agriculture news in marathi, tur procurement stop due to storage problem, buldhana, maharashtra | Agrowon

बुलडाणा जिल्ह्यात तूर खरेदी ठप्पच
टीम अॅग्रोवन
बुधवार, 11 एप्रिल 2018
बुलडाणा  ः जिल्ह्यात नाफेडमार्फत अातापर्यंत सव्वातीन लाख क्विंटलपर्यंत तूर खरेदी झाली असून, सध्या ठेवायला जागा नसल्याने शेगाव वगळता सर्वच ठिकाणी तूर खरेदी केंद्रे बंद पडली अाहेत. साठवणुकीसाठी गोदामांची व्यवस्था केली जावी, अशी मागणी जिल्हा मार्केटिंग विभागाने शासनाकडे केल्याची माहिती अाहे. मात्र अद्याप यावर कुठलाही तोडगा काढण्यात अाला नसून तूर खरेदीची मुदत अवघी अाठ दिवसांनी (१८ एप्रिल) संपत अाहे.
 
बुलडाणा  ः जिल्ह्यात नाफेडमार्फत अातापर्यंत सव्वातीन लाख क्विंटलपर्यंत तूर खरेदी झाली असून, सध्या ठेवायला जागा नसल्याने शेगाव वगळता सर्वच ठिकाणी तूर खरेदी केंद्रे बंद पडली अाहेत. साठवणुकीसाठी गोदामांची व्यवस्था केली जावी, अशी मागणी जिल्हा मार्केटिंग विभागाने शासनाकडे केल्याची माहिती अाहे. मात्र अद्याप यावर कुठलाही तोडगा काढण्यात अाला नसून तूर खरेदीची मुदत अवघी अाठ दिवसांनी (१८ एप्रिल) संपत अाहे.
 
या हंगामात फेब्रुवारीमध्ये तूर खरेदी सुरू करण्यात अाली. अातापर्यंत नाफेडने अाधारभूत किमतीने सव्वातीन लाख क्विंटलपेक्षा अधिक तूर खरेदी केली अाहे. मात्र अाता शेगाव येथील केंद्र वगळता इतरत्र तूर साठवणुकीसाठी जागाच नाही. जागेअभावी सुमारे ३० हजार क्विंटल तूर वेगवेगळ्या केंद्रांवर पडून अाहे. अाधी या मालाची उचल केल्यानंतर जागा तयार झाल्यावर नवीन खरेदीची प्रक्रिया केली जाईल.
 
जिल्ह्यातील सर्व गोदामांमध्ये धान्य साठवलेले असल्याने कुठेच जागा शिल्लक नाही. अाता शासनाला एकतर शासकीय गोदामांमधील धान्य अन्यत्र हलवावे लागेल किंवा भाडेतत्त्वावर खासगी गोदाम ताब्यात घ्यावे लागणार अाहे.  हे गोदाम जोपर्यंत उपलब्ध होत नाही तोवर खरेदी सुरू करण्यात अडचणी अाहेत. जिल्हा प्रशासनाने साठवणुकीची समस्या सोडवण्यासाठी गोदामांची मागणी केली असून शासन स्तरावरून तातडीने निर्णय घेण्याची अपेक्षा व्यक्त केली जात अाहे.
 
या हंगामात अाधारभूत किंमत खरेदी योजनेअंतर्गत सुरू असलेली तूर खरेदीची मुदत १८ एप्रिलपर्यंत अाहे. अाता प्रशासनाकडे केवळ अाठ दिवसांचा कालावधी शिल्लक अाहे. फेब्रुवारीमध्ये सुरू झालेली खरेदी सुरवातीला अवघी महिना-दीड महिना सुरळीत झाली. नंतर बारदाना तर कधी ठेवायला जागा नसल्याने खरेदीत खोडा घातला गेला. अाता ही खरेदी बुधवारी (ता.१८) संपणार अाहे.
 
अातापर्यंत अाॅनलाइन नोंदणी झालेल्या ५० टक्के शेतकऱ्यांची तूर खरेदी झालेली नाही. शिवाय चुकाऱ्यांबाबतही संथगती अाहे. सध्या १७ मार्चपर्यंतचे चुकारे झाल्याचे समजते. जवळपास २० ते २५ दिवस ही चुकाऱ्यांची गती मागे पडलेली अाहे.

इतर ताज्या घडामोडी
परभणी जिल्ह्यात हुमणीच्या नुकसानीचा कहरपरभणी ः परभणी जिल्ह्यात उद्‍भवलेल्या दुष्काळी...
बाजार समिती कर्मचारी शासन आस्थापनावर...पुणे  ः राज्यातील बाजार समित्यांमधील...
पुणे विभागात चारापिकांची एक लाख...पुणे   ः जनावरांसाठी चाऱ्याची अडचण येऊ नये...
साताऱ्यात उसावर ‘हुमणी’चा प्रादुर्भावसातारा  ः जिल्ह्यातील विविध पिकांवर ‘हुमणी’...
नगर जिल्ह्यात ३५ हजार हेक्‍टरवरील उसावर...नगर  ः नगर जिल्ह्यात यंदा उसावर ‘हुमणी’चा...
‘पंदेकृवि’तील शिवारफेरीला शेतकऱ्यांचा...अकोला  ः डाॅ. पंजाबराव देशमुख कृषी...
महसूल राज्यमंत्र्यांनी घेतला महागावमधील...महागाव, जि. यवतमाळ  ः दुष्काळग्रस्त भागात...
महाराष्ट्रातील जनताच पंतप्रधान मोदी...शिर्डी, जि. नगर   ः घरकुलाचा लाभ देण्यासाठी...
सरकारने कर्जमाफीत घोटाळा केला : उध्दव...नगर  ः राज्यातील शेतकऱ्यांसाठी कर्जमाफी...
पुण्यात भाजीपाल्याच्या मागणीत वाढ; दरही...पुणे ः गुलटेकडी येथील कृषी उत्पन्न बाजार...
नाशिक जिल्ह्यात सर्वपक्षीय पाणी बचाव...नाशिक  : मराठवाड्यातील जायकवाडी धरणात नाशिक...
इंदापूर बाजार समितीत शेतीमाल तारण योजना...इंदापूर, जि. पुणे  ः महाराष्ट्र राज्य कृषी...
नगर जिल्ह्यात एप्रिलपासून चाराटंचाई...नगर  ः जिल्ह्यात यंदा पाऊस नसल्याचे...
शेतीतील सुधारणांसाठी कृषी विद्यापीठांची...अकोला   ः बदललेल्या परिस्थितीत शेतीतही मोठी...
नगर जिल्हा परिषदेत सरकार विरोधात...नगर  ः जिल्हा परिषदेच्या मालकीच्या...
शेतकऱ्यांच्या मागण्यांबाबत ‘राष्ट्रवादी...अकोला  ः तूर, सोयाबीन, हरभरा या पिकांचा विमा...
शेतकरीप्रश्नी ‘स्वाभिमानी’चे विदर्भ,... पुणे ः पश्चिम महाराष्ट्रातील दूध व ऊस...
औरंगाबादेत बटाटा प्रतिक्‍विंटल १००० ते...औरंगाबाद : येथील कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये...
धुळीतील जिवाणूंना रोखण्यासाठी हवे...खिडक्यातून आत येणाऱ्या सूर्यप्रकाशामुळे धुळीमध्ये...
हळदीमध्ये भरणी, खत व्यवस्थापन...हळदीची उगवण आणि शाकीय वाढ यांनतर पुढील दोन...