शासनाने दिलेला धनादेश ‘बाउन्स’

शासनाने दिलेला धनादेश ‘बाउन्स’
शासनाने दिलेला धनादेश ‘बाउन्स’

वाशीम : दैनंदिन व्यवहारात अनेकदा धनादेश बाउन्स झाल्याचे प्रकार घडतात. मात्र, वाशीम जिल्ह्यात तूर विक्री केलेल्या शेतकऱ्याला नाफेडने दिलेला धनादेश खात्यात पुरेशी रक्कम नसल्याने चक्क बाउन्स झाल्याचा प्रकार उघडकीस अाला अाहे. एक लाख १९ हजार ९८८ रुपयांचा हा धनादेश कोंडाळा झामरे गावातील महादेव सीताराम बुंदे या शेतकऱ्याला शासनाकडून मिळाला होता.  कोंडाळा झामरे गावातील शेतकरी महादेव बुंदे यांनी तीन जून २०१७ रोजी शासनाला २४ क्विंटल तूर विकली होती. या तुरीचे चुकारे मिळण्यास विलंब झाला. दरम्यानच्या काळात मात्र, त्यांनी मुलीचे लग्नसुद्धा जुळविले होते. लग्नाची तारीख निश्चित झाल्यानंतर तुरीचे पैसे मिळत नसल्याने उसनवार करून मुलीचे लग्न केले. त्यानंतर तब्बल दोन महिन्यांनी या शेतकऱ्याला तुरीच्या विक्रीपोटी शासनाने सेन्ट्रल बॅंकेच्या अनसिंग शाखेचा एक लाख १९ हजार ९८८ रुपयांचा धनादेश दिला. हा धनादेश या शेतकऱ्याला १३ ऑगस्टला मिळाल्यानंतर त्यांनी तो जिल्हा मध्यवर्ती सहकारी बॅंकेच्या वाशीम शाखेत अापल्या खात्यात वटविण्यासाठी टाकला. परंतु, या खात्यात पुरेशी रक्कम नसल्याचे कारण देत बँकेने हा धनादेश परत केला. तशी माहिती बॅंकेने सोमवारी (ता. २८) शेतकऱ्याला दिली. हे एेकून त्यांना धक्काच बसला.  बँकेने हा धनादेश परत केला असून, अाता पुन्हा ही रक्कम मिळवण्यासाठी शेतकऱ्याला शासकीय कार्यालयाच्या पायऱ्या झिजवाव्या लागणार अाहेत. दरम्यान, याप्रकरणी नेमकी कोणाची चूक झाली, याची चौकशी करणार असल्याचे नाफेडच्या अधिकाऱ्याने सांगितले. 

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com