त्या दाव्यानं असे किती जीव ओढत नेले असतील त्यांनाच माहीत.
ताज्या घडामोडी
नगर ः तूर खरेदीला मुदतवाढ दिल्यानंतरही तूर खरेदीला फारसा वेग आलेला दिसत नाही. मुदतवाढीनंतर २०० शेतकऱ्यांकडून अवघी दोन हजार क्विंटल तूर खरेदी झाली आहे. जिल्ह्यामध्ये तूर व हरभरा खरेदीसाठी दोन लाख बारदाना गोण्यांची गरज आहे. मात्र, अजून बारदाना उपलब्ध झालेला नसल्याने खरेदीच्या अडचणीत भर पडत असल्याचे खरेदी केंद्रावरून सांगण्यात आले.
नगर ः तूर खरेदीला मुदतवाढ दिल्यानंतरही तूर खरेदीला फारसा वेग आलेला दिसत नाही. मुदतवाढीनंतर २०० शेतकऱ्यांकडून अवघी दोन हजार क्विंटल तूर खरेदी झाली आहे. जिल्ह्यामध्ये तूर व हरभरा खरेदीसाठी दोन लाख बारदाना गोण्यांची गरज आहे. मात्र, अजून बारदाना उपलब्ध झालेला नसल्याने खरेदीच्या अडचणीत भर पडत असल्याचे खरेदी केंद्रावरून सांगण्यात आले.
जिल्ह्यात गेल्या अडीच ते तीन महिन्यांपासून दहा खरेदी केंद्रांवर तूर खरेदी सुरू आहे. १८ एप्रिलला तूर खरेदी बंद केली होती. तोपर्यंत ११ हजार ५४० शेतकऱ्यांची सुमारे ६२ कोटी रुपये किमतीची एक लाख १३ हजार ७३८ क्विंटल तूर खरेदी झाली होती. त्या वेळी १६ हजार ९३ शेतकऱ्यांनी ऑनलाइन नोंदणी केलेली असल्याने चार हजार६५३ शेतकरी तूर विक्रीच्या प्रतीक्षेत होते.
तूर खरेदीस मुदत वाढ दिल्यानंतर खरेदीला पुन्हा सुरवात झाली. मात्र, खरेदीसमोरील अडचणी संपायला तयार नाहीत. मुदतवाढ मिळून आता जवळपास १५ दिवसांचा कालावधी संपला आहे. १५ मेपर्यंत तूर खरेदी सुरू राहणार आहे, मात्र जिल्ह्यामध्ये गेल्या पंधरा दिवसांत अवघ्या २०० शेतकऱ्यांकडून दोन हजार क्विंटल तूर खरेदी झाल्याचे दिसत आहे.
जिल्हाभरात झालेली नोंदणी आणि एकंदर अंदाजानुसार अजून साधारण एक लाख क्विंटल तूर-हरभरा खरेदी होण्याचा मार्केटिंग फेडरेशनचा अंदाज आहे. त्यानुसार नियोजन केले जात असले तरी आता खरेदीला बारदान्याची अडचण आहे. सध्या जवळपास सात ते आठ केंद्रांवर बारदाना उपलब्ध नसल्याने खरेदी थंडावली आहे.
राज्य खाद्य निगम महामंडळाकडे दोन लाख गोण्यांची मागणी केली आहे. मात्र, बारदाना उपलब्ध झालेला नव्हता. जिल्ह्यात अजून साधारण २५ हजार क्विंटल तूर खरेदी अपेक्षित आहे. आतापर्यंत तेरा केंद्रांवर हरभरा खरेदी चालू आहे. जवळपास ७० हजार क्विंटल हरभरा खरेदी झाला आहे. अजून हरभऱ्याची साधारण पन्नास ते साठ हजार क्विंटलच्या जवळपास खरेदी अपेक्षित आहे. मात्र, मुदतवाढ मिळून तूर खरेदीचे शुक्लकाष्ट काही संपायला तयार नाही.
मुदतवाढीमुळे तूर खरेदी १५ मेपर्यंत सुरू राहणार आहे. बारदाना मिळावा यासाठी आम्ही प्रयत्नशील आहोत. हरभऱ्याचीही आवश्यक तेवढी खरेदी होणार आहे. तूर-हरभरा खरेदीसाठी बारदान्याची मागणी केलेली आहे, असे मार्केटिंग फेडरेशनचे अधिकारी भारत पाटील यांनी सांगितले.
- 1 of 347
- ››