agriculture news in marathi, tur procurment center suddenly closed, nagar, maharashtra | Agrowon

कर्जत येथील तूर खरेदी केंद्र अचानक बंद
टीम अॅग्रोवन
शुक्रवार, 9 मार्च 2018
आमच्या केंद्रावर आतापर्यंत आठ हजार क्विंटल खरेदी झाली आहे. गेल्यावर्षी आम्ही एक लाख अठरा क्विंटल तूर खरेदी केली, तीस हजार क्विंटल उडीद खरेदी केली. दोन वर्षांत अजून एकही तक्रार नाही. मात्र पालकमंत्री प्रा. राम शिंदे यांनी जाणीवपूर्वक राजकीय आकसापोटी आमचे खरेदी केंद्र बंद केले आहे. तालुक्‍यातील शेतकऱ्यांना वेठीस धरण्याचे काम सुरू आहे.
- विठ्ठल पिसाळ, केंद्रप्रमुख, तूर खरेदी केंद्र, कर्जत.
नगर  ः शेतकऱ्यांची व्यापाऱ्याकडून होणारी लूट थांबविण्यासाठी हमीभावाने तूर खरेदी करण्यासाठी सुरू केलेले कर्जत येथील तूर खरेदी केंद्र बुधवारी (ता. ७) अचानक बंद करण्यात आले. येथे तूर विक्रीसाठी सुमारे अठराशेवर शेतकऱ्यांनी नोंदणी केली होती. त्यातील अजून बाराशेवर शेतकऱ्यांची तूर खरेदी करणे बाकी असताना जिल्हा मार्केटिंग अधिकाऱ्यांनी खरेदी केंद्र बंद करण्याचे आदेश दिले. प्रधान कार्यालयाच्या आदेशाने खरेदी केंद्र बंद केल्याचे सांगण्यात आले आहे. खरेदी केंद्र अचानक बंद केल्याने तूर उत्पादक शेतकऱ्यांची मात्र मोठी अडचण झाली आहे. 
 
जिल्ह्यात तूर खरेदीचा प्रश्‍न गेल्या वर्षीपासून सातत्याने चर्चेत आहे. यंदाही तुरीची बऱ्यापैकी उत्पादन झालेले असल्यामुळे बाजारात आवक वाढली आहे. मात्र, व्यापाऱ्यांकडून हमी दरापेक्षा कमी दराने खरेदी केली जात असल्यामुळे नाफेडमार्फत हमीभावाने तुरीची खरेदी करण्यासाठी यंदाही जिल्ह्यामध्ये नऊ ठिकाणी तूर खरेदी केंद्र सुरू करण्यात आले आहेत. सरकारी खरेदी केंद्रावर तूर विक्रीसाठी शेतकऱ्यांनी ऑनलाइन नोंदणीही केलेली आहे. खरेदी केंद्रे सुरळीत सुरू असताना बुधवारी कर्जत येथील तूर खरेदी केंद्र बंद करण्याबाबत जिल्हा मार्केटिंग अधिकारी भारत पाटील यांनी केंद्र चालकास पत्र दिले.
 
अचानक झालेल्या या निर्णयामुळे शेतकरीही अवाक झाले आहेत. येथे तूर विक्री करण्यासाठी आतापर्यंत सुमारे एक हजार आठशे शेतकऱ्यांनी ऑनलाइन नोंदणी केली होती. त्यातील साधारण पाचशे शेतकऱ्यांची तूर हमी दराने खरेदीही झाली आहे. अजूनही अनेक शेतकरी येथे तूर विक्री करण्याच्या प्रतीक्षेत आहेत.
 
अचानक खरेदी केंद्र बंद झाल्याने येथे तूर विक्रीसाठी आलेल्या शेतकऱ्यांना परत जावे लागले. विक्रीसाठी तूर आणण्याचा संदेश आल्यावर तालुक्‍याच्या दूरवरच्या भागातून शेतकरी येथे तूर विक्रीसाठी आले, मात्र खरेदी केंद्र बंद झाल्याचे कळल्यावर आता वाहतुकीचा नाहक भुर्दंड सोसावा लागणार आहे.
 
कर्जत येथील तूर खरेदी केंद्र प्रधान कार्यालयाच्या सूचनेनुसार बंद केले असे जिल्हा मार्केटिंग अधिकारी भारत पाटील यांनी सांगितले. सुरळीत सुरू असलेले तूर खरेदी केंद्र प्रधान कार्यालयाने बंद करण्यास का सांगितले, याबाबत मात्र सांगितले जात नाही. येथे तूर विक्रीसाठी नोंदणी केलेल्या शेतकऱ्यांनी शेजारच्या खरेदी केंद्रावर तूर विक्री करण्याचा सल्ला मार्केटिंग फेडरेशनने दिला आहे. शेजारी म्हणजे येथून २२ किलोमीटर अंतरावर मिरजगाव येथे तूर खरेदी केंद्र आहे. 

इतर ताज्या घडामोडी
शेतमालाला भाव न देणारे उत्पन्न दुप्पट...भंडारा : शेतमालाला भाव नसल्याने अधिक...
भाजप हा उमेदवार आयात करणारा पक्ष : रावतेनागपूर : भाजप हा उमेदवार आयात करणारा पक्ष...
कृषी सल्ला : भात, भुईमुग, आंबा,...भात ः सध्या रोपवाटिकेसाठी शेतकऱ्यांनी तयारी सुरू...
द्राक्ष बागेत रोगांच्या प्रादुर्भावाची... सर्व द्राक्ष विभागांमध्ये...
कृषी तंत्रज्ञान पदविका अभ्‍यासक्रम...मुंबई : राहुरी येथील महात्मा फुले कृषी...
सातारा जिल्ह्यात आले लागवडीस गतीसातारा  ः उष्णतेत वाढीमुळे रखडलेल्या आले...
शेतकऱ्यांना मिळणार पाच रुपयांत पोटभर...लातूर  : शंभर-दीडशे किलोमीटर अंतरावरून आपला...
रोहित्राच्या बाॅक्समधील फ्यूज तारांच्या...परभणी ः जिल्ह्यातील कृषी पंपाना वीजपुरवठा...
नष्ट होत असलेल्या देशी वाणांचे संवर्धन...पुणे ः हरितक्रांतीच्या नादात अधिक उत्पादनाच्या...
यवतमाळ जिल्ह्यात फळबागांनी टाकल्या मानायवतमाळ  : कडाक्‍याच्या उन्हामुळे...
कागदपत्रांची पूर्तता करूनही लिलाव बंद...मालेगाव, जि. नाशिक  : मालेगाव कृषी उत्पन्‍न...
शेतकऱ्यांना ‘करार शेती’च्या माध्यमातून...नवी दिल्ली : शेतमालाचा बाजार आणि किंमतीतील...
सोलापूर बाजार समितीत ३९ कोटींचा...सोलापूर : सोलापूर कृषी उत्पन्न बाजार समितीत...
साताऱ्यात गवार २०० ते ३०० रुपये दहाकिलोसातारा : येथील कृषी उत्पन्न बाजार समितीत मंगळवारी...
देशात सर्वांत महाग पेट्रोल धर्माबादला,...नांदेड : नांदेड जिल्ह्याच्या तेलंगणा व...
पेरूबागेसाठी सघन लागवडीचे तंत्रपेरू बागेमध्ये उत्पादकता वाढवण्यासाठी सघन...
जळगाव बाजार समितीकडून आवाराबाहेर...जळगाव : फळे-भाजीपाला नियमनमुक्तीनंतर बाजार समिती...
जीएम ई. कोलाय जैवइंधननिर्मितीसाठी...जैवइंधनाच्या निर्मितीसाठी जनुकीय तंत्रज्ञानाने...
पुणे विभागात पाणीटंचाई वाढतेयपुणे : वाढत्या उन्हाबरोबरच पुणे विभागातील...
जळगाव जिल्ह्यातील पाणीटंचाई होतेय भीषणजळगाव  ः जिल्ह्यातील पश्‍चिम पट्ट्यात...