agriculture news in marathi, tur procurement status, usmanabad, maharashtra | Agrowon

उस्मानाबादमधील बारा हजारांवर शेतकऱ्यांची तूर खरेदी
टीम अॅग्रोवन
सोमवार, 28 मे 2018
उस्मानाबाद  : जिल्ह्यात वाढीव मुदत संपेपर्यंत १२ हजार ९८० शेतकऱ्यांच्या तुरीची हमीभावाने खरेदी केली गेली. एकूण १ लाख ६० हजार क्‍विंटल तूर खरेदी केली गेली असून, जवळपास ५० टक्‍के चुकारे बाकी असल्याची माहिती सूत्रांनी दिली. 
 
उस्मानाबाद  : जिल्ह्यात वाढीव मुदत संपेपर्यंत १२ हजार ९८० शेतकऱ्यांच्या तुरीची हमीभावाने खरेदी केली गेली. एकूण १ लाख ६० हजार क्‍विंटल तूर खरेदी केली गेली असून, जवळपास ५० टक्‍के चुकारे बाकी असल्याची माहिती सूत्रांनी दिली. 
 
उस्मानाबाद जिल्ह्यात शासनाने हमी दराने तुरीची खरेदी करण्यासाठी ऑनलाइन नोंदणीची प्रक्रिया सुरू केली होती. या प्रक्रियेत सहभागी होत १७ हजार ९०८ शेतकऱ्यांनी तुरीच्या हमी दराने खरेदीसाठी ऑनलाइन नोंदणी केली. नोंदणी केलेल्या शेतकऱ्यांपैकी १५ हजार ७१४ शेतकऱ्यांना एसएमएस पाठविण्यात आले होते. एसएमएस पाठविलेल्या शेतकऱ्यांपैकी दिलेल्या
मुदतीत केवळ १२ हजार ९८० शेतकऱ्यांच्या १ लाख ६० हजार क्‍विंटल तुरीची हमी दराने खरेदी करणे यंत्रणेला शक्‍य झाले.
 
खरेदी केलेल्या तुरीपैकी जवळपास ५० टक्‍के चुकारे अजूनही शेतकऱ्यांना मिळाले नसल्याची माहिती सूत्रांनी दिली. एसएमएस मिळूनही २७३४ शेतकऱ्यांच्या तुरीची हमी दराने खरेदी करणे शक्‍य झाले नाही. शिवाय २ हजार १९४ शेतकऱ्यांना ऑनलाइन नोंदणी केल्यानंतरही एसएमएसची वाट पाहावी लागली; परंतु मुदत संपल्यानंतरही एसएमएस मिळाला नाही. त्यामुळे ऑनलाइन नोंदणी केलेल्या मात्र एसएमएस न मिळालेल्या किंवा एसएमएस मिळूनही तुरीची खरेदी न झालेल्या शेतकऱ्यांच्या तुरीची खरेदी केली जाणार का, खरेदी केली तर त्यांचे चुकारे शेतकऱ्यांना किमान पेरणीपूर्वी मिळणार का हा प्रश्‍न उपस्थित होत आहे. 

इतर ताज्या घडामोडी
जमीन सुपीकतेसाठी सेंद्रिय कर्बाचे...जमिनीच्या सुपीकतेमध्ये सेंद्रिय कर्ब हे अत्यंत...
खानदेशात कांदा लागवड निम्म्याने...जळगाव : खानदेशात यंदा उन्हाळ कांद्याची लागवड...
सटाणा, मालेगावसाठी सोडणार चणकापूर...नाशिक : सटाणा व मालेगावला भेडसावणाऱ्या...
पुणे विभागात ४८ हजार हेक्टरवर कांदा...पुणे   ः पुणे विभागात आत्तापर्यंत ४८ हजार...
वीजदरवाढीचा शॉक, अनुदानाची फक्त घोषणाचजळगाव ः वस्त्रोद्योगाला चालना मिळावी, उद्योजकांचा...
महिलांनी नाचणीपासून बनवले सत्तरहून अधिक...कोल्हापूर   : नाचणीची आंबील, नाचणीच्या...
बुलडाणा जिल्ह्यात रब्बीची ५६ हजार...बुलडाणा  ः कमी व अनियमित पावसामुळे संपूर्ण...
कोल्हापुरात ऊसतोडणीसाठी यंदा पुरेसे मजूरकोल्हापूर  : गेल्या हंगामाच्या तुलनेत...
यवतमाळ जिल्हा दुष्काळग्रस्त जाहीर करा ः...वणी, जि. यवतमाळ   ः केंद्र व राज्यातील सरकार...
ग्रामपंचायत कर्मचाऱ्यांच्या वेतनासाठी...नाशिक (प्रतिनिधी) : कुटुंबाच्या आर्थिक अडचणीच्या...
पीकनिहाय सिंचनाचे काटेकोर नियोजनपिकांच्या अधिक उत्पादकतेसाठी जमिनीची निवड, मुबलक...
नारळासाठी खत, पाणी व्यवस्थापननारळ हे बागायती पीक असल्यामुळे पुरेसे पाणी...
खानदेशात केळीच्या दरात सुधारणाजळगाव : केळीची आवक सध्या कमी असून, थंडी वधारताच...
नाशिक जिल्ह्यातील दुष्काळी तालुक्यात...नाशिक : नाशिक जिल्ह्यातील पंधरापैकी आठ तालुके...
‘निम्न दुधना’तून पाणी देण्याचे...परभणी : निम्म दुधना प्रकल्पातून पिण्यासाठी पाणी...
सर्वसाधारण सभेचा सत्ताधाऱ्यांना धसकाजळगाव : जिल्हा परिषदेची सर्वसाधारण सभा येत्या २८...
शेतकऱ्यांनी चारा पिकांवर भर द्यावा ः...पुणे  : नव्या वर्षाच्या सुरवातीलाच कृषी...
‘वनामकृवि’ तयार करणार दुष्काळी...परभणी  ः मराठवाड्यात उद्भलेल्या दुष्काळी...
कापूस लागवड न करणाऱ्यांना मिळाली मदत;...जळगाव  ः जिल्ह्यात मागील हंगामात बोंड...
पुणे विभागात रब्बीची १८ टक्क्यांवर पेरणीपुणे  ः परतीचा पाऊस न झाल्याने जमिनीत पुरेशी...