agriculture news in marathi, tur procurment process and storage issue, latur, maharashtra | Agrowon

लातूर, बीड जिल्ह्यात साठवणुक जागेअभावी तूर खरेदीला ब्रेक
टीम अॅग्रोवन
सोमवार, 2 एप्रिल 2018
साठवणुकीसाठी जागेचा प्रश्‍न निर्माण झाल्याने तूर खरेदीला ब्रेक लागला आहे. जसजशी जागा उपलब्ध होईल तसतशी खरेदी केली जाईल. 
- यादव सुमठाने, जिल्हा पणन अधिकारी, लातूर. 
औरंगाबाद  : हमीभावाने तूर खरेदीसाठी नोंदणी केलेल्या शेतकऱ्यांच्या तूर खरेदीला साठवणुकीच्या जागेअभावी ब्रेक लागला आहे. लातूर जिल्ह्यात दहापैकी केवळ तीन खरेदी केंद्र शुक्रवारी (ता. ३०) सुरू होती तर बीड जिल्ह्यात १५ पैकी केवळ सहा केंद्रांवरच तुरीची खरेदी झाली. जेथे जागेचा प्रश्‍न सुटला आहे त्याच केंद्रावर खरेदी सुरू असल्याची माहिती सूत्रांनी दिली. 
 
मराठवाड्यातील लातूर, बीड, उस्मानाबाद हे जिल्हे तुरीचे आगर म्हणून प्रसिद्ध आहेत. बाजारातील दर पडल्याने शासनाने हमी दराने तुरीची खरेदी केंद्रे सुरू केली. लातूर जिल्ह्यात १० केंद्रावरून १० हजार ४२४ शेतकऱ्यांची १ लाख १० हजार ९७ क्‍विंटल तुरीची खरेदी केली गेली.
 
गतवर्षी खरेदी केलेली तूर व इतर शेतीमाल गोदामांमध्ये साठवलेला असल्याने यंदा तूर खरेदीत जागेचा प्रश्‍न भेडसावेल हे स्पष्ट होते. लातूर जिल्ह्यात शुक्रवारी त्याचा सर्वाधिक परिणाम दिसून आला. साठवणुकीच्या जागेअभावी जिल्ह्यातील १० पैकी केवळ ३ खरेदी केंद्रांवरच तुरीची खरेदी करणे शक्‍य झाले. लातूर जिल्ह्यात खरेदी केलेल्या एकूण तुरीपैकी ५५ हजार ३४१ क्‍विंटल तुरीला साठवणुकीसाठी जागाच मिळाली नाही. त्यामुळे ही तूर संबंधित खरेदी केंद्रावरच पडून आहे.
 
बीड जिल्ह्यातही यापेक्षा वेगळी स्थिती नाही. बीड जिल्ह्यात शुक्रवारी १५ पैकी केवळ सहा खरेदी केंद्रावरच तुरीची खरेदी करणे शक्‍य झाली. बीड जिल्ह्यात शनिवारपर्यंत (ता. ३१) पंधरा खरेदी केंद्रावरून १० हजार ५६७ शेतकऱ्यांची १ लाख १५ क्‍विंटल तूर खरेदी करण्यात आली. त्यापैकी तब्बल ५७ हजार ९०६ क्‍विंटल तूर अजूनही खरेदी केलेल्या केंद्रावरच पडून असल्याची माहिती सूत्रांनी दिली.
 
तुरीच्या खरेदीला साठवणुकीसाठी जागाच नसल्याने ब्रेक लागला असून हरभऱ्याच्या खरेदीलाही याच कारणाने विलंब होत असल्याचे बोलले जात आहे. गोदामात साठवणूक न होण्याने शेतकऱ्यांना विक्री केलेल्या शेतीमालाचे चुकारेही मिळण्यात अडथळा निर्माण झाला आहे.

इतर बातम्या
उरुग्वेतील गायीमधील लेप्टोस्पायरा...जगभरामध्ये प्राणी आणि मनुष्यामध्ये...
सागरी माशांच्या बिजोत्पादनाचे तंत्र...कोची येथील केंद्रीय सामुद्री मत्स्य संशोधन...
कोल्हापुरातील ११० गावांत कृत्रिम...कोल्हापूर : अनुवंशिक सुधारणा होऊन सशक्त जनावरांची...
जळगाव जिल्ह्यात तुरळक पाऊसजळगाव ः जिल्ह्यात सोमवारी (ता. १७) सकाळी ८ पर्यंत...
महाराष्ट्रात भावांतर योजना लागू...परभणी ः शेती एवढ्या समस्या कुठेच नाहीच. सर्व...
शेतकरी, आदिवासींच्या विकासाची कामे...परभणी ः जिल्ह्यातील शेतकरी, मागास, आदिवासी...
पुणे विभागात ७३,७४० हजार हेक्टरवर...पुणे   ः  गेल्या साडेतीन महिन्यांत...
मराठवाड्यासाठी निधी कमी पडू दिला जाणार...औरंगाबाद  : मराठवाड्याच्या दुष्काळमुक्तीसाठी...
डाळिंब उत्पादनात घट होण्याची शक्यतासांगली ः राज्यात पावसाने दडी मारली आहे. यामुळे...
पावसाअभावी वऱ्हाडात सोयाबीनचे उत्पादन...अकोला   ः या हंगामात वऱ्हाडात सर्वाधिक लागवड...
ऊसदर नियंत्रण समितीची पहिली बैठक...मुंबई : ऊसदर नियंत्रण समितीची बैठक सोमवारी (ता.१७...
शेतमाल तारण योजना न राबविणाऱ्या बाजार... मुंबई : शेतकऱ्यांना योग्य बाजारभाव मिळावा...
शास्त्रज्ञ भरती मंडळावर कृषी...पुणे : देशाच्या कृषी शिक्षण संस्थांना नव्या...
शेतकऱ्यांकडून घेतलेल्याच दुधाची भुकटी...जळगाव ः राज्यात प्रतिदिन सहकारी व इतर प्रमुख दूध...
तुरळक ठिकाणी पावसाची शक्यतापुणे : पोषक हवामान तयार झाल्याने रविवारी (ता. १६...
सिंचन प्रकल्पांसाठी ६५ हजार कोटी :...नवी दिल्ली ः देशातील सिंचन प्रकल्पांचा विकास...
पुणे जिल्ह्यात महिनाभरात नऊ जणांचा...उरुळी कांचन, जि. पुणे : संपूर्ण राज्यात चिंतेचा...
मी 35-40 रूपयांनी पेट्रोल-डिझेलची...नवी दिल्ली : सध्या पेट्रोल-डिझेल दरवाढीमुळे मोदी...
लाल मातीचा सन्मान वाढविणारे आंदळकरकोल्हापुरातील २२ जून १९७० चा म्हणजे ४८...
डी.आर. कुलकर्णी यांचे निधनपुणे : 'सकाळ'च्या पुणे आवृत्तीतील मुख्य उपसंपादक...