agriculture news in marathi, tur procurement process issue, nagar, maharashtra | Agrowon

मिरजगाव येथे यंत्रणा सुरळीत, मात्र खरेदी केंद्रावर शुकशुकाट
सुर्यकांत नेटके
गुरुवार, 19 एप्रिल 2018
तूर खरेदी करण्याची आज (बुधवारी ता. १८) मुदत संपत आहे. मात्र अजूनही अनेक शेतकऱ्यांकडे तूर पडून आहे. सरकारने ठरवल्याच्या उद्दिष्टानुसार पन्नास टक्केही तूर खरेदी झाली नाही. त्यात तीन दिवस ऑनलाइन यंत्रणा बंद असल्याने अनेक शेतकऱ्यांना नोंदणी करता आली नाही. त्यामुळे तूर खरेदीची मुदत वाढवून मिळावी.
- प्रशांत गायकवाड, सभापती, बाजार समिती, पारनेर, जि. नगर
नगर : तूर, हरभरा खरेदीसह अन्य बाबी ऑनलाइन करणारी यंत्रणा दोन-तीन दिवसांपासून बंद असल्यानंतर बुधवारी (ता.१८) शेवटच्या दिवशी सकाळी अकरा वाजता सुरू झाली. मात्र, शेतकऱ्यांना ‘एसएमएस’ गेले नसल्याने दुपारपर्यंत खरेदी केंद्रावर शुकशुकाटच होता. दुपारी तीननंतर काहीशी खरेदी सुरू झाली.
दरम्यान, अनेकांकडे तूर शिल्लक असल्याने नोंदणीला व खरेदीला मुदत वाढवून देण्याची मागणी शेतकऱ्यांनी केली आहे.
 
नाफेडतर्फे सुरू करण्यात आलेल्या तूर, हरभरा खरेदीसह अन्य बाबी ऑनलाइन करणाऱ्या चांदुर मार्ग (मुंबई) येथील ‘सर्व्हर’ यंत्रणा सोमवारी (ता. १६) जळाल्याने तूर, हरभरा खरेदीची ऑनलाइन यंत्रणा कोलमडली होती. बुधवारी सकाळी अकरा वाजता यंत्रणा सुरू झाली असल्याचे ऑनलाइन यंत्रणेचे काम करणाऱ्या "एनईएमएल'' (नॅशनल ई मार्केटिंग लि.) या संस्थेच्या समन्वयकाने सांगितले.
 
शेतकऱ्यांनी तूर विक्रीसाठी ऑनलाइन नोदणी केलेली आहे, त्यांना तूर विक्रीसाठी केंद्रावर आणावी म्हणून `एसएमएस`' पाठवले जातात. मात्र तीन दिवस यंत्रणा बंद असल्याने `एसएमएस`' गेले नाहीत. त्यामुळे आज ऑनलाइन यंत्रणा सुरू झाली खरी, मात्र एसएमएस गेले नसल्याने दुपारपर्यंत जिल्ह्यामधील खरेदी केंद्रावर शुकशुकाट होता.
 
कर्जत, मिरजगाव भागात तुरीचे उत्पादन चांगले झाले 
आहे. शासनाने हमी खरेदी केंद्र सुरू केल्याने शेतकऱ्यांना दिलासा मिळाला. तीन महिन्यापासून सुरळीत खरेदी सुरू आहे. तीन दिवस ऑनलाईन बंद असल्याने शेतकऱ्यांना नोंदणी करता आली नाही. त्यामुळे मुदत वाढवून देण्याची मागणी करणार असल्याचे मिरजगाव (ता. कर्जत) येथील तूर खरेदी केंद्र चालक संपत बावडकर यांनी सांगितले.

नगर जिल्ह्यामध्ये २१ हजार हेक्‍टर क्षेत्रावर तुरीचे पीक घेतले. यंदा कृषी विभागाच्या अहवालानुसार हेक्‍टरी ११ क्विंटल ४० किलोनुसार तूर खरेदी केली. आतापर्यंत जिल्ह्यामध्ये दहा खरेदी केंद्रावर बुधवारपर्यंत १ लाख १० हजार ६९० क्विंटल तूर खरेदी झाली. मात्र शेतकऱ्यांकडून मिळालेल्या माहितीनुसार जिल्ह्यामध्ये प्रतिहेक्‍टरी अठरा ते वीस क्विंटलप्रमाणे जिल्हाभरात सुमारे पावणे चार लाख क्विंटलच्या जवळपास तुरीचे उत्पादन झाल्याचा अंदाज आहे. बाजारात आतापर्यंत साधारण ८० हजार ते एक लाख क्विंटल तुरीची विक्री झाली. अजूनही जिल्ह्यात सुमारे पावणेदोन लाख क्विंटलच्या जवळपास तूर शिल्लक आहे.

 

इतर ताज्या घडामोडी
जळगाव जिल्ह्यात नवती केळीचे दर स्थिरजळगाव ः जिल्ह्यात नवती केळीचे दर मागील आठवड्यात...
कोल्हापुरात फळांची आवक मंदावली,...कोल्हापूर : येथील कृषी उत्पन्न बाजार समितीत या...
कळमणा बाजारात सोयाबीनच्या दरात वाढनागपूर ः सोयाबीनच्या दरात अल्पशी वाढ वगळता कळमणा...
नाशिकला टोमॅटोची आवक वाढली; कांदा,...नाशिक : नाशिक बाजार समितीत गतसप्ताहात टोमॅटोची...
कपाशीतील किडींचे एकात्मिक नियंत्रणसध्या कपाशीचे पीक पाते, फुले व बोंड लागण्याच्या...
सांगली जिल्ह्यात सेंद्रिय शेतमालाला हवी...सांगली जिल्ह्यामध्ये सेंद्रिय शेतीमाल विक्री...
नाशिक जिल्ह्यात सेंद्रिय शेतीची वाटचाल...नाशिक जिल्ह्यात सेंद्रिय शेतीचे तीन वर्षांपूर्वी...
नाशिक, निफाड कारखाना भाड्याने देण्याचा...नाशिक : कर्जबाजारी व आर्थिक डबघाईमुळे गेल्या काही...
अकोला, बुलडाण्यात पीक कर्जवाटप ३०...अकोला  ः शेतकऱ्यांना खरीप हंगामासाठी पीक...
गोंदियातील कृषी सेवा केंद्रे लावणार...गोंदिया   ः जमिनीची गरज ओळखूनच खताची मात्रा...
साताऱ्यात पावसाअभावी पिके करपू लागलीसातारा  : जिल्ह्यात सुमारे एक महिन्यापासून...
नगर जिल्ह्यात पावसाअभावी कांदा लागवड...नगर  ः जिल्हाभरात पावसाअभावी कांदालागवड...
वाशीममध्ये रब्बीत हरभऱ्याचे क्षेत्र...वाशीम  ः या हंगामात जिल्ह्यात चांगला पाऊस...
खरेदी केंद्र सुरू करण्याच्या मागणीसाठी...सातारा  : शेतीमाल खरेदी केंद्रे त्वरित सुरू...
संघर्ष गोकुळ ‘मल्टिस्टेट’चाकोल्हापूर जिल्हा दूध संघ (गोकुळ) मल्टिस्टेट...
'दारुमुळे दरवर्षी अडीच लाखापेक्षा जास्त...नवी दिल्ली- दारूमुळे दरवर्षी जवळपास अडीच...
जालन्यात पाण्यात बुडून तिघांचा मृत्यूजालना : गणपती बाप्पांचे विसर्जन करताना जालना...
शिखर, रोहितने पाकला धुतले; भारत अंतिम...दुबई : पाकिस्तानने उभारलेल्या 237 धावांचा सहजी...
खानदेशात मध्यम पाऊस; नंदुरबारला हुलकावणीजळगाव : खानदेशात शुक्रवारी (ता.२१) मध्यरात्री व...
पुणे जिल्ह्यात ढगाळ हवामानपुणे  : जिल्ह्यात आठवड्याच्या सुरवातीला...