agriculture news in marathi, tur procurement process status,nagar, maharashtra | Agrowon

नगर जिल्ह्यात एक लाख क्विंटल तूर खरेदी
टीम अॅग्रोवन
सोमवार, 16 एप्रिल 2018
नगर : जिल्ह्यात नाफेडमार्फत तूर खरेदी सुरू आहे. तूर विक्रीसाठी शेतकऱ्यांना ऑनलाइन नोंदणी करावी लागत आहे. बुधवारपर्यंतच (ता. १८) ऑनलाइन नोंदणी सुरू राहणार असून त्यासाठी अवघे तीन दिवस उरले आहेत. आतापर्यंत जिल्ह्यातील दहा खरेदी केंद्रावर एक लाख क्विंटल तूर खरेदी झाली आहे. 
 
नगर : जिल्ह्यात नाफेडमार्फत तूर खरेदी सुरू आहे. तूर विक्रीसाठी शेतकऱ्यांना ऑनलाइन नोंदणी करावी लागत आहे. बुधवारपर्यंतच (ता. १८) ऑनलाइन नोंदणी सुरू राहणार असून त्यासाठी अवघे तीन दिवस उरले आहेत. आतापर्यंत जिल्ह्यातील दहा खरेदी केंद्रावर एक लाख क्विंटल तूर खरेदी झाली आहे. 
 
जिल्ह्यामध्ये गतवर्षी तूर खरेदीचा प्रश्‍न गंभीर झाला होता. केवळ कृषी विभागाने तूर उत्पादनाचा योग्य अहवाल दिला नसल्याने ऐनवेळी तूर खरेदीचा प्रश्‍न निर्माण झाल्याचा ठपका ठेवण्यात आला होता. त्यामुळे यंदा कृषी विभागाने सावध पवित्रा घेतला. शेतकऱ्यांनी केलेल्या मागणीनुसार जिल्ह्यात ५४५० रुपये क्विंटल दराने नाफेडने सुरू केलेल्या केंद्रांवर तुरीची खरेदी सुरू आहे.
 
सुरवातीला नगर, जामखेड, नेवासा, पारनेर, वांबोरी (राहुरी), कर्जत, शेवगाव, श्रीरामपूर, मिरजगाव या नऊ ठिकाणी तूर खरेदी केंद्रे सुरू करण्यात आली होती. परंतु कर्जत येथील तूर खरेदी केंद्र बंद करण्यात आले. त्यानंतर श्रीगोंदा येथे केंद्र सुरू केल्याने जिल्ह्यामध्ये सध्या दहा खरेदी केंद्रावर तूर खरेदी सुरू आहे. तुरीचे हेक्‍टरी ११ क्विंटल २२ किलो उत्पादन झाल्याचा अहवाल कृषी विभागाने दिला. अहवालानुसार एका शेतकऱ्यांकडून एकरी चार क्विटंल ११ किलोप्रमाणे तूर खरेदी केली जात आहे.
 
सरकारी खरेदी केंद्रावर तूर विक्री करण्यासाठी अगोदर ऑनलाइन नोंदणी करावी लागत आहे. आतापर्यंत तब्बल १६ हजार ८४ शेतकऱ्यांनी नोंदणी केली तर १०,२२५ शेतकऱ्यांनी तुरीची विक्री केली. आता १८ एप्रिलपर्यंतच ऑनलाइन नोंदणी सुरू राहणार आहे. त्यामुळे शेतकऱ्यांना तूर विक्रीसाठी नोंदणी करायला तीन दिवसांचा अवधी शिल्लक आहे. त्यानंतर मात्र तूर खरेदीसाठी नोंदणी होणार नसून ज्यांनी नोंदणी केली त्यांचीच तूर खरेदी केली जाणार आहे.
 
आतापर्यंत खरेदी केंद्रांवर ५५ कोटी रुपयांची एक लाख ५५४ क्विटंल तूर खरेदी करण्यात आली आहे. जास्तीत जास्त शेतकऱ्यांनी दिलेल्या वेळेत नोंदणी करावी, असे अावाहन जिल्हा पणन अधिकारी भारत पाटील यांनी केले आहे.
टॅग्स

इतर ताज्या घडामोडी
कृषी सल्ला : ऊस, कापूस, उन्हाळी भुईमूग...हवामान अंदाज - शुक्रवार - शनिवारी (ता. २६ - २७)...
द्राक्ष बागेचे वाढत्या तापमानातील...नव्या आणि जुन्या द्राक्ष बागांचा विचार केला असता...
ऑस्ट्रेलियातील सुपरमार्केटची दुष्काळाशी...ऑस्ट्रेलियातील एका सुपर मार्केटने दुष्काळाशी...
गोदावरीत प्रदूषण केल्यास होणार कारवाईनाशिक : नाशिक शहरातून वाहणाऱ्या गोदावरी...
सोलापुरात टंचाई निवारणाचा भार...सोलापूर : सोलापूर जिल्ह्याचा ग्रामीण भाग...
खानदेशात पपईला उन्हासह पाणीटंचाईचा फटकानंदुरबार : खानदेशात या हंगामात पपई लागवड कमी...
जळगावात पांढऱ्या कांद्याच्या आवकेत घटजळगाव  : कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये...
सांगली बाजारसमितीत हळद, गुळाची उलाढाल ...सांगली ः व्यापाऱ्यांना सेवाकराच्या नोटिसा...
नगर जिल्ह्यात छावण्यांवर दर दिवसाला...नगर  : नगर जिल्ह्यामध्ये दुष्काळात पशुधन...
सातारा जिल्ह्यात पाणीटंचाई होतेय तीव्रसातारा ः जिल्ह्यात दिवसेंदिवस पाणीटंचाई तीव्र होत...
पुणे जिल्ह्यासाठी २६ हजार ५७३ क्विंटल...पुणे  ः खरीप हंगाम सुरू होण्यास एक ते दीड...
तंटामुक्‍त गाव अभियानाला चंद्रपुरात...चंद्रपूर : शांततेतून समृद्धीकडे जाण्याचा...
अमरावतीत तुर चुकाऱ्यासाठी हवे ८७ कोटी;... अमरावती : चुकाऱ्यांसाठी यंदा शेतकऱ्यांना...
शेतीच्या दृष्टीने सरकारचा कारभार...नाशिक : अगोदरचा कालखंड व ही पाच वर्षे यात...
अमरावतीतून ९१ विहिरी अधिग्रहणाचे...अमरावती  ः सरासरीपेक्षा कमी पाऊस झाल्यामुळे...
शिल्लक एफआरपी मिळत नसल्याने साताऱ्यातील...सातारा  : अजिंक्यतारा कारखान्याचा अपवाद...
कांदा दर वाढले, तेव्हा भाजपने विरोध...नाशिक   ः कृषिमंत्री असताना मी...
'मतदान झालेल्या दुष्काळी भागात ...मुंबई  ः लोकसभेच्या मतदानाच्या तीन...
उच्चांकी मतदानामुळे कोल्हापूर मतदारसंघ...कोल्हापूर  : राज्याच्या तुलनेत कोल्हापूर...
अकोल्यात तूर प्रतिक्विंटल ४२०० ते ५४००...अकोला ः स्थानिक कृषी उत्पन्न बाजार समितीत...