...
यंदाच्या 'उत्कृष्ट आदर्श गावा'विषयी...९ एप्रिलपूर्वीच निवड प्रक्रिया पूर्ण ...
कमी दाबाचे क्षेत्र अरबी समुद्राकडे सरकलेपुणे : उत्तर महाराष्ट्रात असलेले कमी दाबाचे...
सूक्ष्म सिंचन संच न बसविणाऱ्या...ऑनलाइन अर्जाला १५ मार्चपर्यंत मुदतवाढ पुणे :...
चला जालन्याला... ॲग्रोवनच्या कृषी...जालना : शेतकऱ्यांसह सर्वांचीच उत्सुकता लागून...
पीक विमा हप्त्याची रक्कम गेली कुठेअकोला : ‘शासकीय काम, सहा महिने थांब’ अशी एक...