agriculture news in marathi, tur procurement status, jalgaon, maharashtra | Agrowon

जळगावमध्ये ४३ हजार क्विंटल तूर खरेदी
टीम अॅग्रोवन
शनिवार, 14 एप्रिल 2018
कोणतेही तूर खरेदी केंद्र बंद केलेले नाही. १८ एप्रिलला तूर खरेदी बंद करायची आहे. परंतु शासनाचे स्पष्ट निर्देश आल्यावरच तूर खरेदी बंद होईल. चार हरभरा खरेदी केंद्र सध्या सुरू आहेत. 
- परिमल साळुंखे, पणन अधिकारी,
मार्केटिंग फेडरेशन, जळगाव.
जळगाव : जिल्ह्यात येत्या बुधवारी (ता.१८ एप्रिल) तूर खरेदी प्रक्रिया बंद होण्याची शक्‍यता असून, आतापर्यंत ४३ हजार क्विंटल तूर खरेदी झाली आहे. तूर व हरभरा खरेदीसंबंधीचे चुकारे शेतकऱ्यांना वितरित केल्याचा दावा प्रशासनाने केला आहे.
 
रावेर, मुक्ताईनगर, बोदवड, जामनेर, पाचोरा, जळगाव, अमळनेर, चोपडा, चाळीसगाव या नऊ केंद्रांवर तूर खरेदी सुरू झाली होती. यातील अमळनेर व मुक्ताईनगर, जामनेर केंद्र सुरवातीला सुरू झाले. जळगाव, चोपडा येथील केंद्र उशिराने सुरू झाले. या केंद्रांमध्ये मिळून ४३ हजार ४६ क्विंटल तूर खरेदी झाली आहे. सुमारे चार तूर खरेदी केंद्रांमध्ये सध्या हवा तसा प्रतिसाद नसल्याने या केंद्रात खरेदी सध्या सुरू नाही. परंतु ही केंद्रे बंद नाहीत. शेतकरी तूर विक्रीसाठी आले तर नोंदणी करून त्यांची तूर खरदी केली जाईल. १८ एप्रिलला तूर खरेदी बंद करण्याचे आदेश आहेत. परंतु शासन नवा निर्णयही घेऊ शकते, अशी माहिती मार्केटिंग फेडरेशनच्या सूत्रांनी दिली. 
 
जिल्ह्यात हरभरा खरेदीसाठी १२ केंद्रांना मंजुरी मिळाली आहे. यातील भडगाव, यावल, रावेर व पाचोरा ही चार केंद्र सुरू झाली आहेत. पारोळा, मुक्ताईनगर, बोदवड, जामनेर, चाळीसगाव, अमळनेर, चोपडा, जळगाव येथे हरभरा खरेदी सुरूच झालेली नाही. चार खरेदी केंद्रांमध्ये ३४०० क्विंटल हरभरा खरेदी झाली आहे. 
 
खासगी बाजार किंवा बाजार समितींमध्ये हरभऱ्यासह तुरीला अपेक्षित दर नाहीत. दरांवर दबाव आहे. हरभऱ्याची आवक अधिक आहे. जिल्ह्यात यंदा हरभरा पेरणी अधिक झाली होती. त्यामुळे आवकही अधिक असून, आवक झालेल्या हरभऱ्याचे लिलावही होत नाही. आठ ते १० दिवसांत जळगाव बाजार समितीत लिलाव होतात, मग शेतकऱ्यांना पैसे दिले जातात, असे प्रकार सुरू आहेत. शासकीय खरेदी व्यापक व वेळेत राहिली असती तर चित्र वेगळे दिसले असते, असे शेतकऱ्यांचे म्हणणे आहे.

इतर ताज्या घडामोडी
बंद अवस्थेतील कारखाने सहकारी तत्त्वावर...जळगाव : जिल्ह्यात काही साखर कारखाने एकेकाळी जोमात...
कांदा - लसूण पीक सल्लाबहुतांश शेतकऱ्यांच्या शेतामध्ये खरीप कांदा पिकाची...
नांदेड जिल्ह्यात ५१० कोटी रुपये पीक...नांदेड ः नांदेड जिल्ह्यात यंदाच्या खरीप हंगामात...
राष्ट्रीय महामार्गाचे चौपदरीकरण...जळगाव : जळगाव आणि धुळे जिल्ह्यांतून जाणाऱ्या...
अंजनीसह पाच गावांची पाण्याविना आबाळसांगली ः तासगाव तालुक्‍याचा पूर्वभागात भीषण...
सोलापुरात दुष्काळ जाहीर करण्याची मागणीसोलापूर : सोलापूर जिल्ह्यात अद्यापही दमदार पाऊस...
गोंदिया जिल्ह्यात गणेशोत्सवाद्वारे शेती...गोंदिया :गणेशोत्सवाच्या माध्यमातून कृषी...
सातारा जिल्ह्यात स्ट्रॉबेरी लागवडीस...सातारा   ः राज्यभरात गोडव्यासाठी प्रसिद्ध...
सोलापूर जिल्ह्यावर दुष्काळ अन हुमणीचे...सोलापूर   ः जिल्ह्यात यंदाच्या हंगामात...
पीकविमा योजनेतून कंपन्यांचे भले ः विखे...पुणे   ः शेतकऱ्यांच्या पिकांना संरक्षण...
कृषी सल्ला : ऊस, कापूस, सोयाबीन, मका,...ऊस हुमणी किडीच्या नियंत्रणासाठी, फिप्रोनील (०.३...
अार्थिक व्यवस्थापनात राज्य सरकार अपयशी...मुंबई  : काँग्रेसच्या कार्यकाळात राज्याची...
कृषी सल्ला : भात, नागली, आंबा, नारळ,...भात  अवस्था ः पोटरी ते लोंबी बाहेर...
अकोल्यात मूग प्रतिक्विंटल ३८०० ते ५३००...अकोला ः या हंगामात लागवड झालेल्या मुगाची काढणी...
सोयाबीन, मूग, उडदासाठी १९ खरेदी केंद्रे...नगर ः शेतकऱ्यांचा शेतमाल हमीदराने खरेदी करता यावा...
शेतीमाल तारण योजनेत शेतकरी उत्पादक...कोल्हापूर : राज्यात शेतीमाल तारण योजना बाजार...
जळगावात आले २५०० ते ६००० रुपये...जळगाव ः येथील कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये...
सिंदखेडराजा दुष्काळग्रस्त जाहीर कराअकोला : जिल्ह्यात या मोसमात तेल्हारा व अकोट या...
खान्देशातील धरणांत अल्प पाणीसाठा जळगाव : खान्‍देशातील तापी व पांझरा नदीवरील...
कोल्हापूरात धरणे भरली; नद्यांची...कोल्हापूर : केवळ पंधरा दिवसांतच जिल्ह्यातील...