agriculture news in marathi, tur procurment process status, varhad, maharashtra | Agrowon

वऱ्हाडात तूर खरेदी पोचली दोन लाख क्विंटलपर्यंत
टीम अॅग्रोवन
बुधवार, 7 मार्च 2018
अकोला : वऱ्हाडातील तीन जिल्ह्यांत शासकीय हमीभावाने सुरू असलेल्या खरेदी केंद्रांवरील तूर खरेदी दोन लाख क्विंटलपर्यंत पोचली अाहे. साधारणतः महिनाभरात महाराष्ट्र राज्य को-अाॅप मार्केटिंग फेडरेशन व विदर्भ को-अाॅप  मार्केटिंग फेडरेशनच्या माध्यमातून सुुरू असलेल्या केंद्रांवर ही खरेदी करण्यात अाली अाहे.
 
अकोला : वऱ्हाडातील तीन जिल्ह्यांत शासकीय हमीभावाने सुरू असलेल्या खरेदी केंद्रांवरील तूर खरेदी दोन लाख क्विंटलपर्यंत पोचली अाहे. साधारणतः महिनाभरात महाराष्ट्र राज्य को-अाॅप मार्केटिंग फेडरेशन व विदर्भ को-अाॅप  मार्केटिंग फेडरेशनच्या माध्यमातून सुुरू असलेल्या केंद्रांवर ही खरेदी करण्यात अाली अाहे.
 
बऱ्याच प्रतीक्षेनंतर या हंगामात फेब्रुवारीत तूर खरेदी केंद्र सुरू करण्यात अाले. यात अाॅनलाइन नोंदणी करून शेतकऱ्यांना मेसेज देत केंद्रावर तूर विक्रीसाठी अाणण्याची सूचना केली जात अाहे. त्यामुळे यावर्षी कुठल्याच केंद्रावर रांगा लागल्या किंवा गोंधळ उडाला असे अद्यापपर्यंत झालेले नाही. खरेदी प्रक्रीया झाल्यानंतर चुकारे थेट शेतकऱ्यांच्या बँक खात्यात वर्ग केले जाणार अाहेत. या हंगामात तुरीला ५२५० रुपये दर व २०० रुपये बोनस असा ५४५० रुपये क्विंटल हमीभाव जाहीर झालेला अाहे. 
 
फेब्रुवारीच्या पहिल्या अाठवड्यात तूर खरेदीसाठी ठिकठिकाणी केंद्र सुरू करण्यात अाले. विदर्भ मार्केटिंग फेडरेशन व महाराष्ट्र मार्केटिंग फेडरेशन यांच्या केंद्रावर अातापर्यंत साधारण महिनाभराच्या कालावधीत तूर खरेदीत बुलडाणा जिल्ह्याने अाघाडी घेतली. या जिल्हयात एक लाख १५ हजार क्विंटलपेक्षा अधिक तूर अातापर्यंत खरेदी झाली अाहे.
 
त्यानंतर अकोला जिल्ह्यात ५२ हजार ५०० अाणि वाशीम जिल्ह्यात २९ हजार ५४१ क्विंटल तूर खरेदी करण्यात अालेली अाहे. सर्व केंद्रांवर एक लाख ९८ हजार क्विंटलपेक्षा अधिक खरेदी झाली असून या तुरीची किंमत १०८ कोटी १५ लाख रुपये अाहे. या महिन्यात तुरी खरेदीत आणखी वाढ होणार अाहे. मात्र उत्पादन कमी असल्याने गेल्यावर्षीप्रमाणे अाकडे गाठले जातील हे सांगणे कठीण अाहे. 
 
येथे आहेत तूर खरेदी केंद्रे : महाराष्ट्र स्टेट को-अाॅप मार्केटिंग फेडरेशन ः अकोला, तेल्हारा, बार्शिटाकळी, पातूर, वाडेगाव, पारस, रिसोड, मालेगाव, मानोरा, वाशीम, शेगाव, देऊळगावराजा, चिखली, संग्रामपूर, मेहकर, बुलडाणा, मोताळा, लोणार.  
विदर्भ को-अाॅप मार्केटिंग फेडरेशन ः अकोट, मूर्तिजापूर, मलकापूर, खामगाव, जळगाव जामोद, नांदुरा, चिखली, कारंजा, मंगरुळपीर. 

इतर ताज्या घडामोडी
पेरूबागेसाठी सघन लागवडीचे तंत्रपेरू बागेमध्ये उत्पादकता वाढवण्यासाठी सघन...
जळगाव बाजार समितीकडून आवाराबाहेर...जळगाव : फळे-भाजीपाला नियमनमुक्तीनंतर बाजार समिती...
जीएम ई. कोलाय जैवइंधननिर्मितीसाठी...जैवइंधनाच्या निर्मितीसाठी जनुकीय तंत्रज्ञानाने...
पुणे विभागात पाणीटंचाई वाढतेयपुणे : वाढत्या उन्हाबरोबरच पुणे विभागातील...
जळगाव जिल्ह्यातील पाणीटंचाई होतेय भीषणजळगाव  ः जिल्ह्यातील पश्‍चिम पट्ट्यात...
गनिमी काव्याने राष्ट्रीय किसान...नाशिक : राष्ट्रीय किसान महासंघातर्फे...
बीड जिल्ह्यात एक लाख क्विंटल तुरीचे...बीड  : शासनाने नाफेडमार्फत केलेल्या तूर...
पुणे जिल्ह्यात भात लागवडीसाठी...पुणे: जिल्ह्यातील भातपट्ट्यातील शेतकऱ्यांनी खरीप...
शिवसेना-भाजपच्या कुरघोडीने युतीवरचे...मुंबई : विधान परिषदेच्या सहा जागांसाठी राज्यातील...
पीककर्ज वाटप सुरू करण्याची स्वाभिमानीची...परभणी : उत्पादनात घट आल्यामुळे तसेच...
सांगली जिल्ह्यात पाणीटंचाई वाढलीसांगली : जिल्ह्यातील ताकारी, म्हैसाळ आणि टेंभू...
नांदेड विभागातील साखर कारखान्यांची...नांदेड : नांदेड विभागातील परभणी, हिंगोली, नांदेड...
नवीन ९९ लाख लाभार्थी घेतील...मुंबई : राष्ट्रीय अन्नसुरक्षा योजनेअंतर्गत आता...
नगर जिल्ह्यातील सहा ठिकाणी हरभरा खरेदी...नगर  ः खरेदी केलेला हरभरा साठवणुकीसाठी जागा...
शेतकऱ्याने तयार केली डिझेलवरची बाईकसांगली : वाढत्या पेट्रोलच्या सुटकेसाठी...
शेतकऱ्यांना फसविणारे विक्रेते,...सोलापूर : शेतकरी केंद्रबिंदू मानून...
धुळे जिल्ह्यात पूर्वहंगामी कापूस...धुळे : जिल्ह्यात पूर्वहंगामी कापूस लागवडीची...
जळगाव जिल्ह्यात खरिपासाठी मुबलक खतेजळगाव : जिल्ह्यात आगामी खरिपासाठी शेतकऱ्यांची...
सोलापुरात गाजर, काकडीचे दर वधारले,...सोलापूर ः सोलापूर कृषी उत्पन्न बाजार समितीच्या...
कारखान्यांनी थकीत `एफआरपी' त्वरीत...सोलापूर : जिल्ह्यातील साखर कारखान्यांनी थकवलेले...