agriculture news in Marathi, tupkar says this government makes false promises, Maharashtra | Agrowon

सध्याचे सरकार ‘गाजर’ दाखवणारे
टीम अॅग्रोवन
मंगळवार, 14 नोव्हेंबर 2017

अकोला ः सरकारने दिलेली कर्जमाफी नसून ही शेतकऱ्यांची थट्टा अाहे. अाज कुठल्याच शेतमालाला भाव नाही. हे सरकार शेतकऱ्यांना गाजर दाखविणारे अाहे. शासनाने सोयाबीनला सहा हजार अाणि कापसाला किमान सात हजार रुपये क्विंटलला भाव दिला पाहिजे. हा भाव न दिल्यास स्वाभिमानी शेतकऱ्यांच्या सोबतीने लढा उभारेल, असा इशारा स्वाभिमानी शेतकरी संघनटेचे नेते तथा महाराष्ट्र वस्त्रोद्योग महामंडळाचे माजी अध्यक्ष रविकांत तुपकर यांनी दिला. 

अकोला ः सरकारने दिलेली कर्जमाफी नसून ही शेतकऱ्यांची थट्टा अाहे. अाज कुठल्याच शेतमालाला भाव नाही. हे सरकार शेतकऱ्यांना गाजर दाखविणारे अाहे. शासनाने सोयाबीनला सहा हजार अाणि कापसाला किमान सात हजार रुपये क्विंटलला भाव दिला पाहिजे. हा भाव न दिल्यास स्वाभिमानी शेतकऱ्यांच्या सोबतीने लढा उभारेल, असा इशारा स्वाभिमानी शेतकरी संघनटेचे नेते तथा महाराष्ट्र वस्त्रोद्योग महामंडळाचे माजी अध्यक्ष रविकांत तुपकर यांनी दिला. 

वरवट बकाल (ता. संग्रामपूर) येथे स्वाभिमानी शेतकरी संघटनेने सोमवारी (ता. १३) अायोजित केलेल्या कापूस-सोयाबीन परिषदेत ते बोलत होते. या वेळी व्यासपीठावर संघटनेचे जिल्हाध्यक्ष कैलास फाटे, वाशीम जिल्हाध्यक्ष दामोदर इंगोले, युवा अाघाडी जिल्हाध्यक्ष प्रशांत डिक्कर यांच्यासह इतर उपस्थित होते.

या वेळी तुपकर पुढे म्हणाले, की सध्याचे राज्य व केंद्रातील सरकार हे सर्वसामान्य जनता व शेतकऱ्यांना गाजर दाखविणारे अाहे. निवडणुकीपूर्वी यांनी दिलेली अाश्वासनेच पाळली नाहीत, तर इतर बाबी दूर राहल्या. शेतमालाला भाव देऊ, स्वामिनाथन अायोगाच्या शिफारशी लागू करू, असे निवडणूक प्रचारात सांगणाऱ्या या सरकारमधील नेत्यांना सर्वच गोष्टींचा विसर पडला. सध्या शेतकरी मोठ्या अडचणीत अाहे. असे असताना तुम्ही सुलतानी पद्धतीने त्याचे कृषिपंपांचे कनेक्शन तोडायला निघालात. कर्जमाफीची घोषणा करून बराच काळ लोटला. किती शेतकऱ्यांच्या खात्यात पैसे जमा झाले, असा प्रश्नही त्यांनी सरकारला विचारला. शेतकऱ्याला भाव मिळवताना, कर्जमाफीचा लाभ घेताना, अाता शेतमाला विकताना सर्वत्रच त्रास दिला जात अाहे. अन्यायाविरुद्ध लढणारे कार्यकर्तेही स्वाभिमानी शेतकरी संघटनेची ताकद अाहे. या कार्यकर्त्यांना कुणी धमकावण्याचा प्रयत्न करत असेल, तर ते खपवून घेतले जाणार नाही, असे सांगत तुपकर यांनी राज्यात गाजत असलेला संग्रामपूर येथील तूर खरेदी घोटाळा स्वाभिमानी संघटना व शेतकऱ्यांच्या प्रयत्नांमुळेच उघड झाल्याचा दावा केला. 

शेतकऱ्यांचे प्रश्न न सोडवल्यास मंत्र्यांना विदर्भ, मराठवाड्यात फिरून देणार नाही, असा इशाराही त्यांनी दिला. प्रशांत डिक्कर यांनी संग्रामपूर तूर घोटाळा कसा उघडकीस अाणला, याची माहिती देत संघटना शेतकऱ्यांच्या प्रश्नांवर सातत्याने लढा देत राहील, असे सांगितले. या वेळी बाजारा समितीच्या प्रांगणात झालेल्या सभेला हजारोंच्या संख्येने शेतकरी उपस्थित होते.   

इतर ताज्या घडामोडी
कर्जमाफीची प्रक्रिया थंडावल्याने...सोलापूर : शेतमालाचे कोसळलेले दर, कर्जमाफी होऊनही...
योग्य पद्धतीने करा दालचिनी काढणीनोव्हेंबर ते मार्च या कालावधीत दालचिनी काढणीचा...
परभणीत फ्लॅावर प्रतिक्विंटल ४०० ते ७००...परभणी ः येथील जुना मोंढा भागातील फळे भाजीपाला...
भाजपची राष्ट्रीय परिषद ११ जानेवारीपासूननवी दिल्ली ः भारतीय जनता पक्षाच्या राष्ट्रीय...
यंत्रमाग १ तर प्रोसेस, सायझिंगला २...मुंबई  ः महाराष्ट्र राज्याचे वस्त्रोद्योग...
अटी, शर्ती काढल्या तरच कर्जमाफीचा फायदा नगर : सरकारच्या चुकीच्या धोरणामुळे कर्ज झाले आहे...
कर्जासाठी शेतकऱ्याचा बॅंकेसमोर मृत्यू...मुंबई : कर्जाच्या मागणीसाठी शेतकऱ्यांना स्टेट...
ग्रामपंचायतीच्या ८०० सदस्यांचे सदस्यत्व...सोलापूर : निवडणूक निकालानंतर सहा महिन्यांच्या आत...
प्रतापगडावर शिवप्रताप दिन उत्साहातसातारा : ढोल-ताशांचा रोमांचकारी गजर, छत्रपती...
कांद्याला पाचशे रुपये अनुदान द्यानाशिक : कांद्याला हमीभाव मिळत नसल्याने...
'प्रकल्पग्रस्त पुनर्वसनात वेळेचा अपव्यय...नाशिक : शासकीय अधिकारी काम कसे करतात, यावरच...
बचत गटांच्या सक्षमीकरणासाठी ‘...मुंबई : राज्यातील महिला सक्षमीकरणाशी निगडित...
वीस वाळू घाटांच्या लिलावाचा मार्ग मोकळाअकोला : मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठाने...
नांदेडमध्ये नाफेडतर्फे तूर खरेदी केंद्र...नांदेड ः केंद्र शासनाच्या आधारभूत किंमत खरेदी...
परभणीत आज शेतकरी सुकाणू समिती बैठकपरभणी : राज्यातील दुष्काळग्रस्त शेतकऱ्यांना मदत,...
सांगली बाजार समितीत हमालांचे आंदोलनसांगली ः कृषी उत्पन्न बाजार समितीतील हमालांनी...
नगर जिल्ह्यात हमी केंद्रांकडे शेतकरी...नगर ः आधारभूत किमतीने मूग, उडीद सोयाबीनची खरेदी...
शिवसेनेकडून जिल्हा परिषदेत नाराजांचे...जळगाव : जिल्हा परिषदेत तीन पंचवार्षिक भाजपसोबत...
शेतकरी मृत्यूप्रकरणी पाथरी बाजारपेठेत...पाथरी, जि. परभणी  : पीककर्जाच्या मागणीसाठी...
अण्णा हजारे यांनी कांदाप्रश्‍नी लक्ष...नगर ः शेतकऱ्यांना एक ते पाच रुपये किलो दराप्रमाणे...