agriculture news in marathi, tur procurement status, aurangabad, maharashtra | Agrowon

तीन जिल्ह्यांत एक लाख ३६ हजार क्विंटल तूर खरेदी
टीम अॅग्रोवन
बुधवार, 11 एप्रिल 2018

औरंगाबाद : औरंगाबाद, जालना व उस्मानाबाद या तीन जिल्ह्यांत आतापर्यंत १ लाख ३६ हजार ६२४ क्‍विंटल तूर खरेदी करण्यात आली आहे. काही ठिकाणी हरभऱ्याची खरेदी सुरू करण्यात आली असून हरभरा खरेदीला अजूनही गती आलेली नाही. 

औरंगाबाद : औरंगाबाद, जालना व उस्मानाबाद या तीन जिल्ह्यांत आतापर्यंत १ लाख ३६ हजार ६२४ क्‍विंटल तूर खरेदी करण्यात आली आहे. काही ठिकाणी हरभऱ्याची खरेदी सुरू करण्यात आली असून हरभरा खरेदीला अजूनही गती आलेली नाही. 

औरंगाबाद जिल्ह्यात पाच खरेदी केंद्रावरून तुरीची खरेदी करण्यात आली. या पाच केंद्रावरून आजवर २२७३ शेतकऱ्यांकडून २० हजार ९२५ क्‍विंटल तुरीची खरेदी करण्यात आली. जिल्ह्यात हरभऱ्याचीही पाच खरेदी केंद्र मंजूर करण्यात आली असून त्यापैकी गंगापूर, औरंगाबाद व पैठण येथे हरभऱ्याची खरेदी सुरू करण्यात आली आहे. आणखी दोन खरेदी केंद्र लवकरच सुरू करण्यात येणार असल्याची माहिती सूत्रांनी दिली.
 
उस्मानाबाद जिल्ह्यात ७ हजार ६६० शेतकऱ्यांकडून ९१ हजार क्‍विंटल तुरीची खरेदी करण्यात आली. शिवाय ३९० शेतकऱ्यांकडून ६०५० क्‍विंटल हरभऱ्याचीही खरेदी करण्यात आली आहे. जालना जिल्ह्यात आठ खरेदी केंद्रांवरून २ हजार ७२८ शेतकऱ्यांकडून २४ हजार ६९९ क्‍विंटल तुरीची खरेदी करण्यात आली आहे.
 
जालना जिल्ह्यात हरभऱ्याचे एकच खरेदी केंद्र सुरू करण्यात आले आहे. जालन्यातील या एकमेव खरेदी केंद्रावरून २० क्‍विंटल हरभऱ्याची खरेदी करण्यात आली आहे. 
 
संपूर्ण मराठवाड्यात हमीभावाने तूर व हरभरा खरेदीत साठवणुकीसाठी गोदामांचा मुद्दा कळीचा बनला आहे. उस्मानाबाद जिल्ह्यात हमीभावाने जवळपास २० ते २२ हजार क्‍विंटल तूर खरेदी करण्यात आली. परंतु, ती अजूनही गोदामात साठवणे बाकी आहे. त्यामुळे शेतकऱ्यांना वेळेत चुकारे देण्यातही अडथळा निर्माण होतो आहे. 

इतर ताज्या घडामोडी
जळगावात आले २५०० ते ६००० रुपये...जळगाव ः येथील कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये...
सिंदखेडराजा दुष्काळग्रस्त जाहीर कराअकोला : जिल्ह्यात या मोसमात तेल्हारा व अकोट या...
खान्देशातील धरणांत अल्प पाणीसाठा जळगाव : खान्‍देशातील तापी व पांझरा नदीवरील...
कोल्हापूरात धरणे भरली; नद्यांची...कोल्हापूर : केवळ पंधरा दिवसांतच जिल्ह्यातील...
जळगाव जिल्हा परिषदेत विरोधक शांत;...जळगाव : पोषण आहार, शिक्षक बदल्या यावरून जिल्हा...
नगर जिल्ह्याच्या काही भागांत पावसाचे...नगर ः गेल्या अनेक दिवसांपासून गायब झालेला आणि...
भंडारा जिल्ह्यातील धान उत्पादनात घटीची...भंडारा : गेल्या वीस दिवसांपासून धानपट्ट्यात...
नगरमध्ये डाळिंबाच्या दरात पंचवीस...नगर ः नगर जिल्ह्यामध्ये गेल्या दीड महिन्याच्या...
उरुग्वेतील गायीमधील लेप्टोस्पायरा...जगभरामध्ये प्राणी आणि मनुष्यामध्ये...
सागरी माशांच्या बिजोत्पादनाचे तंत्र...कोची येथील केंद्रीय सामुद्री मत्स्य संशोधन...
कोल्हापुरातील ११० गावांत कृत्रिम...कोल्हापूर : अनुवंशिक सुधारणा होऊन सशक्त जनावरांची...
पुणे विभागात ७३,७४० हजार हेक्टरवर...पुणे   ः  गेल्या साडेतीन महिन्यांत...
मराठवाड्यासाठी निधी कमी पडू दिला जाणार...औरंगाबाद  : मराठवाड्याच्या दुष्काळमुक्तीसाठी...
पावसाअभावी वऱ्हाडात सोयाबीनचे उत्पादन...अकोला   ः या हंगामात वऱ्हाडात सर्वाधिक लागवड...
पुणे जिल्ह्यात महिनाभरात नऊ जणांचा...उरुळी कांचन, जि. पुणे : संपूर्ण राज्यात चिंतेचा...
मी 35-40 रूपयांनी पेट्रोल-डिझेलची...नवी दिल्ली : सध्या पेट्रोल-डिझेल दरवाढीमुळे मोदी...
लाल मातीचा सन्मान वाढविणारे आंदळकरकोल्हापुरातील २२ जून १९७० चा म्हणजे ४८...
डी.आर. कुलकर्णी यांचे निधनपुणे : 'सकाळ'च्या पुणे आवृत्तीतील मुख्य उपसंपादक...
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा आज जन्मदिन...भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी आज 68 वा वाढदिवस...
देशात सर्वाधिक महाग पेट्रोल मराठवाड्यात...लातूर : गेली सलग अठरा दिवस देशात पेट्रोल आणि...