agriculture news in marathi, tur harvesting start, sangli, maharashtra | Agrowon

सांगली जिल्ह्यात तुरीची काढणी सुरू
टीम अॅग्रोवन
रविवार, 17 डिसेंबर 2017
शासनाने तूर खरेदीच्या अडचणीत वाढ केली होती. याचा तोटा आजही आम्हाला सहन करावा लागतोय. यंदा तूर पिकासाठी हवामान अनुकूल नव्हते. त्यामुळे उत्पादनात १० टक्‍क्‍यांनी घट होणार आहे. मात्र गेल्या वर्षीपेक्षा यंदा दर वाढलीत अशी आशा आहे.
- काळाप्पा पाटील, जालिहाळ खुर्द, ता. जत, जि. सांगली
सांगली ः जिल्ह्यात खरीप हंगामातील पेरणी झालेल्या तूर पिकाची काढणी सुरू झाली आहे. गेल्या वर्षी तूर खरेदीच्या गोंधळामुळे शेतकऱ्यांनी तूर पिकाच्या लागवडीकडे पाठ फिरवली होती. त्यातच पाण्याची टंचाईचा परिणामदेखील या पिकावर झाला. त्यामुळे क्षेत्रात सुमारे ४५०० हेक्‍टरने घट झाली. यंदाच्या हंगामात तुरीचे उत्पादन सुमारे सरासरी ४० टक्‍क्‍यांनी घटण्याची शक्‍यता असल्याची चर्चा शेतकऱ्यांमध्ये सुरू आहे. 
 
दुष्काळी पट्ट्यातील आटपाडी, जत, कवठे महांकाळ, तासगाव तालुक्‍यात तूर पीक प्रामुख्याने घेतले जाते. मात्र गेल्या वर्षी तूर खरेदी केंद्रावर त्याची विक्री करण्यासाठी अनेक अडथळे निर्माण झाले होते. त्यामुळे शेतकऱ्यांनी स्थानिक बाजारपेठेचा आधार घेतला होता. याचा फटका शेतकऱ्यांना बसला. परिणामी, यंदाच्या खरीप हंगामात तूर पिकाचा पेरा कमी झाला. त्यातच पावसाने ओढ दिली. त्यामुळे पाणीटंचाई निर्माण झाली. भूजल पातळीत वाढ झाली नाही. खरीप हंगामात पेरणी केलेली तूर पाण्याअभावी वाळून गेली.
 
पाण्याची कमतरता आणि बदलते वातावरण यामुळे तूर पिकावर कीड - रोगांचा प्रादुर्भाव झाला होता. यामुळे तुरीचे उत्पादन कमी होण्याची शक्‍यता आहे. जत तालुक्‍यात सध्या आगाप पेरणी केलेल्या तुरीची काढणी सुरू झाली आहे. मात्र निसर्गाच्या लहरीपणामुळे उत्पादकता ही कमी झाली असल्याचे चित्र आहे. त्यामुळे शेतकऱ्यांचे आर्थिक नुकसान मोठ्या प्रमाणात होणार आहे.

तूर काढणीचा हंगाम सुरू झाला आहे. गेल्या वर्षी केवळ सांगली येथील बाजार समितीत तूर खरेदी केंद्र सुरू केले होते. जिल्ह्यातील आटपाडी, जत, हे दोन तालुके सुमारे सांगलीपासून १०० किलोमीटर अंतरावर आहेत. यामुळे गेल्या वर्षी या भागातील शेतकऱ्यांना तूर विक्रीसाठी सांगली येथे येणे परवडत नव्हते.

परिणामी, शेतकऱ्यांना कमी दरात तुरीची विक्री करावी लागली होती. यंदाचा हंगाम सुरू झाला आहे. शासन या वेळी तूर खरेदी केंद्र सुरू करणार का? जत व आटपाडी तालुक्‍यांतील बाजार समितीत तूरखरेदी केंद्र सुरू होणार का, असा प्रश्‍न तूर उत्पादक शेतकरी उपस्थित करू लागले आहेत. 

जत तालुक्‍यात पेरणीपासून पाण्याची टंचाई निर्माण झाली होती. यामुळे तूर पिकाची अपेक्षित वाढ झाली नाही. याचा फटका शेतकऱ्यांना बसला आहे. पाणीटंचाई असल्याने काही शेतकऱ्यांनी तूर पिकावर नांगरदेखील फिरवले होते. मात्र या तालुक्‍यात सुमारे तुरीचे ३० टक्‍क्‍यांनी उत्पादन घटण्याची शक्‍यता आहे. वास्तविक पाहता एकरी उत्पादनही मोठी घट होणार असल्याची माहिती श्रीकृष्ण शिंदे यांनी दिली.

इतर ताज्या घडामोडी
जात पडताळणीसाठी रक्त नात्यातील दाखला...नागपूर : रक्त नात्यातील व्यक्तीची जात पडताळणी...
कोंबडीखताचा वापर कसा करावा?मशागतीच्या वेळी पेरणीपूर्वी एक ते दीड महिना अगोदर...
ऊस पाचटाचे गांडूळ खत कसे तयार करावे?गांडूळ खताच्या निर्मितीसाठी उत्तम निचरा होणारी...
कृषी सल्ला : कापूस, भुईमूग, बाजरी, मका... कापूस बीटी कापूस बोंड अळ्यांना प्रतिकारक्षम...
मका, सोयाबीन, हळदीच्या भावात घसरणएनसीडीईएक्समध्ये या सप्ताहात साखर व सोयाबीन वगळता...
अभिनव पद्धतीने सणसरला आंदोलनभवानीनगर, जि. पुणे   ः सणसर येथील कुरवली...
मराठा आरक्षणासाठी सरकार कटिबद्ध :...नागपूर : मराठा समाजाला शिक्षण आणि सरकारी नोकरीत...
पुणे जिल्ह्यातील काही भागांत पावसाची...पुणे  ः जिल्ह्यातील अनेक भागांत गेल्या दहा...
खारपाणपट्ट्यात भूसुधारणा कार्यक्रम...अकोला  : जिल्ह्यात खारपाणपट्ट्याचे प्रमाण...
...तर जिनिंग मिल मालकांविरोधात कारवाई ः...वर्धा   ः गुलाबी बोंड अळी नियंत्रणासाठी...
अकोले तालुक्‍यात पावसाचा जोर कायमनगर  : अकोले तालुक्‍याच्या पश्‍चिम भागात...
स्वाभिमानीचा सर्जिकल स्ट्राईक,...कोल्हापूर : कोल्हापूर जिल्ह्याच्या कानाकोपऱ्यातून...
सातारा जिल्ह्यात दूध दरप्रश्नी तिसऱ्या...सातारा   ः स्वाभिमानी शेतकरी संघटनेने...
संतश्रेष्ठ तुकोबाराय पालखीचे सोलापूर...सोलापूर : पिटू भक्तिचा डांगोरा । कळिकाळासी दरारा...
कोयना, कण्हेर धरणांतून विसर्गसातारा : जिल्ह्यात पावसाचा जोर कायम आहे. बुधवारी...
कर्नाटकातून येणारे दूध आंदोलकांनी अडवलेसोलापूर :  दुधाच्या वाढीव दरासाठी स्वाभिमानी...
किणी टोल नाका येथे पोलिसांची जबरदस्ती;...कोल्हापूर- : स्वाभिमानीने शेतकरी संघटनेने पुणे...
कनिष्ठ सहायकाची एक वेतनवाढ बंदनाशिक  : जिल्हा परिषदेची सभा असो की मुख्य...
भेंडीची वेळेवर लागवड आवश्यकभाजीपाला पिकांमध्ये भेंडी पिकाची लागवड वाढत आहे....
दूध दरप्रश्‍नी राज्य सरकार दोषी : राज...पुणे  ः दूधदराचा प्रश्न गंभीर होत आहे....