agriculture news in marathi, tur Decrease in demand in the market | Agrowon

यवतमाळ बाजारात तुरीच्या आवकेत घट
टीम अॅग्रोवन
गुरुवार, 24 जानेवारी 2019

यवतमाळ : तूर दराच्या चढउतारानंतर बाजार समितीच्या आवकेवर परिणाम झाला. बाजार समितीत रोज तीन हजार क्‍विंटल तुरीची आवक होत होती. मात्र दर कमी झाल्याने ती अवघ्या ९०० क्‍विंटलवर पोचली आहे.

यवतमाळ : तूर दराच्या चढउतारानंतर बाजार समितीच्या आवकेवर परिणाम झाला. बाजार समितीत रोज तीन हजार क्‍विंटल तुरीची आवक होत होती. मात्र दर कमी झाल्याने ती अवघ्या ९०० क्‍विंटलवर पोचली आहे.

शासनाने यंदा तुरीचे हमीभाव पाच हजारांच्यावर जाहीर केले. बाजारातही शनिवारपर्यंत समाधानकारक दर मिळाले. त्यामुळे शेतकऱ्यांनी तूर बाजारात विक्रीसाठी आणली. तुरीची आवक वाढल्याने सोमवारी (ता.२१) अचानक तुरीचे दर ५,४०० रुपयांवरून ४,७०० रुपयांपर्यंत खाली आले. त्यामुळे संतप्त शेतकऱ्यांनी व्यापाऱ्यांची खरेदी बंद पाडली. बाजार समिती सभापती, तहसीलदार, जिल्हा निबंधक कार्यालयातील अधिकाऱ्यांनी शेतकऱ्यांची बाजू ऐकली. त्यानंतर दरात काहीशी तेजी आली. ४,९०० ते ५,२४० रुपयांपर्यंत ते पोचले.

दरात काहीशी तेजी असली तरी ते हमीभावाच्या खालीच असल्याने शेतकऱ्यांनी आता वेट ॲण्ड वॉचच्या भुमिकेतून तूर बाजारात आणलीच नाही. त्यामुळे बाजरात तुरीच्या आवकेवर मोठा परिणाम झाला. 

शेतकऱ्यांना दर सुधारण्याची प्रतीक्षा

बाजार समितीत तुरीचे दर व्यापाऱ्यांनी पाडले. परिणामी तीन हजार क्‍विंटलपेक्षा अधिक तुरीची आवक होणाऱ्या बाजारात आता केवळ ८५० ते ९०० क्‍विंटल तूर पोचत आहे. दरातील तेजीचा अंदाज घेऊन शेतकरी आता बाजारात तूर आणतील, असे सांगण्यात आले.

इतर बाजारभाव बातम्या
जळगावात आले प्रतिक्विंटल २००० ते ६५००...जळगाव : कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये बुधवारी (ता...
जळगाव : कांदा दरात किंचित सुधारणा,...जळगाव : खानदेशातील प्रमुख बाजार समित्यांमध्ये...
अकोल्यात हरभरा प्रतिक्विंटल ३९०० ते...अकोला ः येथील कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये...
चिंचेचे दर दबावातसरुड, जि. कोल्हापूर : खुटाळवाडी (ता. शाहूवाडी)...
जळगावात गवार, हिरवी मिरची तेजीतजळगाव ः कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये मागील...
सोलापुरात मेथी, शेपू, कोथिंबिरीचे दर...सोलापूर ः सोलापूर कृषी उत्पन्न बाजार समितीच्या...
गुलटेकडीत भाजीपाल्याची आवक कमी;...पुणे ः गुलटेकडी येथील कृषी उत्पन्न बाजार...
औरंगाबादेत काकडी १२०० ते १८०० रुपये...औरंगाबाद : येथील कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये...
परभणीत हिरवी मिरची प्रतिक्विंटल ३००० ते...परभणी ः येथील पाथरी रस्त्यावरील फळे भाजीपाला...
राज्यात वांगी प्रतिक्विंटल ४०० ते ३०००...नाशिकला प्रतिक्विंटल १२०० ते ३००० रुपये नाशिक :...
सांगलीत गूळ प्रतिक्विंटल २८५० ते ३६३०...सांगली ः कृषी उत्पन्न बाजार समितीत गुळाची आवक कमी...
परभणी बाजार समितीमध्ये कापूस दरात...परभणी ः कापूस खरेदी हंगाम शेवटच्या टप्प्यामध्ये...
कोल्हापुरात टोमॅटो प्रतिक्विंटल ५०० ते...कोल्हापूर : येथील बाजार समितीत मंगळवारी टोमॅटोची...
गहू दरांवर दबाव, मका दरात वाढ शक्‍यजळगाव ः खानदेशातील मोजक्‍याच बाजार समित्यांमध्ये...
कळमणा बाजारात गव्हाची आवक २५०० क्‍...नागपूर ः कळमणा बाजार समितीत गव्हाची वाढती आवक...
बोरी बाजार समितीत हळदखरेदीस प्रारंभबोरी, जि. परभणी ः बोरी (ता. जिंतूर) येथील कृषी...
दुष्काळी स्थितीमुळे भाजीपाल्याची आवक...पुणे ः गुलटेकडी येथील कृषी उत्पन्न बाजार...
औरंगाबादेत हिरवी मिरची २००० ते ३६००...औरंगाबाद  : येथील कृषी उत्पन्न बाजार...
परभणीत मेथी प्रतिशेकडा ४०० ते ५०० रुपयेपरभणी ः येथील पाथरी रस्त्यावरील फळे भाजीपाला...
जळगाव जिल्ह्यात भेंडीच्या आवकेत वाढ, दर...जळगाव : भेंडीची आवक वाढत आहे. उठाव कायम असल्याने...