agriculture news in marathi, tur procurment process status, jalgaon, maharashtra | Agrowon

जळगावमधील शासकीय केंद्रांवर आठ हजार क्विंटल तूर खरेदी
टीम अॅग्रोवन
बुधवार, 7 मार्च 2018
तुरीचे उत्पादन अधिक आले आहे. काही शेतकऱ्यांचे शेवटच्या पावसामुळे नुकसान झाले; परंतु आणखी दरवाढ होईल, अशी प्रतीक्षा शेतकऱ्यांना आहे. 
- अतुल मधुकर पाटील, शेतकरी, केऱ्हाळे, जि.जळगाव.
जळगाव  ः जिल्ह्यात शासकीय तूर खरेदी केंद्र मागील महिनाभरापासून सुरू असून, खरेदीला वेग आला आहे. आजघडीला शासकीय केंद्रांवर सुमारे आठ हजार क्विंटलपर्यंत तूर खरेदी झाली आहे. शासकीय खरेदी केंद्रांमुळे खासगी बाजारातील तूर दरातही काहीशी सुधारणा झाली असून, दर ४४०० रुपये क्विंटलपर्यंत गेले आहेत. देशी वाणांच्या गावरान प्रकारातील तुरीला अधिक दर असून, शेतकऱ्यांना शेतातच पाच हजार रुपये क्विंटल दर मिळत असल्याची माहिती मिळाली. 
 
संकरित प्रकारच्या तुरीला गावरान तुरीच्या तुलनेत कमी दर असले, तरी अलीकडे खासगी बाजारात दरात सुधारणा झाली आहे; परंतु जळगावसह अमळनेर येथील बाजार समितीमध्ये तुरीची आवक अतिशय नगण्य अशीच आहे. जिल्ह्यात तुरीच्या उत्पादनात जामनेर, मुक्ताईनगर, रावेर, अमळनेर भाग आघाडीवर आहे. या भागातील कोणत्याही बाजार समितीमध्ये सध्या तुरीची आवक अधिक नसल्याचे सांगण्यात आले. शासकीय खरेदीदर ५४५० रुपये प्रतिक्विंटल आहे; तसेच चुकारे आठ ते १० दिवसांत मिळत असल्याने शासकीय खरेदी केंद्रांत तूर विक्रीकडे शेतकऱ्यांचा कल आहे.
 
 जिल्ह्यात यंदा सुमारे अडीच हजार हेक्‍टरवर तुरीची लागवड झाली होती. मागील वर्षी तूर लागवड सुमारे आठ हजार हेक्‍टरवर होती. यंदा लागवडही कमी असल्याने बाजारातील आवकदेखील कमी आहे. फेब्रुवारीच्या सुरवातीला आवक होती. दरही ३५०० ते ४००० रुपये क्विंटलपर्यंत होते; परंतु आता दरात थोडी सुधारणा झालेली आहे, असे काही अडतदारांचे म्हणणे आहे.
 
यंदा लागवड कमी होती; पण उत्पादन बऱ्यापैकी आहे. रावेर, जामनेर व मुक्ताईनगर भागात शेतकरी तुरीच्या उत्पादनाकडे वळले आहेत. त्यामुळे या भागातील मोठ्या शेतकऱ्यांनी तूर साठवून ठेवली आहे. दरवाढीची प्रतीक्षा अजूनही काही शेतकरी करीत असल्याची माहिती मिळाली. 
 
 

इतर ताज्या घडामोडी
भाजीपाला पिकांची रोपवाटिका तयार करतानाभाजीपाला पिकांची रोपवाटिका करताना योग्य ती काळजी...
परभणीत फ्लाॅवर प्रतिक्विंटल २००० ते...परभणी ः येथील जुना मोंढा भागातील फळे भाजीपाला...
पुण्यात फुलांची ७ काेटींची उलाढालपुणे ः फूल उत्पादक शेतकऱ्यांची भिस्त असणाऱ्या...
योग्य प्रमाणातच वापरा युरियानत्र पानांच्या पेशीमध्ये हरित लवकाची निर्मिती...
वनस्पतीतील संजीवकांमुळे अवकाशातही...पोषक घटकांची कमतरता आणि गुरुत्वाकर्षण कमी असणे या...
राज्यातील काही भागात अंशतः ढगाळ वातावरणमहाराष्ट्राच्या पश्‍चिम किनारपट्टीवर म्हणजेच कोकण...
सांगली जिल्हा बॅंकेला कर्जमाफीसाठी...सांगली ः राज्य शासनाच्या छत्रपती शिवाजी महाराज...
गूळ, बेदाणा, काजू महोत्सवास पुणे येथे...पुणे : दिवाळीच्या निमित्ताने ग्राहकांना रास्त...
'सरकारला दुष्काळाची दाहकता लक्षात येईना'पुणे  : यंदा ऑक्टोबर महिन्यातच धरणांमधील...
कर्नाटकात दुष्काळ जाहीर, मग...मुंबई  : ग्रामीण महाराष्ट्र दुष्काळात...
ऊसतोड मजूर महामंडळाला शंभर कोटींचा निधी...बीड   : याआधीच्या सरकारने दहा वर्षांत अडीच...
हिवरेबाजारमध्ये मांडला पाण्याचा ताळेबंदनगर  ः आदर्श गाव हिवरेबाजारमध्ये...
माण, खटाव तालुक्यांत पाणीटंचाई वाढलीसातारा   ः रब्बी हंगामाच्या तोंडावर पाऊस...
पुणे जिल्ह्यात खरिपात ६९ टक्के पीक...पुणे ः यंदा पाऊस वेळेवर न झाल्याने शेतकऱ्यांकडून...
बुलडाणा जिल्ह्यात १ लाख ६५ हजार...बुलडाणा  ः या रब्बी हंगामात जिल्ह्यात एक लाख...
यवतमाळ जिल्ह्यात जिल्हा प्रशासन उभारणार...यवतमाळ  ः शेतीला पूरक व्यवसायाची जोड देत...
अकोल्याला रब्बीसाठी हरभऱ्याचे वाढीव...अकोला  ः जिल्ह्यात रब्बी हंगामासाठी...
दुष्काळाची व्यथा मांडताना महिला...निल्लोड, जि. औरंगाबाद : विहिरींनी तळ गाठला, मक्‍...
कोल्हापूर जिल्ह्यात खरीप पिकांच्या...कोल्हापूर  : खरीप पिकांची काढणी वेगात...
सोलापुरातील अडचणीतील शेतकऱ्यांसाठी आश्‍...सोलापूर  ः सोलापूर जिल्ह्यात दुष्काळाची...