agriculture news in marathi, tur procurment process status, jalgaon, maharashtra | Agrowon

जळगाव जिल्ह्यात सहा हजार क्विंटल तूर खरेदी
टीम अॅग्रोवन
शनिवार, 3 मार्च 2018
तूर खरेदीला जिल्ह्यात चांगला प्रतिसाद आहे. चुकारे निर्देशानुसार दिले जात असून, विलंब होत नाही. थेट शेतकऱ्यांच्या बॅंक खात्यात चुकारे जमा केले जातात. 
- परिमल साळुंखे, पणन अधिकारी, मार्केटिंग फेडरेशन, जळगाव.
जळगाव : जिल्ह्यात सर्व नऊ तूर खरेदी केंद्रे सुरू झाली आहेत. या केंद्रांवर मिळून सहा हजार क्विंटल तुरीची खरेदी झाली असून, खरेदीबाबत चांगला प्रतिसाद मिळत आहे. तसेच येत्या १५ तारखेपासून हरभऱ्याची खरेदीही नाफेड सुरू करण्याची शक्‍यता व्यक्त करण्यात आली आहे. 
 
जिल्ह्यात १५ फेब्रुवारीपर्यंत फक्त चारच तूर खरेदी केंद्रे सुरू झाली होती. त्यात अमळनेर, जामनेर, बोदवड व मुक्ताईनगरचा समावेश होता. उर्वरित पाच खरेदी केंद्रे मागील आठवड्यात सुरू झाली आहेत.
 
त्यात पाचोरा, चाळीसगाव, जळगाव, चोपडा, रावेर या केंद्रांचा समावेश आहे. या केंद्रांपैकी सर्वाधिक तूर खरेदी अमळनेर येथील केंद्रात झाली आहे. यापाठोपाठ जामनेर, मुक्ताईनगर, रावेर येथील केंद्रांमध्येदेखील तूर खरेदी झाली आहे.
 
६५० शेतकऱ्यांच्या सहा हजार क्विंटल तुरीची खरेदी झाली असून, आठवडाभरात थेट शेतकऱ्यांच्या बॅंक खात्यांवर चुकारे जमा केले जात असल्याची माहिती मिळाली. चुकारे थकलेले नाहीत, असा दावा करण्यात आला. तूर खरेदीबाबत आणखी केंद्रे वाढविण्याची शक्‍यता मात्र नाही. कारण ज्या भागात तुरीचे उत्पादन चांगले आहे, त्या भागात खरेदी केंद्रे सुरू केली आहेत. 
 
येत्या १५ मार्चपासून नाफेडतर्फे हरभऱ्याची खरेदीदेखील केली जाण्याची शक्‍यता आहे; परंतु याबाबत अजून मार्गदर्शक सूचना, स्पष्ट आदेश शासन किंवा नाफेडकडून जिल्हा प्रशासनाला प्राप्त झालेले नाहीत. हरभऱ्याची खरेदी ४४०० रुपये क्विंटल या दरात होऊ शकते; परंतु काबुली हरभरा व इतर प्रकारच्या हरभऱ्याचे दर कसे राहतील, हे अद्याप स्पष्ट करण्यात आलेले नाही. 
टॅग्स

इतर ताज्या घडामोडी
भाजीपाला सल्लासध्याच्या काळात बाजारपेठेची मागणी लक्षात घेऊन...
कृषी सल्ला : ऊस, कापूस, तूर, गहू, हरभरा...ज्या ठिकाणी पाण्याचा ताण बसत आहे, त्या ठिकाणी...
हाताचा नाकाशी होणाऱ्या संपर्कातूनही...न्यूमोनियाकारक जिवाणू हा नाकाला हात लावणे,...
खानदेशात खरिपातील ज्वारीची आवक सुरुजळगाव : खानदेशात अनेक भागांत ज्वारीची मळणी जवळपास...
परभणी जिल्ह्यात मुगाची उत्पादकता एकरी १...परभणी : यंदा परभणी जिल्ह्यात मुगाची सरासरी...
पुणे जिल्ह्यात चाराटंचाईपुणे   ः पुणे जिल्ह्यातील पूर्व पट्ट्यात...
नगर - मराठवाड्यात पाण्यावरून संघर्षाची...नगर ः पुरेसा पाऊस झाला नसल्याने यंदा...
‘महसूल’च्या जागेवर चाऱ्याच्या...यवतमाळ  ः पांढरकवडा व राळेगाव तालुक्‍यांतील...
सातारा जिल्ह्यात ७७३ एकरांवर तुती लागवडसातारा  ः जिल्ह्यात रेशीम शेती करण्याकडे...
हिंगोली, नांदेड, परभणीत आॅनलाइन नोंदणीत...परभणी   ः आधारभूत किंमत खरेदी योजनेअंतर्गत...
वारणा नदीवरील बंधारा दुरुस्तीमुळे...कोल्हापूर  : वारणा नदीवरील विविध बंधाऱ्यांची...
अळिंबी, स्पॉन्सच्या नावीन्यपूर्ण...सर्व वयोगटातील लोंकासाठी अळिंबी हे अत्यंत पोषक...
शेतीमाल विक्रीसाठी १२ शेतकऱ्यांची नोंदणीसांगली ः सांगली जिल्ह्यातील शेतकऱ्यांना उडीद, मूग...
नांदेड, परभणी, हिंगोलीत मूग, उडदाला कमी...नांदेड ः नांदेड, परभणी, हिंगोलीतील कृषी उत्पन्न...
पीक संरक्षण क्षेत्रात ‘महिंद्रा’ची...मुंबई : कृषी अवजारे आणि शेती उत्पादनात देशात...
गिरणारे बाजारातील बेहिशेबी वसुलीला चापनाशिक : गिरणारे (ता. जि. नाशिक) येथील टोमॅटो...
'योग्य आर्थिक व्यवस्थापन हा शेती...नाशिक : ‘‘योग्य आर्थिक व्यवस्थापन हाच शेती...
कपाशीवरील पांढरी माशी, कोळी नियंत्रण...सध्या कोरडवाहू कपाशीवर पांढऱ्या माशी व कोळी या...
जळगावात केळीदरात १०० रुपयांनी वाढजळगाव ः केळी दरात गत आठवड्याच्या अखेरीस...
नागपुरात नव्या सोयाबीनची बाजारात आवक...नागपूर ः बाजारात नव्या सोयाबीनची आवक वाढती असली...