agriculture news in marathi, tur and redgram high production alerts goverment | Agrowon

तूर, हरभऱ्याबाबत कृषी विभागाचा सतर्कतेचा इशारा
टीम अॅग्रोवन
बुधवार, 31 जानेवारी 2018

पुणे : राज्यात यंदा तूर व हरभऱ्याचे उत्पादन चांगले होण्याची शक्यता आहे. त्यामुळे बाजार व्यवस्थेचे नियोजन करण्यासाठी सतर्क राहावे लागेल. उत्पादनानुसार खरेदी व्यवस्था उभारण्यासाठी योग्य पावले टाकावीत, असे कृषी आयुक्तालयाने पणन विभागाला सूचित केले आहे. 

पुणे : राज्यात यंदा तूर व हरभऱ्याचे उत्पादन चांगले होण्याची शक्यता आहे. त्यामुळे बाजार व्यवस्थेचे नियोजन करण्यासाठी सतर्क राहावे लागेल. उत्पादनानुसार खरेदी व्यवस्था उभारण्यासाठी योग्य पावले टाकावीत, असे कृषी आयुक्तालयाने पणन विभागाला सूचित केले आहे. 

कृषी आयुक्तालय व पणन विभागाने कडधान्याचे यंदाचे उत्पादन आणि बाजार व्यवस्थेचा एका बैठकीत आढावा घेतला. कृषी आयुक्त सच्चिंद्र प्रतापसिंह तसेच महाराष्ट्र राज्य पणन मंडळाचे कार्यकारी संचालक सुनील पवार या वेळी उपस्थित होते. राज्यातील शेतकऱ्यांनी गेल्या वर्षी १५ लाख ३३ हजार हेक्टरवर तुरीची लागवड करून २० लाख ३५ हजार टन उत्पादन घेतले होते. जादा उत्पादनामुळे हमीभावाने तुरीची खरेदी करताना शासनाची दमछाक झाली होती. राज्यभरात १५२ तूर खरेदी केंद्रांवरून ७७ लाख क्विंटल तुरीची खरेदी शासनाला करता आली.

चालू हंगामात राज्यात १२ लाख २९ हजार हेक्टर क्षेत्रावर तुरीची लागवड झालेली आहे. लागवड जरी कमी दिसत असली तरी यंदा शेतकऱ्यांकडून किमान ११ लाख टन तूर विकण्यासाठी बाजारात आणली जाण्याची चिन्हे आहेत. त्यामुळे खरेदी व्यवस्थेचे चांगले नियोजन करावे लागणार असल्याचे कृषी विभागाकडून पणन विभागाला सूचित करण्यात आले आहे, असे सूत्रांनी स्पष्ट केले. 

तुरीप्रमाणेच यंदा पणन विभागाला हरभऱ्याच्या खरेदी केंद्रांकडे जास्त लक्ष द्यावे लागेल, असेही पणन विभागाच्या लक्षात आणून देण्यात आले आहे. राज्याचे हरभरा लागवडीखालील सरासरी क्षेत्र १३ लाख हेक्टर असताना शेतकऱ्यांनी १९ लाख २० हजार हेक्टरवर हरभरा लावला आहे. त्यामुळे यंदा हरभऱ्याचे बंपर पीक अपेक्षित आहे. त्यामुळे हमीभावाने हरभरा खरेदी करण्याबाबत शासनाला नियोजन करावे लागेल, असे कृषी विभागाचे म्हणणे आहे. 

खरेदी केंद्रांवर विक्रीसाठी तूर आणण्यापूर्वी शेतकऱ्यांना नोंदणी करावी लागणार आहे. त्याबाबत जागृती होण्यासाठी एम-किसान पोर्टलवरून शेतकऱ्यांना माहिती पाठवावी, अशा सूचनादेखील आयुक्तांनी दिल्या आहेत. या वेळी विस्तार संचालक विजय घावटे, आत्माचे संचालक सुभाष खेमनार, कृषी सहसंचालक अनिल बनसोडे, पणन संचालनालयाचे सहसंचालक ए. एल. घोलकर यांनी चर्चेत भाग घेतला.  

राज्यात तुरीची १५९ केंद्रे उघडणार 
गेल्या हंगामाच्या तुलनेत यंदा तुरीची उत्पादकता घटण्याची चिन्हे आहेत. हेक्टरी सरासरी १३.२७ क्विंटल तुरीची उत्पादकता गेल्या हंगामात होती. यंदा उत्पादकता ९ क्विंटल राहण्याची चिन्हे आहेत. तरीही तुरीचे एकूण उत्पादन राज्यात ११ लाख टनांच्या पुढे होण्याची शक्यता गृहीत धरून एकूण १५९ खरेदी केंद्रे उघडण्यास मान्यता द्यावी, असा प्रस्ताव केंद्र शासनाला पाठविण्यात आला आहे. एक फेब्रुवारीपासून राज्यात तुरीची खरेदी केंद्रे उघडतील व प्रत्यक्ष खरेदी पाच फेब्रुवारीपासून सुरू होईल, अशी माहिती सूत्रांनी दिली.

इतर अॅग्रो विशेष
आज संत तुकाराम बीजदेहू, जि. पुणे  : जगद्‌गुरू संत श्री तुकाराम...
उज्ज्वल भविष्याचा सर्वोत्तम मार्ग ‘जल...भारत जलसंकट समस्येचा सामना करत आहे. वाढती...
जल‘मुक्त’ शिवारवॉ टर ग्रीडच्या माध्यमातून मराठवाड्यातील सर्व...
राज्यात शंभर लाख टन साखर उत्पादनभवानीनगर, जि. पुणे ः राज्यात ३० टक्के हुमणीग्रस्त...
मध्य महाराष्ट्र, मराठवाड्यात अवकाळीची...पुणे : रविवारी, सोमवारी पुन्हा काही अंशी...
जैविक कीड-नियंत्रणासाठी उपयुक्त बुरशीगेल्या काही वर्षांमध्ये कीडनियंत्रणासाठी...
केशर आंबा फळगळीची कारणे अन् उपाययोजना  सद्यःस्थितीत हवामान आंबा झाडांसाठी...
रसदार उन्हाळी काकडी अर्थकारणाला देतेय...जळगाव जिल्ह्यात पाचोरा, जामनेर, यावल, जळगाव आदी...
बॅंक अधिकारी झाला पूर्णवेळ प्रयोगशील...विशाखापट्टण व त्यानंतर हैद्रराबाद येथे खासगी...
स्मार्ट प्रकल्पाचा केंद्रबिंदू शेतमाल ‘...पुणे : राज्यातील बहुतेक शेतकऱ्यांना आता पिकवायचे...
पूर्व विदर्भात गारपीटपुणे  ः दोन दिवसांपूर्वी मध्य भारतात तयार...
जनावराच्या आहारात पाणी महत्त्वाचेजनावरांचे योग्य पोषण होण्यासाठी तसेच दुग्धोत्पादन...
राज्यात १७८ तालुक्यांत भूजल चिंताजनकपुणे ः कमी झालेला पाऊस, वाढत असलेला पाण्याचा उपसा...
दरामुळे साखरेचा रंग फिकाकोल्हापूर : साखरेचे विक्री मूल्य वाढविल्यानंतरही...
‘उजनी’तील पाणीसाठा उणे पातळीत सोलापूर  ः सोलापूर जिल्ह्याची वरदायिनी...
राज्यभरात अन्नत्याग आंदोलनमुंबई ः शेतकरी साहेबराव करपे व कुटुंबीयांप्रती...
मार्चनंतरही पणन करणार कापूस बाजारात...यवतमाळ ः शेतकऱ्यांच्या घरातील कापूस विकल्या...
मढी यात्रेला बुधवारपासून प्रारंभनगर ः होळीच्या दिवशी सकाळी कानिफनाथांच्या समाधीला...
दर्जेदार ऊसबेण्याची केली निर्मिती काशीळ (ता. जि. सातारा) येथील उच्चशिक्षित व...
मतदानासाठी सकाळी सात ते सायंकाळी...अकोला ः देशात होत असलेल्या लोकसभा...