agriculture news in marathi, tur procurement centers will not open in five taluka, jalgaon, maharashtra | Agrowon

पाच तालुक्‍यांत सुरु होणार नाहीत तूर खरेदी केंद्र
टीम अॅग्रोवन
गुरुवार, 28 डिसेंबर 2017
तूर खरेदी केंद्र जानेवारीच्या मध्यात सुरू करण्याचे नियोजन आहे. त्यासंबंधीची प्राथमिक तयारी केली आहे. शेतकरी संघांना तूर विक्रीसंबंधीच्या नोंदणीचे आवाहन केले आहे. 
- परिमल साळुंखे, 
पणन अधिकारी, मार्केटिंग फेडरेशन.
जळगाव : जिल्ह्यात शासकीय तूर खरेदी केंद्र सुरू करण्यासंबंधी मार्केटिंग फेडरेशनने प्राथमिक तयारी केली असून, जिल्हाभरातील १० तालुक्‍यांच्या शेतकरी संघांना खरेदीसंबंधी ऑनलाइन नोंदणीच्या सूचना दिल्या आहेत. यंदा मनुष्यबळाअभावी पाच तालुक्‍यांमध्ये तूर खरेदी केंद्र सुरू होणार नसल्याची माहिती मिळाली आहे.
 
तुरीला शासकीय यंत्रणांनी ५४५० रुपये प्रतिक्विंटल दर जाहीर केला आहे. दर्जेदार, कचरारहित तूर या केंद्रात खरेदी केली जाईल. त्यासंबंधीचे निकषही जारी केले आहेत. जिल्ह्यात यंदा भडगाव, यावल, भुसावळ, धरणगाव व पारोळा या तालुक्‍यांमध्ये तूर खरेदी केंद्र सुरू होणार नाहीत. उर्वरित १० तालुक्‍यांमध्ये केंद्र असतील. त्यात जळगाव, मुक्ताईनगर, बोदवड, जामनेर, रावेर, अमळनेर, चाळीसगाव, पाचोरा, चोपडा व एरंडोल येथे तूर खरेदी केंद्र सुरू होतील. संबंधित तालुक्‍यांच्या शेतकरी सहकारी खरेदी विक्री संघांची सबएजंट म्हणून मार्केटिंग फेडरेशनने नियुक्ती केली आहे.
 
तूर उत्पादकांना ऑनलाइन नोंदणी बंधनकारक आहे. नोंदणी शेतकरी संघात केली जाईल. त्यासाठी तूर पिकाची नोंद असलेला अलीकडचा सात बारा उतारा, शेतकऱ्यांच्या बॅंक खात्याच्या पासबुकची झेरॉक्‍स, आधार कार्ड याची गरज आहे. तूर विक्रीची रक्कम थेट शेतकऱ्याच्या खात्यात जमा होईल. 
 
जिल्ह्यात तूर काढणी पुढील महिन्यात खऱ्या अर्थाने सुरू होईल. जानेवारीअखेर तूर काढणी वेगात असते. जिल्ह्यात सुमारे सहा हजार हेक्‍टरवर तुरीची पेरणी झाली होती. उत्पादनही यंदा बऱ्यापैकी येईल, असे चित्र आहे. ही बाब लक्षात घेता जानेवारी २०१८ च्या मध्यात तूर खरेदी केंद्र सुरू करण्याचे नियोजन मार्केटिंग फेडरेशन करीत असल्याची माहिती मिळाली. 
टॅग्स

इतर ताज्या घडामोडी
शिफारशीत मूग जातींची निवड महत्त्वाची...गेल्या काही वर्षांमध्ये मुगाचे दर वाढते असल्याने...
माफसू : मुलाखतीपासून उमेदवार वंचितनागपूर : महाराष्ट्र पशू आणि मत्स्य विज्ञान...
पिंक बेरी, भुरी, क्रॅकिंग टाळण्यासाठी...सध्याच्या वाातावरणामध्ये द्राक्ष बागेमध्ये पिंक...
तंत्र उन्हाळी तीळ लागवडीचे...सुपीक व उत्तम निचरा असलेल्या मध्यम ते भारी जमिनीत...
खानदेशात अजूनही कांदा लागवड सुरूचजळगाव : धुळ्यासह जळगाव जिल्ह्यात अजूनही कांदा...
गोड दह्याच्या निवळीपासून तेलाची...योगर्ट (दही) निर्मिती उद्योगामध्ये गोड...
आर. बी. हर्बल अॅग्रोचे ‘भू-परीस’...मार्केट ट्रेंडस्.. आर. बी. हर्बल अॅग्रो ही...
ई-नामसाठी डायनॅमिक कॅश क्रेडिट बंधनकारकपुणे ः आॅनलाइन राष्ट्रीय कृषी बाजार याेजनेत (ई-...
सिंधुदुर्ग जिल्ह्यात विस्तारतेय ऊसशेतीसिंधुदुर्ग : आंबा, काजू व अन्य मसाला पीक...
मुख्यमंत्री शाळा बंद करताहेत : अजित पवारबीड : सरकार मस्तीत आहे. पंतप्रधान नरेंद्र...
माजी राज्यमंत्र्यांचे विहिरीत आंदोलनअकोला : बुलडाणा जिल्ह्यातील पाणीपुरवठा योजनांमधील...
शासकीय निधी खर्चाची माहिती आता एका क्‍...रत्नागिरी - ग्रामीण भागात होणाऱ्या कामांचा...
जळगावात चवळी शेंगा २००० ते ३००० रुपये...जळगाव : येथील कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये...
संत्र्याची झाडे पिवळी पडल्याने...अकोला : मृग बहराने दगा दिल्याने संत्रा उत्पादक...
अापल्या खात्यावर फक्त अापलाच अधिकारबँकेत भीमाबाईचं खातं राधाच्या ओळखीमुळे निघालं, हे...
सीड प्लॉटधारकांनाही बोंड अळीचा फटकाअकोला : कापूस उत्पादनासोबतच सीड प्लॉट...
नागपूर जिल्ह्यात गव्हाचे क्षेत्र आठ...नागपूर  :  पेंच प्रकल्पामुळे उद्‌भवलेला...
सोलापूरात २४०८ क्विंटल उडीद, मूग,...सोलापूर  : नाफेडच्या वतीने सोलापूर कृषी...
परभणीत ‘जलयुक्त’ची एक हजारांवर कामे... परभणी : जिल्ह्यात जलयुक्त शिवार अभियानाच्या...
मधमाश्यांच्या वसाहतीत वाढतेय...अमेरिकेतील इल्लिनॉईज विद्यापीठामध्ये झालेल्या...