agriculture news in Marathi, tur procurement scheme fail in Latur, Maharashtra | Agrowon

लातुरात हरभरा खरेदी योजनेचा फज्जा
हरी तुगावकर
मंगळवार, 17 एप्रिल 2018

लातूर ः जाहिरातबाजी करून आम्ही शेतकऱ्यांच्या बाजूने कसे आहोत हे दाखविण्याचा प्रयत्न करणाऱ्या शासनाने लातूर जिल्ह्यात आतापर्यंत आॅनलाइन नोंदणी करणाऱ्या २३ हजारपैकी केवळ ७३ शेतकऱ्यांची ९६३ क्विंटलच हरभऱ्याची खरेदी केली आहे. त्यामुळे शासनाच्या हमीभाव खरेदी केंद्र योजनेचा जिल्ह्यात फज्जा उडाल्याचे दिसत आहे, तर दुसरीकडे सोमवारी (ता. १६) लातूर बाजारपेठेत २०० रुपयांनी हरभऱ्याचे भाव गडगडले. सध्या शेतकऱ्यांना हमीभावापेक्षा किमान एक हजार रुपये कमी दराने बाजारपेठेत हरभरा विक्री करण्याची वेळ आली आहे. 

लातूर ः जाहिरातबाजी करून आम्ही शेतकऱ्यांच्या बाजूने कसे आहोत हे दाखविण्याचा प्रयत्न करणाऱ्या शासनाने लातूर जिल्ह्यात आतापर्यंत आॅनलाइन नोंदणी करणाऱ्या २३ हजारपैकी केवळ ७३ शेतकऱ्यांची ९६३ क्विंटलच हरभऱ्याची खरेदी केली आहे. त्यामुळे शासनाच्या हमीभाव खरेदी केंद्र योजनेचा जिल्ह्यात फज्जा उडाल्याचे दिसत आहे, तर दुसरीकडे सोमवारी (ता. १६) लातूर बाजारपेठेत २०० रुपयांनी हरभऱ्याचे भाव गडगडले. सध्या शेतकऱ्यांना हमीभावापेक्षा किमान एक हजार रुपये कमी दराने बाजारपेठेत हरभरा विक्री करण्याची वेळ आली आहे. 

लातूर जिल्ह्यात एप्रिलपासून हरभरा खरेदी सुरू केली आहे. यात पहिल्यांदा शेतकऱ्यांना आॅनलाइन नोंदणी करण्याचे आवाहन करण्यात आले होते. बाजारपेठेत भाव कोसळल्याने शेतकऱ्यांच्या आशा या खरेदी केंद्रावर आहेत. यातूनच जिल्ह्यातील २३ हजार शेतकऱ्यांनी हरभऱ्यासाठी आॅनलाइन नोंदणी केली आहे. आॅनलाइन नोंदणीनंतर शेतकऱ्यांना एसएमएसद्वारे हरभरा घेऊन येण्यासाठी सांगितले जाते. या वर्षी तुरीनंतर शासनाने उशिरा हरभऱ्याची हमीभावाने खरेदी सुरू केली आहे. सध्या तुरीनेच शासनाचे गोदाम भरले आहेत. त्यालाच जागा नाही. त्यामुळे त्याचा परिणाम हरभरा खरेदीवरही होताना दिसत आहे.  

आतापर्यंत २३ हजारपैकी केवळ ३७१ शेतकऱ्यांनाच ३७१ जणांना एसएमएस करण्यात आले. आतातर एसएमएस पाठवणेच एक प्रकारे बंद करण्यात आले आहे. आतापर्यंत केवळ ७३ शेतकऱ्यांचा ९६३ क्विंटल हरभरा खरेदी करण्यात आला आहे. त्यात उदगीर १९८ क्विंटल, अहमदपूर ३० क्विंटल, औसा ६८ क्विटंल, चाकूर ४५९ क्विंटल, लोणी केंद्रावर २०७ क्विंटल हरभरा खरेदी करण्यात आला आहे. ४२ लाख ३० हजार ४४४ रुपयांची ही खरेदी आहे. लातूर, रेणापूर, देवणी, नळेगाव, साकोळ, सताळा, जळकोट केंद्रावर एक क्विंटलही खरेदी नाही. या योजनेचा सध्या तरी लातूर जिल्ह्यात फज्जा उडाल्याचे चित्र आहे. 

लातूर जिल्ह्यातील आॅनलाइन हरभरा नोंदणीची स्थिती 

खरेदी केंद्रे आॅनलाइन नोंदणी   पाठविलेले एसएमएस
अहमदपूर   ३,६६२  २५
औसा    ४,४५५     २१
 चाकूर    ३,४५०   ८०
देवण १,४९९ ००
जळकोट     ४   ००
लातूर ८७०  ४७
लोण   २१२ ६२
नळेगाव   ४५५  १०
निलंगा ३,७७४ ००
रेणापूर  ४५५  ७
साकोळ १,२३४  ००
सताळ  ४९  ००
उदगीर  २,८८४   ११९
एकूण २३,००३  ३७१

      
     
      
 

इतर अॅग्रो विशेष
आनंदाचा उतरता आलेखजगभरातील आनंदी देशांचा अहवाल (वर्ल्ड हॅपीनेस...
आदित्यात् जायते वृष्टि:जगात एकूण १९५ देश आहेत, पण आकार, आर्थिक स्थिती,...
आज संत तुकाराम बीजदेहू, जि. पुणे  : जगद्‌गुरू संत श्री तुकाराम...
उज्ज्वल भविष्याचा सर्वोत्तम मार्ग ‘जल...भारत जलसंकट समस्येचा सामना करत आहे. वाढती...
जल‘मुक्त’ शिवारवॉ टर ग्रीडच्या माध्यमातून मराठवाड्यातील सर्व...
राज्यात शंभर लाख टन साखर उत्पादनभवानीनगर, जि. पुणे ः राज्यात ३० टक्के हुमणीग्रस्त...
मध्य महाराष्ट्र, मराठवाड्यात अवकाळीची...पुणे : रविवारी, सोमवारी पुन्हा काही अंशी...
जैविक कीड-नियंत्रणासाठी उपयुक्त बुरशीगेल्या काही वर्षांमध्ये कीडनियंत्रणासाठी...
केशर आंबा फळगळीची कारणे अन् उपाययोजना  सद्यःस्थितीत हवामान आंबा झाडांसाठी...
रसदार उन्हाळी काकडी अर्थकारणाला देतेय...जळगाव जिल्ह्यात पाचोरा, जामनेर, यावल, जळगाव आदी...
बॅंक अधिकारी झाला पूर्णवेळ प्रयोगशील...विशाखापट्टण व त्यानंतर हैद्रराबाद येथे खासगी...
स्मार्ट प्रकल्पाचा केंद्रबिंदू शेतमाल ‘...पुणे : राज्यातील बहुतेक शेतकऱ्यांना आता पिकवायचे...
पूर्व विदर्भात गारपीटपुणे  ः दोन दिवसांपूर्वी मध्य भारतात तयार...
जनावराच्या आहारात पाणी महत्त्वाचेजनावरांचे योग्य पोषण होण्यासाठी तसेच दुग्धोत्पादन...
राज्यात १७८ तालुक्यांत भूजल चिंताजनकपुणे ः कमी झालेला पाऊस, वाढत असलेला पाण्याचा उपसा...
दरामुळे साखरेचा रंग फिकाकोल्हापूर : साखरेचे विक्री मूल्य वाढविल्यानंतरही...
‘उजनी’तील पाणीसाठा उणे पातळीत सोलापूर  ः सोलापूर जिल्ह्याची वरदायिनी...
राज्यभरात अन्नत्याग आंदोलनमुंबई ः शेतकरी साहेबराव करपे व कुटुंबीयांप्रती...
मार्चनंतरही पणन करणार कापूस बाजारात...यवतमाळ ः शेतकऱ्यांच्या घरातील कापूस विकल्या...
मढी यात्रेला बुधवारपासून प्रारंभनगर ः होळीच्या दिवशी सकाळी कानिफनाथांच्या समाधीला...