agriculture news in marathi, tur procurment process delay, jalgaon, maharashtra | Agrowon

जळगाव जिल्ह्यात तूर खरेदी रखडतच सुरू
टीम अॅग्रोवन
मंगळवार, 27 मार्च 2018
गोदामांची अडचण आहे; परंतु जे धान्य खरेदी केले आहे, ते सटाणा व नवापूर येथे साठविण्याबाबत विचार सुरू आहे. गोदामांची समस्या दूर होईल. हरभरा खरेदी एका केंद्रावर सुरू असून, इतर ११ केंद्रांवरही लवकरच खरेदी सुरू होईल. 
- परिमल साळुंखे, पणन अधिकारी, मार्केटिंग फेडरेशन, जळगाव.
जळगाव  ः वखार महामंडळाची गोदामे नसल्याने जिल्ह्यातील तूर खरेदी रखडतच सुरू असून, काही केंद्रांवर रोजच्या खरेदीची अल्प मर्यादा ठरविली जात आहे. तसेच मंजूर झालेल्या १२ खरेदी केंद्रांपैकी फक्त भडगाव येथे हरभरा खरेदी केंद्र सुरू झाले आहे. 
 
जिल्ह्यात आतापर्यंत सुमारे ३१ हजार क्विंटल तूर खरेदी झाली असून, यातील फक्त २० टक्के तूर खरेदीपोटीचे चुकारे शेतकऱ्यांना दिले आहेत. उर्वरित चुकारे देण्याची प्रक्रिया सुरू आहे. या दोन-तीन दिवसांत सर्वांना चुकारे दिले जातील, असा दावा मार्केटींग फेडरेशनने केला आहे.
 
नऊ ठिकाणी तूर खरेदी सुरू असून, त्यात रावेर, मुक्ताईनगर, बोदवड, जामनेर, पाचोरा, चाळीसगाव, अमळनेर, जळगाव, चोपडा या केंद्रांचा समावेश आहे. मागील वर्षी जे धान्य शासकीय योजनेतून खरेदी केले ते वखार महामंडळाच्या गोदामांमध्ये पडून आहे.
 
यंदा खरेदी केलेली तूर व इतर धान्याची त्यात भर पडली असून, यामुळे गोदामे भरली आहे. धान्य ठेवायला जागा नाही. मार्केटिंग फेडरेशन गोदामांची शोधाशोध करीत असून, सटाणा (जि. नाशिक) व नवापूर (जि. नंदुरबार) येथे खरेदी केलेले धान्य साठविण्याची तयारी सुरू आहे.
 
जेथे सध्या तूर खरेदी सुरू आहेत, त्याच केंद्रात हरभरा खरेदीसही मंजुरी मिळाली असून, पारोळा, भडगाव आणि यावल येथेही हरभरा खरेदीस मंजुरी आहे. यात ज्या नऊ केंद्रांवर सध्या तूर खरेदी सुरू आहे, तेथे हरभरा खरेदी सुरू झालेली नाही. कारण तुरीसह हरभरा खरेदी सुरू केली, तर यंत्रणेवर ताण वाढेल, धान्य साठविण्यास जागा राहणार नाही. 
 
हरभरा खरेदीसाठी फक्त भडगाव येथे मागील आठवड्यात केंद्र सुरू केले आहे. उर्वरित केंद्रे गोदामे उपलब्ध झाल्यानंतर व तुरीची आवक कमी झाल्यावर सुरू करण्याचे नियोजन असल्याची माहिती सूत्रांनी दिली.
 
जिल्ह्यात या हंगामात हरभऱ्याची पेरणी अधिक झाली आहे. परंतु बाजारात दर कमी असल्याने शासकीय खरेदी केंद्रांवरील अवलंबित्व वाढले आहे. परंतु एकच खरेदी केंद्र असल्याने शेतकऱ्यांना खासगी बाजारात हरभरा विक्री करावी लागत आहे. 

इतर ताज्या घडामोडी
संघर्ष गोकुळ ‘मल्टिस्टेट’चाकोल्हापूर जिल्हा दूध संघ (गोकुळ) मल्टिस्टेट...
'दारुमुळे दरवर्षी अडीच लाखापेक्षा जास्त...नवी दिल्ली- दारूमुळे दरवर्षी जवळपास अडीच...
जालन्यात पाण्यात बुडून तिघांचा मृत्यूजालना : गणपती बाप्पांचे विसर्जन करताना जालना...
शिखर, रोहितने पाकला धुतले; भारत अंतिम...दुबई : पाकिस्तानने उभारलेल्या 237 धावांचा सहजी...
खानदेशात मध्यम पाऊस; नंदुरबारला हुलकावणीजळगाव : खानदेशात शुक्रवारी (ता.२१) मध्यरात्री व...
पुणे जिल्ह्यात ढगाळ हवामानपुणे  : जिल्ह्यात आठवड्याच्या सुरवातीला...
खानापूर घाटमाथ्यावर तीव्र पाणीटंचाई सांगली  : घाटमाथ्यावर पावसाने ओढ दिली आहे....
नगर जिल्ह्यात साडेसहा लाख हेक्‍टरवर...नगर  ः जिल्ह्यात रब्बी हंगामात सहा लाख ५२...
कौशल्यावर आधारित उपक्रम ‘रयत’मध्ये सुरू...सातारा  ः केवळ पुस्तकी नव्हे तर कौशल्यावर...
नियमित कर्ज भरणाऱ्या शेतकऱ्यांचा अकोला...अकोला  ः नियमित कर्जाची परतफेड करणाऱ्या...
सांगली जिल्ह्यात पाणीप्रश्‍न पेटण्याची...सांगली  : पावसाने दिलेली उघडीप आणि पावसाळा...
अकोला, बुलडाण्यात सर्वदूर पाऊसअकोला   ः वऱ्हाडातील अकोला, बुलडाणा या...
सावधान... अल्झायमर आला उंबरठ्यावर ! कोल्हापूर : मंगळवार पेठेतल्या विठ्ठल मंदिरात रोज...
परभणीत हिरवी मिरची प्रतिक्विंटल ६०० ते...परभणी ः येथील जुना मोंढा भागातील फळे-भाजीपाला...
भातावरील तुडतुडे प्रादुर्भावाकडे...सध्या खरीप हंगामातील भात पीक बहुतेक ठिकाणी...
कमी तीव्रतेच्या वणव्यांचाही मातीच्या...कमी तीव्रतेचे वणवे किंवा मर्यादित प्रमाणात...
ढगाळ वातावरणाने खानदेशात सोयाबीन मळणीला...जळगाव : खानदेशातील धुळे, नंदुरबार व जळगाव...
माळेगावकरांचा औद्योगिक वसाहतीच्या...नाशिक : माळेगाव औद्योगिक वसाहतीच्या टप्पा क्रमांक...
परभणीत व्यापाऱ्यांचे असहकार आंदोलन सुरूचपरभणी ः परभणी कृषी उत्पन्न बाजार समितीअंतर्गत...
सांगली जिल्ह्यात द्राक्ष क्षेत्रात वाढसांगली  ः दर्जेदार द्राक्ष उत्पादनासाठी...