agriculture news in marathi, Tur crope in problem | Agrowon

...अाता तुरीवर शेंगमाशीचा प्रादुर्भाव
टीम अॅग्रोवन
शनिवार, 2 डिसेंबर 2017

अकोला : क्रॉपसॅप प्रकल्पांतर्गत कृषी विज्ञान केंद्राने केलेल्या पाहणीत मुर्तिजापूर तालुक्यातील काही गावांमध्ये तूर पिकावर शेंग माशीचा प्रादुर्भाव झाल्याचे दिसून अाले अाहे. सध्या ही कीड अार्थिक नुकसान पातळीच्या खाली असली तरी शेतकऱ्यांनी खबरदारी घेण्याचे अावाहन करण्यात अाले अाहे.

कृषी विज्ञान केंद्राचे पीक संरक्षण विषयतज्ज्ञ डॉ. चारुदत्त ठिपसे, कृषी पर्यवेक्षक प्रकाश काळपांडे यांनी मुर्तिजापूर तालुकयातील हातगाव, देवरण, रामखेड, जितापूर नाकट, सिरसो, हिरपूर, टिपटाळा या गावात पाणी केली. पाहणीदरम्यान तूर पिकावर शेंगमाशीचा प्रादुर्भाव सुरु झाल्याचे दिसले.

अकोला : क्रॉपसॅप प्रकल्पांतर्गत कृषी विज्ञान केंद्राने केलेल्या पाहणीत मुर्तिजापूर तालुक्यातील काही गावांमध्ये तूर पिकावर शेंग माशीचा प्रादुर्भाव झाल्याचे दिसून अाले अाहे. सध्या ही कीड अार्थिक नुकसान पातळीच्या खाली असली तरी शेतकऱ्यांनी खबरदारी घेण्याचे अावाहन करण्यात अाले अाहे.

कृषी विज्ञान केंद्राचे पीक संरक्षण विषयतज्ज्ञ डॉ. चारुदत्त ठिपसे, कृषी पर्यवेक्षक प्रकाश काळपांडे यांनी मुर्तिजापूर तालुकयातील हातगाव, देवरण, रामखेड, जितापूर नाकट, सिरसो, हिरपूर, टिपटाळा या गावात पाणी केली. पाहणीदरम्यान तूर पिकावर शेंगमाशीचा प्रादुर्भाव सुरु झाल्याचे दिसले.

शेंगमाशीची मादी शेंगच्या सालीच्या अात अंडी घालते. अंड्यातून बाहेर अालेली अळी पांढऱ्या रंगाची असून बारीक, गुळगुळीत व बिनापायाची असते. अळी सुरवातीस दाण्याचा पृष्ठभाग खाते. त्यामुळे दाण्यावर नागमोडी खाचा दिसतात. दाणे अर्धवट कुरतडून खाल्ल्यामुळे दाण्याची मुकणी तयार होते. कोष लांबट गोल व लालसर रंगाचे असतात. शेंगमाशीच्या प्रादुर्भावामुळे दाणे सडून जातात. त्यांची उगवणशक्ती कमी झाल्यामुळे ते बिजवाईच्या व खाण्याच्या उपयोगाचे राहत नाही.

या किडीला अंडी घालण्यास प्रतिबंध व्हावा यासाठी अझाडिरॅक्टीन ३०० पीपीएम ५० मिली प्रति १० लिटर पाण्यात मिसळून फवारणी करावी. पाच टक्क्यांपेक्षा जास्त शेंंगा प्रादुर्भावग्रस्त अाढळून अाल्यास क्विनॉलफॉस २५ टक्के प्रवाही २० मिली किंवा लॅम्डा सायहॅलोथ्रिन ५ टक्के प्रवाही १० मिली किंवा क्लोरॅट्रॅनिलीप्रोल १८.५ टक्के प्रवाही तीन मिली घेऊन फवारणी करावी, असे अावाहन कृषी विज्ञान केंद्रातर्फे करण्यात अाले अाहे.

टॅग्स

इतर बातम्या
शेतकरी मंडळामुळे मिळाला ९० लाखांचा...वेंगुर्ले, जि. सिंधुदुर्ग : बॅंकेच्या चुकीमुळे...
पाणी अमूल्य असल्याने जनजागृतेची गरज ः...कोल्हापूर : ‘‘पाण्यासाठी व्यापक जनजागृती होणे...
शेतीपिकांना मोजूनच पाणी दिले पाहिजे ः...पुणे ः पाणी ही संपत्ती आहे; पण ती मोजली जात नाही...
येवला तालुक्यात हंडाभर पाण्यासाठी वणवणनाशिक : कमी पावसामुळे येवला तालुक्यात पाणीटंचाई...
हवामानविषयक समस्यांमुळे शेतीवर परिणाम ः...परभणी ः जागतिक तापमान वाढ, पावसातील अनियमितता,...
मतदार यादीत वाढला महिलांचा टक्कानगर : निर्दोष मतदार यादी तयार करण्यासाठी जिल्हा...
तापमानातील चढ-उताराचा अंजीर उत्पादकांना...परभणी : तापमानातील चढ-उतारामुळे अंजिराची फळे...
पाणीटंचाईच्या कामांनाही आचारसंहितेची झळभंडारा ः उन्हाच्या झळांसोबतच पाणीटंचाईचे संकटही...
तुरळक ठिकाणी पावसाची शक्यतापुणे : राज्यात उन्हाचा चटका वाढल्याने अनेक ठिकाणी...
शिल्लक साखरेचा दबाव पुढील हंगामावर?कोल्हापूर : केंद्राने सुरू केलेल्या कोटा...
‘सॉर्टेड सिमेन’चा प्रयोग यशस्वीनगर : गोदावरी खोरे नामदेवराव परजणे पाटील तालुका...
यंदा मतदानात महिला पुरुषांना मागे टाकणारनवी दिल्ली : लोकसभा निवडणुकांमध्ये पुरुषांपेक्षा...
शक्तिशाली उल्कापातापासून बचावली पृथ्वीपुणे ः अमेरिकेतील अवकाश संशोधन संस्था ‘नासा’...
संत्रा बागांना उरला केवळ टॅंकरचा आधारअमरावती : संत्रा बागा जगविण्यासाठी...
जांभरुण परांडे गावात जन्माला आली...अमरावती : जांभरुण परांडे (जि. वाशीम) येथे...
शेतकऱ्यांना व्यापार संधी उपलब्ध होणारपुणे : राज्यात फळे भाजीपाल्याचे वाढते...
मराठवाड्याच्या पाण्यासाठी फक्त बोलून...परभणी : केवळ जायकवाडीच्या हक्काच्या...
राज्यात चार हजाराने मतदान केंद्रे वाढलीमुंबई  : लोकसभा निवडणुकीसाठी राज्यात...
काँग्रेस-राष्ट्रवादीच्या महाआघाडीचा...मुंबई : गेले सहा महिने विविध समविचारी पक्षांशी...
चंद्रपूर : बांगडेंच्या उमेदवारीने...चंद्रपूर : गेल्या पंधरवाड्यापासून चंद्रपूर...