agriculture news in marathi, tur procurement process issue, parbhani, maharashta | Agrowon

नांदेड, परभणी, हिंगोली जिल्ह्यांत तूर खरेदी करण्याचे आव्हान
टीम अॅग्रोवन
गुरुवार, 26 एप्रिल 2018

परभणी : केंद्र शासनाच्या किंमत समर्थन योजनेअंतर्गत आधारभूत किंमत दराने तूर खरेदीसाठी १५ मेपर्यंत मुदतवाढ दिल्यामुळे नोंदणी केलेल्या; परंतु मोजमाप राहिलेल्या शेतकऱ्यांना दिलासा मिळाला आहे. आता नवीन नोंदणी केली जाणार नाही. मुदत वाढीच्या २० दिवसांच्या कालावधीत नांदेड, परभणी, हिंगोली या तीन जिल्ह्यांतील ४२ हजारांवर शेतकऱ्यांची तूर खरेदी करण्याचे आव्हान शासकीय यंत्रणेपुढे आहे. अपुऱ्या गोदाम व्यवस्थेमुळे खरेदीची गती संथच राहणार आहे. त्यामुळे शिल्लक शेतकऱ्यांपैकी किती जणांची तूर खरेदी केली जाईल, याबाबत अनिश्चितता आहे.

परभणी : केंद्र शासनाच्या किंमत समर्थन योजनेअंतर्गत आधारभूत किंमत दराने तूर खरेदीसाठी १५ मेपर्यंत मुदतवाढ दिल्यामुळे नोंदणी केलेल्या; परंतु मोजमाप राहिलेल्या शेतकऱ्यांना दिलासा मिळाला आहे. आता नवीन नोंदणी केली जाणार नाही. मुदत वाढीच्या २० दिवसांच्या कालावधीत नांदेड, परभणी, हिंगोली या तीन जिल्ह्यांतील ४२ हजारांवर शेतकऱ्यांची तूर खरेदी करण्याचे आव्हान शासकीय यंत्रणेपुढे आहे. अपुऱ्या गोदाम व्यवस्थेमुळे खरेदीची गती संथच राहणार आहे. त्यामुळे शिल्लक शेतकऱ्यांपैकी किती जणांची तूर खरेदी केली जाईल, याबाबत अनिश्चितता आहे.

दरम्यान, मुदत वाढ दिल्यानंतर मंगळवारी (ता.२४) या तीन जिल्ह्यांतील खरेदी केंद्रांवर तूर खरेदी सुरू करण्याचे आदेश देण्यात आले. त्यानुसार नांदेड, परभणी, हिंगोली जिल्ह्यांतील केंद्रांवर तूर खरेदी सुरू झाली असल्याचे सूत्रांनी सांगितले. नांदेड, परभणी, हिंगोली या तीन जिल्ह्यांतील नोंदणी केलेल्या ६३ हजार १४३ शेतकऱ्यांपैकी गुरुवारपर्यंत (ता.१८ एप्रिल) २० हजार ८९६  शेतकऱ्यांची २ लाख ४१ हजार ८०५ क्विंटल तूर खरेदी करण्यात आली आहे; परंतु वखार महामंडळाच्या गोदामात साठविण्यासाठी त्यापैकी ९२ हजार १६८ क्विंटल तूर खरेदी केंद्रावरच पडून आहे. त्यामुळे शेतकऱ्यांचे तब्बल ५० कोटी २३ लाख १५ हजार ६०० रुपयांचे चुकारे रखडलेले आहेत.

आधी खरेदी केंद्रावरील तूर साठविण्यासाठी गोदामाची व्यवस्था करावी लागणार आहे. त्यानंतर चुकारे मिळण्याचा मार्ग मोकळा होईल. तसेच नव्याने खरेदी केलेली तूर साठविण्यासाठी जागा होईल. सध्या हरभऱ्याचीदेखील खरेदी सुरू आहे. त्यामुळे खरेदी केलेला शेतमाल साठविण्यासाठी अडचणी येणार आहेत.

दरम्यान, वसमत, पूर्णा, मानवत या ठिकाणी प्रत्येकी १२०० टन साठवण क्षमतेचे गोदाम भाडेतत्त्वावर घेण्यात आले आहेत. खरेदी केंद्रावरील चाळण्या, वजन काट्यांची संख्या वाढविण्यात आली आहे. त्यामुळे तूर खरेदी प्रक्रियेत गती येईल, असे जिल्हा पणन अधिकारी कार्यालयाच्या सूत्रांनी सांगितले.

तूर खरेदी सुरू झाल्यानंतर सुरवातीचे काही दिवस नांदेड जिल्ह्यात प्रतिहेक्टरी १२ क्विंटल, परभणी आणि हिंगोली जिल्ह्यांत प्रतिहेक्टरी ७.५० क्विंटल तूर खरेदी केली जात होती. शासनाने दिलेल्या सुधारित सरासरी उत्पादकतेनुसार नांदेड जिल्ह्यात प्रतिहेक्टरी १०.७६ क्विंटल, परभणी जिल्ह्यात प्रतिहेक्टरी १९.४१ क्विंटल, हिंगोली जिल्ह्यात ६.०३ क्विंटल या मर्यादेत तूर खरेदी केली जात आहे.

पीक कापणी प्रयोगानुसार नांदेड जिल्ह्यात प्रतिहेक्टरी ८.९२ क्विंटल आणि परभणी जिल्ह्यात प्रतिहेक्टरी १४.९० क्विंटल एवढी तूर उत्पादकता आली आहे. परभणी जिल्ह्यात वाढीव उत्पादकतेनुसार खरेदी केली जात असल्यामुळे तुलनेने तूर खरेदी जास्त आणि शेतकरी संख्या कमी असे चित्र आहे.

इतर ताज्या घडामोडी
जमीन सुपीकतेसाठी सेंद्रिय कर्बाचे...जमिनीच्या सुपीकतेमध्ये सेंद्रिय कर्ब हे अत्यंत...
खानदेशात कांदा लागवड निम्म्याने...जळगाव : खानदेशात यंदा उन्हाळ कांद्याची लागवड...
सटाणा, मालेगावसाठी सोडणार चणकापूर...नाशिक : सटाणा व मालेगावला भेडसावणाऱ्या...
पुणे विभागात ४८ हजार हेक्टरवर कांदा...पुणे   ः पुणे विभागात आत्तापर्यंत ४८ हजार...
वीजदरवाढीचा शॉक, अनुदानाची फक्त घोषणाचजळगाव ः वस्त्रोद्योगाला चालना मिळावी, उद्योजकांचा...
महिलांनी नाचणीपासून बनवले सत्तरहून अधिक...कोल्हापूर   : नाचणीची आंबील, नाचणीच्या...
बुलडाणा जिल्ह्यात रब्बीची ५६ हजार...बुलडाणा  ः कमी व अनियमित पावसामुळे संपूर्ण...
कोल्हापुरात ऊसतोडणीसाठी यंदा पुरेसे मजूरकोल्हापूर  : गेल्या हंगामाच्या तुलनेत...
यवतमाळ जिल्हा दुष्काळग्रस्त जाहीर करा ः...वणी, जि. यवतमाळ   ः केंद्र व राज्यातील सरकार...
ग्रामपंचायत कर्मचाऱ्यांच्या वेतनासाठी...नाशिक (प्रतिनिधी) : कुटुंबाच्या आर्थिक अडचणीच्या...
पीकनिहाय सिंचनाचे काटेकोर नियोजनपिकांच्या अधिक उत्पादकतेसाठी जमिनीची निवड, मुबलक...
नारळासाठी खत, पाणी व्यवस्थापननारळ हे बागायती पीक असल्यामुळे पुरेसे पाणी...
खानदेशात केळीच्या दरात सुधारणाजळगाव : केळीची आवक सध्या कमी असून, थंडी वधारताच...
नाशिक जिल्ह्यातील दुष्काळी तालुक्यात...नाशिक : नाशिक जिल्ह्यातील पंधरापैकी आठ तालुके...
‘निम्न दुधना’तून पाणी देण्याचे...परभणी : निम्म दुधना प्रकल्पातून पिण्यासाठी पाणी...
सर्वसाधारण सभेचा सत्ताधाऱ्यांना धसकाजळगाव : जिल्हा परिषदेची सर्वसाधारण सभा येत्या २८...
शेतकऱ्यांनी चारा पिकांवर भर द्यावा ः...पुणे  : नव्या वर्षाच्या सुरवातीलाच कृषी...
‘वनामकृवि’ तयार करणार दुष्काळी...परभणी  ः मराठवाड्यात उद्भलेल्या दुष्काळी...
कापूस लागवड न करणाऱ्यांना मिळाली मदत;...जळगाव  ः जिल्ह्यात मागील हंगामात बोंड...
पुणे विभागात रब्बीची १८ टक्क्यांवर पेरणीपुणे  ः परतीचा पाऊस न झाल्याने जमिनीत पुरेशी...