agriculture news in marathi, tur procurment process status, parbhani, maharashtra | Agrowon

तीन जिल्ह्यांत ५८ हजार क्विंटल तूर खरेदी केंद्रांवर पडून
टीम अॅग्रोवन
गुरुवार, 15 मार्च 2018
नांदेड : केंद्र शासनाच्या किंमत समर्थन मूल्य योजनेअंतर्गत नांदेड, परभणी, हिंगोली या तीन जिल्ह्यांत बुधवारपर्यंत (ता. १४) खरेदी करण्यात आलेल्या ९५ हजार क्विंटल तुरीपैकी ५८ हजार क्विंटल तूर खरेदी केंद्रावर पडून असल्यामुळे शेतकऱ्यांना तुरीचे चुकारे मिळण्यासाठी प्रतीक्षा करावी लागणार आहे.
 
नांदेड : केंद्र शासनाच्या किंमत समर्थन मूल्य योजनेअंतर्गत नांदेड, परभणी, हिंगोली या तीन जिल्ह्यांत बुधवारपर्यंत (ता. १४) खरेदी करण्यात आलेल्या ९५ हजार क्विंटल तुरीपैकी ५८ हजार क्विंटल तूर खरेदी केंद्रावर पडून असल्यामुळे शेतकऱ्यांना तुरीचे चुकारे मिळण्यासाठी प्रतीक्षा करावी लागणार आहे.
 
खुल्या बाजारातील दर कोसळ्यामुळे फेब्रुवारी महिन्यापासून केंद्र शासनाच्या किंमत समर्थयोजनेअंतर्गत आधारभूत किंमत दराने नाफेड आणि विदर्भ को आॅपरेटिव्ह मार्केटिंग फेडरेशतर्फे तूर खरेदी सुरू करण्यात आली आहे. बुधवारपर्यंत (ता. १४) नांदेड जिल्ह्यात नाफेडतर्फे ५७८३ शेतकऱ्यांची ५६,३०६, परभणी जिल्ह्यात नाफेड आणि विदर्भ को-आॅपरेटिव्ह मार्केटिंग फेडरेशनतर्फे १३९९ शेतकऱ्यांची २१,२४६, हिंगोली जिल्ह्यात नाफेडतर्फे १७५२ शेतकऱ्यांची १६ हजार ९८३ अशी तीन जिल्ह्यांत एकूण ८९३४ शेतकऱ्यांची ९५ हजार ३५ क्विंटल तूर खरेदी करण्यात आली आहे.
 
शेतकऱ्यांना तुरीचे चुकारे अदा करण्यासाठी शासकीय खरेदी केंद्रावरील तूर वखार महामंडळाच्या गोदामात ती साठविणे आवश्यक आहे. परंतु या तीन जिल्ह्यांत वखार महामंडळाच्या गोदामात जागा नसल्यामुळे खरेदी केंद्रावर ५८ हजार ४३२ क्विंटल तूर पडून आहे. त्यामुळे शेतकऱ्यांना चुकारे मिळण्यास वेळ लागणार आहे.
 
वखार महामंडळाने काही ठिकाणी खासगी गोदामे भाडेतत्त्वावर घेतली आहेत. तरीही खरेदी केलेली तूर साठविण्यासाठी जागा अपुरी पडत असल्यामुळे शेतकऱ्यांना तुरीचे चुकारे मिळण्यासाठी प्रतीक्षा करावी लागत आहे. दरम्यान, खरेदी केंद्रावरील गोदामात जागा अपुरी पडत असल्यामुळे नाफेडचे बोरी (ता. जिंतूर) येथील केंद्रावर तूर खरेदी बंद रहात आहे. त्यामुळे शेतकऱ्यांची हेळसांड होत आहे.

इतर ताज्या घडामोडी
काँग्रेसमध्ये नवचैतन्य; प्रियंका गांधी...नवी दिल्ली : काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधी...
पीकनिहाय सेंद्रिय खत व्यवस्थापनपशुपालनातून जमिनीची सुपीकता हा विषय आता...
परोपजीवी मित्र-कीटकांची ओळखसध्या केवळ कीडनियंत्रणासाठी कीटकनाशकांच्या...
खोडवा उसाला द्या शिफारशीत खतमात्रापाण्याची उपलब्धता लक्षात घेऊन रासायनिक खतांचा...
परभणीत काकडी १००० ते १५०० रुपये क्विंटलपरभणी : येथील पाथरी रस्त्यावरील फळे,...
मागण्यांसाठी संग्रामपूर येथे...बुलडाणा  ः जनावरांसाठी चारा नाही, लोकांना...
शेतकऱ्यांनी पाडली तूर खरेदी बंदयवतमाळ : हमीभावापेक्षा ९०० ते १००० रुपये कमी...
कर्जमाफीसाठी पॉलिहाउस शेडनेटधारक...नगर  : पॉलिहाउस शेडनेटधारक शेतकऱ्यांचे...
विदर्भात पाच ठिकाणी होणार ब्रिज कम...अमरावती  ः भूजल पुनर्भरणाच्या उद्देशाने...
सोलापूर जिल्ह्यातील १६२ पाणंद...सोलापूर : सोलापूर जिल्ह्यात पालकमंत्री पाणंद...
खानदेशात मक्याची आवक नगण्यजळगाव : खानदेशातील प्रमुख बाजार समित्यांमध्ये मक्...
सातारा जिल्ह्यात ४६ लाख ३५ हजार टन ऊस...सातारा : जिल्ह्यातील ऊस गाळप हंगाम वेगात...
जळगावमधील ग्रामपंचायतींचा डिजिटल...जळगाव  ः ग्रामपंचायतींमध्ये संगणकावरील विविध...
पुणे जिल्ह्यात ७१ लाख टन ऊस गाळपपुणे   ः जिल्ह्यात १७ साखर...
नगर जिल्ह्याचे विभाजन होणारच ः...नगर  ः नगर जिल्ह्याचे विभाजन व्हावे, ही...
पंधरा दिवसांपूर्वीच संपला नगरमधील पाच...नगर ः नगर जिल्ह्यामध्ये चाराटंचाई अंधिक तीव्र होत...
वीज दरवाढ रद्दबाबतचे परिपत्रक...शिरोली पुलाची, जि. कोल्हापूर : वीज दरवाढ...
दुष्काळग्रस्तांच्या मागण्यांसाठी परभणीत...परभणी : जिल्ह्यातील दुष्काळग्रस्त शेतकरी,...
हरकती असलेल्या जमिनी अधिग्रहित करणार...मुंबई   : हरकती असलेल्या जमिनी...
मराठवाडा, खानदेशात ४९ लाख टन ऊसगाळपऔरंगाबाद : यंदाच्या हंगामात मराठवाडा व खानदेशातील...