agriculture news in marathi, tur procurment and beneficiary issue, jalgaon, maha | Agrowon

जळगावमध्ये २७ हजार क्विंटल तूर खरेदीचे चुकारे थकीत
टीम अॅग्रोवन
बुधवार, 4 एप्रिल 2018
हरभरा खरेदी केंद्र शेतकी संघ सबएजंट म्हणून सुरू करतील. गोदामांची अडचणही लवकरच दूर होईल. तूर खरेदीची मुदत १८ एप्रिल आहे. त्यापूर्वी अधिकाधिक हरभरा खरेदी केंद्रे सुरू होतील. त्याची तयारी झाली आहे. 
- परिमल साळुंखे, पणन अधिकारी, मार्केटिंग फेडरेशन, जळगाव
जळगाव : जिल्ह्यात तूर खरेदी बऱ्यापैकी झालेली असली, तरी सुमारे २७ हजार क्विंटल तूर विक्रीपोटीचे चुकारे शेतकऱ्यांना अदा करण्यात नाफेड अपयशी ठरले आहे. निधी मिळालेला नसल्याने या अडचणी आल्या आहेत; परंतु या आठवड्यात ९० टक्के रखडलेले चुकारे दिले जातील. तूर खरेदीची शासकीय मुदत बुधवारी (ता. १८) संपणार असल्याची माहिती मिळाली आहे. 
 
जिल्ह्यात जामनेर, मुक्ताईनगर, रावेर, जळगाव, चोपडा व अमळनेरच्या तूर खरेदी केंद्राला चांगला प्रतिसाद मिळाला आहे. आतापर्यंत ३९ हजार ३७५ क्विंटल तूर खरेदी झाली असून, या तूर खरेदीपोटीचे सुमारे ७० टक्के शेतकऱ्यांचे चुकारे नाफेडडून प्राप्त झालेले नाहीत. ३५०१ शेतकऱ्यांची तूर खरेदी केली आहे. परंतु जसजशी तूर खरेदीसंबंधीची प्रक्रिया मंद होईल, शेतकऱ्यांचा प्रतिसाद कमी होईल, त्यानुसार जेथे तूर खरेदी सुरू होती, तेथेच हरभरा खरेदी सुरू होणार असल्याची माहिती मिळाली. 
 
जिल्ह्यात जामनेर, मुक्ताईनगर, रावेर, जळगाव, चोपडा, अमळनेर, पाचोरा, चाळीसगाव व जळगाव येथे तूर खरेदी सुरू आहे. तूर खरेदीसाठी येथे नऊ केंद्रे आहेत. 
या नऊ केंद्रांशिवाय भडगाव, यावल आणि पारोळा येथे हरभरा खरेदी केंद्रे सुरू करायची आहेत. यातील फक्त भडगाव येथील हरभरा खरेदी केंद्र सुरू असून, या केंद्रात सुमारे २५० क्विंटल हरभरा खरेदी झाली आहे.
 
उर्वरित ११ खरेदी केंद्रांपैकी रावेरचे केंद्र याच आठवड्यात सुरू करण्याचे नियोजन मार्केटिंग फेडरेशनने केले आहे. तूर खरेदी सुरू असून, मागील वर्षाची व यंदाची अशी तूर गोदामांमध्ये साठविली आहे. गोदामे भरल्याने नव्याने तूर खरेदीला वाव नाही. कारण तूर साठवणुकीसाठी इतर जिल्ह्यांवर अवलंबून राहावे लागत आहे. अशात जोपर्यंत तूर खरेदीचा प्रतिसाद कमी होणार तोपर्यंत हरभरा खरेदी सुरू करता येणार नाही, अशी अडचण नाफेडसमोर आहे.

इतर ताज्या घडामोडी
समुद्राच्या उधाणामुळे पीक नुकसान ...मुंबई  : समुद्र किनाऱ्यावरील शेतीचे तसेच...
‘मग्रारोहयो’त २८ नव्या कामांचा समावेशनागपूर : महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण...
पुणे जिल्ह्यात तीन लाख जमीन...पुणे   ः जमिनीतील विविध घटकांची माहिती...
पुणे जिल्हा परिषदेत दर रविवारी ‘...पुणे  : स्वयंसहायता समूहाच्या (बचत गट)...
गोदावरी कालव्यांचे लोकसहभागातून...कोपरगाव, जि. नगर ः शंभर वर्षांहुन अधिक आयुर्मांन...
सातारा जिल्ह्यात रब्बीत अवघे नऊ टक्के...सातारा  ः रब्बी हंगामात पीक कर्जाकडे...
महालक्ष्मी सरस प्रदर्शनामुळे  ग्रामीण...मुंबई   ः ॲमेझॉन, फ्लिपकार्टच्या...
सहकारमंत्र्यांनी राजीनामा द्यावा :...सोलापूर  ः उसाची एकरकमी एफआरपी देण्यात साखर...
काँग्रेसमध्ये नवचैतन्य; प्रियंका गांधी...नवी दिल्ली : काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधी...
पीकनिहाय सेंद्रिय खत व्यवस्थापनपशुपालनातून जमिनीची सुपीकता हा विषय आता...
परोपजीवी मित्र-कीटकांची ओळखसध्या केवळ कीडनियंत्रणासाठी कीटकनाशकांच्या...
खोडवा उसाला द्या शिफारशीत खतमात्रापाण्याची उपलब्धता लक्षात घेऊन रासायनिक खतांचा...
परभणीत काकडी १००० ते १५०० रुपये क्विंटलपरभणी : येथील पाथरी रस्त्यावरील फळे,...
मागण्यांसाठी संग्रामपूर येथे...बुलडाणा  ः जनावरांसाठी चारा नाही, लोकांना...
शेतकऱ्यांनी पाडली तूर खरेदी बंदयवतमाळ : हमीभावापेक्षा ९०० ते १००० रुपये कमी...
कर्जमाफीसाठी पॉलिहाउस शेडनेटधारक...नगर  : पॉलिहाउस शेडनेटधारक शेतकऱ्यांचे...
विदर्भात पाच ठिकाणी होणार ब्रिज कम...अमरावती  ः भूजल पुनर्भरणाच्या उद्देशाने...
सोलापूर जिल्ह्यातील १६२ पाणंद...सोलापूर : सोलापूर जिल्ह्यात पालकमंत्री पाणंद...
खानदेशात मक्याची आवक नगण्यजळगाव : खानदेशातील प्रमुख बाजार समित्यांमध्ये मक्...
सातारा जिल्ह्यात ४६ लाख ३५ हजार टन ऊस...सातारा : जिल्ह्यातील ऊस गाळप हंगाम वेगात...