तीन जिल्ह्यातील खरेदी केंद्रांवर ६७,६७८ क्विंटल तूर पडून

तूर खरेदी
तूर खरेदी

परभणी : आधारभूत किंमत खरेदी योजनेंतर्गत मराठवाड्यातील नांदेड, परभणी, हिंगोली या तीन जिल्ह्यांतील २२ खरेदी केंद्रांवर शनिवारपर्यंत (ता. ३१) १५,४३१ शेतकऱ्यांची १ लाख ७० हजार ४५९.५७ क्विंटल तूर खरेदी करण्यात आली. वखार महामंडळाच्या गोदामात जागा नसल्यामुळे तीनही जिल्ह्यांतील खरेदी केंद्रांवर ६७,६७८ क्विंटल तूर पडून आहे. त्यामुळे ३६ कोटी ८८ लाख ५० हजार २७७ रुपये रकमेचे चुकारे मिळण्यास विलंब लागणार आहे.

नांदेड (अर्धापूर) येथील केंद्रावर एका शेतकऱ्याची १०.५० किलो खरेदी वगळता अन्य ठिकाणी हरभरा खरेदी सुरू नाही. परंतु तीन जिल्ह्यांत मिळून एकूण ३७२८ शेतकऱ्यांनी आॅनलाइन नोंदणी केली आहे.

या तीन जिल्ह्यांत तुरीसाठी ४७,५१३ शेतकऱ्यांनी आॅनलाइन नोंदणी केली आहे. त्यापैकी मार्चअखेर पर्यंत १५ हजार ४३१ शेतकऱ्यांची तूर खरेदी करण्यात आली. नांदेड जिल्ह्यात नांदेड (अर्धापूर), लोहा, मुखेड, देगलूर, बिलोली, नायगांव, भोकर, किनवट, हदगाव या ठिकाणी नाफेड तर्फे तर धर्माबाद येथे विदर्भ को आॅपरेटिव्ह फेडरेशन तर्फे तूर खरेदी केली जात आहे. तूर खरेदीच्या दोन महिन्यात या सर्व खरेदी केंद्रांवर १०,१२६ शेतकऱ्यांची १ लाख २ हजार ९०६.०७ क्विंटल तूर खरेदी करण्यात आली.

यामध्ये नांदेड (अर्धापूर) येथील खरेदी केंद्रांवर ११३६ शेतकऱ्यांची १२,८८५.५०, लोहा येथे २८८ शेतकऱ्यांची ३२६९.५०, मुखेड येथे ७६० शेतकऱ्यांची ७९२०.५०, नायगाव येथे १०१८ शेतकऱ्यांची ९८४०, बिलोली येथे ११५८ शेतकऱ्यांची १२,५५२.०८, देगलूर येथे ९८८ शेतकऱ्यांची १२,४८९.५०, भोकर येथे ५१४ शेतकऱ्यांची ५३३२, किनवट येथे १७४२ शेतकऱ्यांची १३५०८.८९, हदगाव येथे २१२ शेतकऱ्यांची २०६०, धर्माबाद येथे १७८७ शेतकऱ्यांची १८,२४६ क्विंटल तूर खरेदी करण्यात आली.

परभणी जिल्ह्यात नाफेडच्या ६ आणि विदर्भ को. मार्केटिंग फेडरेशनच्या एक अशा एकूण सात केंद्रांवर तूर खरेदी करण्यात आली. नाफेडच्या परभणी येथील केंद्रावर १७७ शेतकऱ्यांची ३०६२, बोरी येथे १९६ शेतकऱ्यांची ३८३४, जिंतूर येथे ४९६ शेतकऱ्यांची ८०२९, सेलू येथे ३८३ शेतकऱ्यांची ५८५५, गंगाखेड येथे ३५३ शेतकऱ्यांची ५२७०, पूर्णा येथे ३२४ शेतकऱ्यांची ५३८८ क्विंटल तूर खरेदी करण्यात आली आहे. मानवत येथील विदर्भ को मार्केटिंग फेडरेशनच्या खरेदी केंद्रावर ३९८ शेतकऱ्यांची ५७०३ क्विंटल अशी परभणी जिल्ह्यातील ७ केंद्रांवर एकूण २३२९ शेतकऱ्यांची ३७,१४२ क्विंटल तूर खरेदी करण्यात आली.

हिंगोली जिल्ह्यातील ५ खरेदी केंद्रांवर २९७६ शेतकऱ्यांची ३०,४११.५० क्विंटल तूर खरेदी करण्यात आली. यामध्ये हिंगोली येथील ३७८ शेतकऱ्यांची ५३२२, कळमनुरी येथील ७५४ शेतकऱ्यांची ७५८०, वसमत येथे ५९६ शेतकऱ्यांची ४२१३, जवळा बाजार येथे ६९० शेतकऱ्यांची ६६३०.५०, सेनगाव येथील ५६८ शेतकऱ्यांच्या ६६६५.५० क्विंटल तुरीचा समावेश आहे.

 नांदेड, परभणी, हिंगोली जिल्ह्यातील ३७२८ शेतकऱ्यांनी हरभऱ्यासाठी आॅनलाइन नोंदणी केली आहे.त्यापैकी नांदेड (अर्धापूर) येथील केंद्रावर एका शेतकऱ्याची १०.५० क्विंटल हरभऱ्याची खरेदी करण्यात आली. अन्य ठिकाणी जागेअभावी हरभ-याची खरेदी अजून सुरू करता येत नाही, असे सूत्रांनी सांगितले.

तीन जिल्ह्यांत वखार महामंडळाच्या गोदामातील जागेअभावी तब्बल ६७,६७८ क्विंटल तूर खरेदी केंद्रावर पडून आहे.त्यामुळे शेतकऱ्यांच्या ३६,८८,५०,२७७ रुपयांचे चुकारे देण्यास विलंब लागणार आहे. खरेदी केंद्रावर पडून असलेली तूर वखार महामंडळाच्या गोदामात साठविल्यानंतरच चुकारे देण्याचा मार्ग मोकळा होईल. जागा नसल्यामुळे सध्या तूर खरेदीची प्रक्रिया अत्यंत संथगतीने सुरू आहे.  

तूर खरेदी स्थिती (क्विंटल)
जिल्हा शेतकरी संख्या तूर खरेदी
नांदेड १०,१२६ १,०२,९०६.०७
परभणी २३२९ ३७,१४२
हिंगोली २९७६ ३०४११.५०

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com