नगर ः सरकार शहरांचे पोषण करण्यासाठी खेड्यांचे शोषण करत आहे.
अॅग्रो विशेष
अकोला ः मुदत संपल्याने बुधवार (ता. १८) पासून बंद असलेली तूर खरेदी अद्यापही सुरू झालेली नाही. तीन दिवसांपूर्वी केंद्रीय कृषिमंत्री राधामोहन सिंह यांनी १५ दिवस मुदतवाढ देत असल्याची घोषणा केली आहे. मात्र, अद्याप शासनाकडून त्याबाबत लेखी पत्र नसल्याने जिल्हा यंत्रणांनी तूर खरेदी सुरू केलेली नाही.
अकोला ः मुदत संपल्याने बुधवार (ता. १८) पासून बंद असलेली तूर खरेदी अद्यापही सुरू झालेली नाही. तीन दिवसांपूर्वी केंद्रीय कृषिमंत्री राधामोहन सिंह यांनी १५ दिवस मुदतवाढ देत असल्याची घोषणा केली आहे. मात्र, अद्याप शासनाकडून त्याबाबत लेखी पत्र नसल्याने जिल्हा यंत्रणांनी तूर खरेदी सुरू केलेली नाही.
हमीभावाने राज्यात फेब्रुवारीपासून तूर खरेदी सुरू करण्यात अाली. रखडत रखडत ही खरेदी १८ एप्रिलपर्यंत चालली. बुधवारी या हंगामातील खरेदीची मुदत संपल्याने तत्काळ खरेदी बंद करण्यात अाली. विशेष म्हणजे नवीन नोंदणी करणाऱ्यांची तर दूरच, मात्र ज्यांनी अाॅनलाइन नोंदणी केलेली अाहे, अशांच्याही तुरीचे मोजमाप झालेले नाही. साठवणुकीची अडचण, बारदान्याच्या प्रश्नांवर या मोसमात वारंवार खरेदीत अडथळे अाले अाहेत. त्यामुळे हंगामात खरेदीचे दिवस कमी अाणि बंदचे अधिक अाहेत.
शिवाय, या वर्षी मोजमापाची गतीसुद्धा संथ होती. यामुळे प्रत्येक जिल्ह्यात नोंदणी केलेल्यांपैकी ३० ते ३५ टक्केच शेतकऱ्यांची तूर शासनाने खरेदी केली. राज्यात सध्या लाखो शेतकऱ्यांच्या तुरीची मोजणी अद्यापही होणे शिल्लक अाहे. अशात बुधवारपासून खरेदी थांबवण्यात अाल्याने शेतकऱ्यांसमोर पेच तयार झालेला आहे.
गेल्या अाठवड्यात केंद्रीय कृषिमंत्री राधामोहन सिंह यांनी तूर खरेदीला १५ दिवसांची मुदतवाढ देत असल्याचे घोषित केले. त्यांच्या घोषणेनंतर सोमवारी (ता. २३) दुपारपर्यंत जिल्हा यंत्रणांपर्यंत कुठलेच पत्र पोचलेले नव्हते. परिणामी तूर खरेदी बंदच राहली. जोवर पत्र हातात पडत नाही, तोपर्यंत खरेदी सुरू करता येणे शक्य नसल्याचे अधिकाऱ्यांचे म्हणणे होते. खरेदी बंद करून अाता सात दिवस पूर्ण होत अाहेत.
खरेदीसमोर प्रश्न कायमच
नवीन अादेशानुसार १५ दिवस मुदतवाढ मिळाली तरी यापैकी किती दिवस व किती शेतकऱ्यांच्या तुरीची खरेदी होईल याबाबत साशंकता अाहे. प्रत्येक जिल्ह्यात हजारो शेतकरी तूर विक्रीच्या प्रतीक्षेत अाहेत. या शेतकऱ्यांची तूर मोजायची म्हटली तर किमान अडीच ते तीन महिने लागतील. सध्या तर साठवणुकीच्या जागेचा प्रश्न ठिकठिकाणी बिकट अाहे. जुन्या धान्य साठ्याची विल्हेवाट न झाल्याने शासकीय गोदाम तुडुंब असून, अाता खासगी गोदामांचा अाधार घेण्याची वेळ अालेली अाहे.
- 1 of 289
- ››