agriculture news in marathi, tur procurment process status, marathwada, maharashtra | Agrowon

चार जिल्ह्यांत ४३ हजार क्विंटल तूर खरेदी
टीम अॅग्रोवन
शनिवार, 24 फेब्रुवारी 2018
औरंगाबाद  : मराठवाड्यातील औरंगाबाद, जालना, लातूर व उस्मानाबाद या चार जिल्ह्यांतील साडेचार हजारांवर शेतकऱ्यांची ४३ हजार ४१९ क्‍विंटल तूर खरेदी करण्यात आली आहे. ३२ खरेदी केंद्रावरून ही तुर खरेदी करण्यात आल्याची माहिती सूत्रांनी दिली. 
 
औरंगाबाद  : मराठवाड्यातील औरंगाबाद, जालना, लातूर व उस्मानाबाद या चार जिल्ह्यांतील साडेचार हजारांवर शेतकऱ्यांची ४३ हजार ४१९ क्‍विंटल तूर खरेदी करण्यात आली आहे. ३२ खरेदी केंद्रावरून ही तुर खरेदी करण्यात आल्याची माहिती सूत्रांनी दिली. 
 
औरंगाबाद, जालना, उस्मानाबाद व लातूर या चार जिल्ह्यांत तुरीची हमीभावाने खरेदी करण्यासाठी ३२ केंद्र सुरू करण्यात आली आहेत. यामध्ये औरंगाबाद जिल्ह्यातील पाच, जालना जिल्ह्यातील आठ, लातूर जिल्ह्यातील दहा व उस्मामानाबाद जिल्ह्यातील नऊ खरेदी केंद्रांचा समावेश आहे. हमीभावाने तुरीची खरेदी सुरू झाल्यानंतर बाजार समित्यांमधील तुरीच्या आवकेवर त्याचा थेट परिणाम झाल्याचे चित्र आहे.
 
प्राप्त माहितीनुसार औरंगाबाद जिल्ह्यात तुरीची हमीदराने खरेदी केंद्र सुरू झाल्यापासून आजवर ४१८ शेतकऱ्यांकडून ४ हजार ३७ क्‍विंटल तुरीची खरेदी करण्यात आली. जालना जिल्ह्यात सुरू असलेल्या आठ खरेदी केंद्रांवरून ११.३० क्‍विंटल प्रतिहेक्‍टरच्या उत्पादकतेनुसार ५८३ शेतकऱ्यांची ४९३२ क्‍विंटल ५० किलो तूर खरेदी करण्यात आल्याची माहिती जालना जिल्हा मार्केटिंग अधिकाऱ्यांनी दिली.
 
लातूर जिल्ह्यात तुरीची दहा खरेदी केंद्र सुरू करण्यात आली आहेत. या केंद्रांवरून २०८८ शेतकऱ्यांची १९ हजार ८५०. १४ क्‍विंटल तूर खरेदी करण्यात आली. उस्मानाबाद जिल्ह्यात तुरीची ९ खरेदी केंद्र सुरू करण्यात आली आहेत. या केंद्रावरून १४५० शेतकऱ्यांकडून चार क्‍विंटल प्रतिएकरप्रमाणे १४ हजार ६०० क्‍विंटल तुरीची खरेदी करण्यात आल्याची माहिती सूत्रांनी दिली. 

शेतीमालाची हमीभावाने विक्री करण्यासाठी शासनाच्या ऑनलाइन नोंदणीला शेतकऱ्यांचा प्रतिसाद वाढतो आहे. तुरीच्या हमीभावाने विक्रीसाठी मराठवाड्यातील औरंगाबाद, जालना, उस्मानाबाद व लातूर या चार जिल्ह्यांतून ४३ हजार ६९ शेतकऱ्यांनी नोंदणी केली आहे.

यामध्ये औरंगाबाद जिल्ह्यातील २०८२, जालना जिल्ह्यातील ५ हजार ८७,  लातूर जिल्ह्यातील सर्वाधिक २६ हजार तर उस्मानाबाद जिल्ह्यातील ९ हजार ९०० शेतकऱ्यांनी तूर विक्रीसाठी ऑनलाइन नोंदणी केल्याची माहिती संबंधीत जिल्ह्यांच्या जिल्हा मार्केटिंग अधिकाऱ्यांनी दिली. ऑनलाइन नोंदणीचे प्रमाण दिवसागणिक वाढत असल्याचेही अधिकारी म्हणाले. 

इतर ताज्या घडामोडी
कर्जमुक्तीसह विविध मागण्यांसाठी...परभणी  : मानवत तालुक्यासह जिल्ह्यातील...
नाशिक जिल्ह्यात ३५०० द्राक्षप्लॉटची...नाशिक  : युरोपियन राष्ट्रांसह रशिया आणि अन्य...
शेतकऱ्यांनो, आत्महत्या करू नका ः आदित्य...बुलडाणा   ः तुम्ही संकटात असताना...
काकडी, दोडका, कारल्याच्या दरात सुधारणापुणे : गुलटेकडी येथील कृषी उत्पन्न बाजार...
‘गिरणा‘च्या पाण्यासाठी वाळूचा बंधाराजळगाव : गिरणा नदीतून पिण्यासह शेतीच्या पाण्याचे...
‘समृद्धी’च्या उभारणीसाठी रॉयल्टीत देणार...नाशिक   : मुंबई-नागपूर समृद्धी महामार्गाच्या...
व्याजासह एफआरपी दिल्याशिवाय...पुणे  : राज्यातील साखर कारखान्यांनी थकीत...
कोल्हापुरात पहिल्या टप्प्यात गूळदरात वाढकोल्हापूर  ः यंदाच्या गूळ हंगामाला सुरवात...
सरुड येथील गुऱ्हाळघरमालक उसाला देणार...कोल्हापूर : गुऱ्हाळघर व्यवसायात व्यावसायिकपणा...
नगर जिल्ह्यात १७८ टॅंकरद्वारे पाणीपुरवठानगर   : जिल्ह्यात यंदा गंभीर पाणीटंचाई जाणवत...
पुणे बाजार समितीत हापूस आंब्यांची आवकपुणे  ः कोकणातील हापूस आंब्यांची या...
सातारा जिल्ह्यात पाणीटंचाई वाढलीसातारा   ः जिल्ह्याच्या पूर्व भागात...
नागपूर जिल्ह्यात रब्बीची २१ टक्के पेरणीनागपूर   ः पाणी उपलब्धतेची अडचण, जमिनीत...
राज्यकर्ते दूध भेसळ का थांबवत नाहीत :...पुणे : राज्यात राजरोस दुधात भेसळ सुरू असून, अन्न...
आर. आर. पाटील यांचे स्मारक युवकांना...सांगली   ः आर. आर. पाटील यांनी ग्रामविकास,...
जळगाव जिल्हा परिषद पाणी योजनांचे वीज...जळगाव : पाणी योजनांचे बिल भरण्यात आले नसल्याने...
जमीन सुपीकतेसाठी सेंद्रिय कर्बाचे...जमिनीच्या सुपीकतेमध्ये सेंद्रिय कर्ब हे अत्यंत...
खानदेशात कांदा लागवड निम्म्याने...जळगाव : खानदेशात यंदा उन्हाळ कांद्याची लागवड...
सटाणा, मालेगावसाठी सोडणार चणकापूर...नाशिक : सटाणा व मालेगावला भेडसावणाऱ्या...
पुणे विभागात ४८ हजार हेक्टरवर कांदा...पुणे   ः पुणे विभागात आत्तापर्यंत ४८ हजार...