agriculture news in Marathi, tur procurement order received but procurement stopped, Maharashtra | Agrowon

आदेश पोचले, खरेदी ठप्पच !
टीम अॅग्रोवन
गुरुवार, 26 एप्रिल 2018

३० नोव्हेंबर २०१७ ला ऑनलाइन नोंदणी झाल्याचा मेसेज आला, पण तूर घेऊन या म्हणून अजून मेसेज आला नाही. चौकशी केली तर अजून पत्र नाही, खरेदी सुरू नसल्याचं फोनवर बाजार समितीकडून सांगितलं जातं. २६ मार्च २०१८ ला परळी बाजार समितीला याविषयी लेखी पत्र दिलं, पणं उत्तर काही मिळनां. खरेदी सुरू नाही अन्‌ नोंदणी असून घेऊन येण्याचा मेसेज नाही, ज्यांनी तरू घातली त्यांना पैसे नाही. कशी ऑनलाइन अन्‌ झटपट खरेदी म्हणावं. 
- धनंजय सोळंके, नागापूर, ता. परळी, जि. बीड.

औरंगाबाद : तूर खरेदीसाठीच्या मुदतवाढीचे आदेश अखेर सोमवारी (ता.२३) प्रत्येक जिल्हास्तरावर व तेथून केंद्रस्तरापर्यंत धडकले, परंतु अनेक केंद्रांवर तूर खरेदीसाठी जागाच नसल्याने तूर खरेदीच सुरू करता येणे शक्‍य झाले नसल्याची माहिती सूत्रांनी दिली. शिवाय शेतकऱ्यांना आपला माल घेऊन या म्हणणारे एसएमएस मिळाले नसल्याने आपला माल केंद्रावर घेऊन जावा किंवा नाही, या विवंचनेत शेतकरी अडकले आहेत.
 
केंद्रीय कृषिमंत्र्यांनी तूर खरेदीसाठी पंधरवड्याची मुदतवाढ देण्याची घोषणा केली. घोषणेनंतर तिसऱ्या दिवशी आदेश प्रत्येक जिल्हास्तरावर पाठविले. सोमवारपासून प्रत्येक जिल्हास्तरावरून केंद्रस्तरावर सूचना देवूऊन तुरीची खरेदी सुरू करण्याचे सांगीतले गेले, परंतु प्रत्यक्षात अनेक केंद्रावर आधी खरेदी केलेल्या तुरीलाच साठवण्यासाठी जागा नसल्याने नव्याने खरेदी केल्या जाणाऱ्या तुरीची साठवण करावी तरी कुठे, या विवंचनेत मराठवाड्यातील बहुतांश केंद्रांवर तुरीची खरेदी प्रत्यक्षात सुरू करता येणे शक्‍य झाले नसल्याची माहिती सूत्रांनी दिली. जशी जागा उपलब्ध होईल तशी तूर खरेदी करण्याचे सांगितले जात असले, तरी यामध्ये नोंदणी केलेल्या शेतकऱ्यांची पारदर्शकपणे क्रमवारीने तूर खरेदी होईल की नाही, याविषयी शंका आहे. 

दुसरीकडे आपला नंबर केव्हा येणार, याविषयी फोनवरून चौकशी करणाऱ्या शेतकऱ्यांना काही केंद्रावरून समाधानकारक उत्तर मिळत नाही किंवा काही ठिकाणांहून अजून आदेशच आले नसल्याचे सांगून मोकळे होण्याचा प्रयत्न केला जात असल्याची स्थिती आहे. जिल्हास्तरावर आदेश आले असताना ते केंद्रस्तरावर गेले नसतील का, वशिलेबाजी केली तर क्रमांक लागतो का, असा प्रश्न या निमित्ताने शेतकऱ्यांच्या मनात घर करून गेला आहे.  

प्राप्त माहितीनुसार लातूर जिल्ह्यात ४० हजारांवर ,तर बीड जिल्ह्यात ३१ हजारांवर, उस्मानाबाद जिल्ह्यात १७ हजार ५०० शेतकऱ्यांनी ऑनलाइन नोंदणी केली. लातूर जिल्ह्यात १३ हजार, बीड जिल्ह्यात १४ हजारांवर, तर उस्मानाबाद जिल्ह्यात ११ हजार ४६३ शेतकऱ्यांचीच तूर खरेदी करण्यात आली. लातूर आणि  बीड जिल्ह्यात मोठ्या प्रमाणात आधी खरेदी केलेला माल केंद्रावर पडून आहे. त्यामुळे अशा केंद्रावर जोवर जागा उपलब्ध होत नाही तोवर नव्याने तुरीची खरेदी सुरू होईल का हा प्रश्न आहे. 
 

इतर अॅग्रो विशेष
वेतन आयोग ठीक; पण शेतकरी आयोगाचे काय?१९४७ ते १९९० आणि १९९० ते २०१८ असे दोन भाग केले,...
वीजवापरातील ‘अंधार’वी ज दरवाढ तसेच शेती पंपासाठीची बिलं दुरुस्त करून...
परोपजीवी मित्रकीटकांची ओळखअळी-कोष-परोपजीवी (Larval-Pupal Parasitoid) या...
सांगलीत वाढली दुष्काळाची दाहकतासांगली : जिल्ह्यात दुष्काळाची दाहकता वाढत आहे....
साखर कारखान्यांचे बॉयलर लवकर थंडावणारपुणे  : दुष्काळी स्थितीमुळे साखर...
नंदुरबार बाजार समितीत ओल्या लाल मिरचीची...जळगाव  ः खानदेशात एकीकडे थंडीने केळीला मोठा...
ॲग्रोवन स्मार्ट ॲवॉर्डसाठी शेतकऱ्यांचा...पुणे : संकटांपुढे हार न मानता प्रतिकूल...
टंचाईग्रस्त विसापूर झाले पाणीदार सातारा जिल्ह्यातील माण व खटाव कायम तीव्र...
विदर्भात गारपिटीचा इशारा; राज्यात...पुणे : पावसाला पोषक हवामान होत असल्याने आजपासून (...
‘एफआरपी’ची थकबाकी ४० हजार कोटींपर्यंत...पुणे : साखर उद्योगात तयार झालेल्या संकटामुळे...
गूळ उद्योगाला आर्थिक स्थैर्य देणे...मुंबई : ऊस उत्पादक शेतकऱ्यांचे हित जपतानाच...
दुधाळ जनावरे वाटप योजनेत देशी गाईंचा...पुणे : देशी गोवंशाच्या संवर्धनासाठी संकरित दुधाळ...
बांबूशेतीमध्ये शेतकऱ्यांचे अर्थकारण...सोलापूर : ‘‘बांबू हे गवतवर्गीय पीक आहे....
‘ई-नाम’द्वारे देशातील बाजार समित्या...मुंबई : देशातील सर्व बाजार समित्या ‘ई-नाम’...
वेतन आयोगाने वाढते गरीब-श्रीमंतांतील दरीमाजी पंतप्रधान डॉ. मनमोहनसिंग यांनी ४ ...
दूध दरवाढीसाठीही दाखवा तत्परताआंतरराष्ट्रीय बाजारात दूध भुकटीचे (पावडर) दर...
मक्यातील लाग रंग येण्यामागील गूढ उलगडलेमक्यामध्ये काहीवेळा दिसणाऱ्या लाल रंगाच्या...
एफआरपी तुकड्यात घेणार नाही : खासदार...सांगली : राज्यातील साखर कारखाने सुरू होऊन ८० दिवस...
राज्यात १७८६ टॅंकरव्दारे पाणीपुरवठापुणे  : सलग दोन वर्षे पावसाने ओढ दिल्यानंतर...
केळी पट्ट्याला १५० कोटींचा फटकाजळगाव ः डिसेंबर व जानेवारी महिन्यातील थंडीचा...