agriculture news in marathi, tur, gram farmers awaiting for 1150 crore | Agrowon

तूर, हरभऱ्याचे साडेअकराशे कोटी मिळेनात
टीम अॅग्रोवन
सोमवार, 18 जून 2018

सोलापूर : नैसर्गिक आपत्ती, गडगडणारे बाजारभाव, कर्जमाफीचा पत्ता नाही, साखर कारखान्यांकडून 'एफआरपी'चे पैसे मिळताना दिसत नाहीत, त्यातच हमीभावाने विकलेल्या हरभरा व तुरीचे पैसेही वेळेवर मिळत नाहीत. या कारणांमुळे शेतकरी हवालदिल झाला आहे. दोन महिन्यांहून अधिक कालावधी होऊनही तब्बल दोन लाख शेतकऱ्यांना तूर व हरभऱ्याचे १ हजार १४७ कोटी रुपये मिळालेले नाहीत.

सोलापूर : नैसर्गिक आपत्ती, गडगडणारे बाजारभाव, कर्जमाफीचा पत्ता नाही, साखर कारखान्यांकडून 'एफआरपी'चे पैसे मिळताना दिसत नाहीत, त्यातच हमीभावाने विकलेल्या हरभरा व तुरीचे पैसेही वेळेवर मिळत नाहीत. या कारणांमुळे शेतकरी हवालदिल झाला आहे. दोन महिन्यांहून अधिक कालावधी होऊनही तब्बल दोन लाख शेतकऱ्यांना तूर व हरभऱ्याचे १ हजार १४७ कोटी रुपये मिळालेले नाहीत.

सध्या पावसाने ओढ दिल्याने खरीपाच्या मशागतीला जोर आला आहे. परंतु, मशागत, खते व बी-बियाणे यासह अन्य कामांसाठी शेतकऱ्यांना हक्‍काचे पैसे मिळेनात. तुरीचे पैसे बहुतांशी शेतकऱ्यांना मिळाले. परंतु, १ मार्च ते १३ जून या कालावधीत हमीभावाने खरेदी केलेल्या हरभऱ्याची रक्‍कम सुमारे एक लाख शेतकऱ्यांना मिळालेलीच नाही. तसेच सुमारे पावणेदोन लाख शेतकऱ्यांकडील तूर व हरभरा अद्यापही हमीभावाने खरेदी करण्यात आलेला नाही. ज्या-ज्या शेतकऱ्यांची तूर हमीभावाने खरेदी झालेली नाही. त्यांना राज्य शासनाकडून प्रतिक्‍विंटल हजार रुपयांचे अनुदान मिळणार आहे. परंतु, अद्यापही बहुतांशी शेतकऱ्यांना त्याचा लाभ मिळालेला नाही. अशा परिस्थितीत खासगी सावकाराचे दार ठोठावण्याशिवाय दुसरा पर्यायच नसल्याची चर्चा सध्या शेतकऱ्यांमध्ये सुरू आहे. दरम्यान याबाबतीत सोमवारी मंत्रिमंडळाची बैठक होणार असल्याचे मार्केटिंग फेडरेशनकडून सांगण्यात आले.

तुरीचे न शिजलेले वरण

  • तूर नोंदणी शेतकरी    ४,५८,३०६
  • हमीभावाने तूर खरेदी    २५,८७,९१६ क्‍विंटल
  • वाटप केलेली रक्‍कम    ९६७.७५ कोटी
  • न मिळालेली रक्‍कम    ४३० कोटी
  • शिल्लक शेतकरी    १,८१,४४७

हरभरास्थिती

  • हरभरा नोंदणी शेतकरी    ३,०२,७२८
  • हमीभावाने खरेदी    १९,०२,००० क्‍विंटल
  • न मिळालेली रक्‍कम    ७१७.८८ कोटी
  • शिल्लक शेतकरी    १,४२,०२८

इतर ताज्या घडामोडी
भाजीपाला पिकांची रोपवाटिका तयार करतानाभाजीपाला पिकांची रोपवाटिका करताना योग्य ती काळजी...
परभणीत फ्लाॅवर प्रतिक्विंटल २००० ते...परभणी ः येथील जुना मोंढा भागातील फळे भाजीपाला...
पुण्यात फुलांची ७ काेटींची उलाढालपुणे ः फूल उत्पादक शेतकऱ्यांची भिस्त असणाऱ्या...
योग्य प्रमाणातच वापरा युरियानत्र पानांच्या पेशीमध्ये हरित लवकाची निर्मिती...
वनस्पतीतील संजीवकांमुळे अवकाशातही...पोषक घटकांची कमतरता आणि गुरुत्वाकर्षण कमी असणे या...
राज्यातील काही भागात अंशतः ढगाळ वातावरणमहाराष्ट्राच्या पश्‍चिम किनारपट्टीवर म्हणजेच कोकण...
सांगली जिल्हा बॅंकेला कर्जमाफीसाठी...सांगली ः राज्य शासनाच्या छत्रपती शिवाजी महाराज...
गूळ, बेदाणा, काजू महोत्सवास पुणे येथे...पुणे : दिवाळीच्या निमित्ताने ग्राहकांना रास्त...
'सरकारला दुष्काळाची दाहकता लक्षात येईना'पुणे  : यंदा ऑक्टोबर महिन्यातच धरणांमधील...
कर्नाटकात दुष्काळ जाहीर, मग...मुंबई  : ग्रामीण महाराष्ट्र दुष्काळात...
ऊसतोड मजूर महामंडळाला शंभर कोटींचा निधी...बीड   : याआधीच्या सरकारने दहा वर्षांत अडीच...
हिवरेबाजारमध्ये मांडला पाण्याचा ताळेबंदनगर  ः आदर्श गाव हिवरेबाजारमध्ये...
माण, खटाव तालुक्यांत पाणीटंचाई वाढलीसातारा   ः रब्बी हंगामाच्या तोंडावर पाऊस...
पुणे जिल्ह्यात खरिपात ६९ टक्के पीक...पुणे ः यंदा पाऊस वेळेवर न झाल्याने शेतकऱ्यांकडून...
बुलडाणा जिल्ह्यात १ लाख ६५ हजार...बुलडाणा  ः या रब्बी हंगामात जिल्ह्यात एक लाख...
यवतमाळ जिल्ह्यात जिल्हा प्रशासन उभारणार...यवतमाळ  ः शेतीला पूरक व्यवसायाची जोड देत...
अकोल्याला रब्बीसाठी हरभऱ्याचे वाढीव...अकोला  ः जिल्ह्यात रब्बी हंगामासाठी...
दुष्काळाची व्यथा मांडताना महिला...निल्लोड, जि. औरंगाबाद : विहिरींनी तळ गाठला, मक्‍...
कोल्हापूर जिल्ह्यात खरीप पिकांच्या...कोल्हापूर  : खरीप पिकांची काढणी वेगात...
सोलापुरातील अडचणीतील शेतकऱ्यांसाठी आश्‍...सोलापूर  ः सोलापूर जिल्ह्यात दुष्काळाची...