बुलडाणा जिल्ह्यात तीन लाख क्विंटल तूर खरेदी

तूर खरेदी
तूर खरेदी
बुलडाणा : विविध अडचणींचा सामना करीत बुलडाणा जिल्ह्यात तूर खरेदीने तीन लाख क्विंटलचा टप्पा गाठला अाहे. महाराष्ट्र को-अाॅप. फेडरेशन अाणि विदर्भ को-अाॅप. मार्केटिंग फेडरेशन या दोन एजन्सीमार्फत १४ केंद्रांवर जिल्ह्यात तूर खरेदी केली जात अाहे. 
 
या हंगामात हमीभावाने तूर विक्रीसाठी जिल्ह्यातील ७७ हजार शेतकऱ्यांनी अाॅनलाइन नोंदणी केली असून, अातापर्यंत केवळ २२ हजार शेतकऱ्यांची तूर खरेदी झाली अाहे. तूर खरेदीची मुदत १८ एप्रिल असून, अाता १५ दिवसांत उरलेल्या ५५ हजार शेतकऱ्यांची तूर मोजून घेण्याचे यंत्रणांपुढे अाव्हान अाहे. 
 
तूर खरेदी प्रक्रियेअंतर्गत महाराष्ट्र को-अाॅप. फेडरेशनने नऊ केंद्रांवर एक लाख ४० हजार ७०१ क्विंटल तूर खरेदी केली. विदर्भ मार्केटिंग फेडरेशन को-अाॅपरे.िटव्हने पाच केंद्रांवर एक लाख ६० हजार १२२ क्विंटल तुरीची खरेदी केली. दोन्ही एजन्सी मिळून तूर खरेदी तीन लाख क्विंटलवर पोचली. अातापर्यंत केवळ ३० ते ३५ टक्के नोंदणी झालेल्या शेतकऱ्यांची तूर खरेदी झाली अाहे. अाता बाकी शेतकऱ्यांची तूर खरेदी करण्याचे मोठे अाव्हान अाहे. 
 
तूर खरेदीला फेब्रुवारी महिन्यात सुरवात झाल्यापासून विविध अडचणी येत अाहेत. त्यात प्रामुख्याने खरेदी केलेली तूर ठेवायला जागाच शिल्लक नाही. जागेअभावी तसेच सोबतच हरभरा खरेदी केली जात असल्याने अडचणीत मोठी भर पडली अाहे. तूर खरेदीचा मोठा पल्ला गाठायचा असून, गेल्या मोसमातील शिल्लक तूर अाधी हलवणे गरजेचे अाहे.   
 
तूर खरेदीनंतर वेअरहाऊस ती ठेवली जाते. त्यानंतर चुकाऱ्यांची प्रक्रिया सुरू होते. विदर्भ मार्केटिंग फेडरेशनने बुलडाणा जिल्ह्यात सुमारे ८७ कोटींची तूर खरेदी केली. त्यापैकी ५६ कोटींचे चुकारे झाले; तर ३० कोटी अद्याप मिळायचे अाहेत. महाराष्ट्र स्टेट को-अाॅप. फेडरेशनने ७६ कोटींची खरेदी केली अाहे. यातील चुकारे मिळायचे अाहेत.  
 
गेल्या महिन्यात हरभरा खरेदी सुरू करण्यात अाली असून, अातापर्यंत ३६२३ क्विंटल हरभरा खरेदी झाली अाहे. महाराष्ट्र फेडरेशनेने १४३० अाणि विदर्भ फेडरेशनने २१९३ क्विंटल हरभरा खरेदी केला. हरभरा विक्रीसाठी ५८०० पेक्षा अधिक शेतकऱ्यांनी नोंदणी केली अाहे.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com