agriculture news in marathi, tur procurment process status,marathwada, maharashtra | Agrowon

चार जिल्ह्यांत एक लाख तीस हजार क्विंटल तूर खरेदी
टीम अॅग्रोवन
गुरुवार, 15 मार्च 2018
औरंगाबाद  : मराठवाड्यातील औरंगाबाद, लातूर, उस्मानाबाद व जालना या चार जिल्ह्यांतील ३२ खरेदी केंद्रांवरून १२ हजार ९०१ शेतकऱ्यांची १ लाख ३० हजार ८०२ क्‍विंटल तूर हमीभावाने खरेदी करण्यात आली आहे. जसजशी तूर खरेदीला गती येत आहे, तसतसा तूर साठवणुकीचा प्रश्‍नही ऐरणीवर आला आहे.
 
औरंगाबाद  : मराठवाड्यातील औरंगाबाद, लातूर, उस्मानाबाद व जालना या चार जिल्ह्यांतील ३२ खरेदी केंद्रांवरून १२ हजार ९०१ शेतकऱ्यांची १ लाख ३० हजार ८०२ क्‍विंटल तूर हमीभावाने खरेदी करण्यात आली आहे. जसजशी तूर खरेदीला गती येत आहे, तसतसा तूर साठवणुकीचा प्रश्‍नही ऐरणीवर आला आहे.
 
औरंगाबाद जिल्ह्यात हमीभावाने तूर खरेदीची पाच केंद्रे सुरू आहेत. या केंद्रांमध्ये आजवर २८६८ शेतकऱ्यांनी हमीभावाने तूर खरेदीसाठी ऑनलाइन नोंदणी केली होती. या शेतकऱ्यांपैकी १०५७ शेतकऱ्यांच्या ९ हजार १४ क्‍विंटल ५० किलो तुरीची खरेदी करण्यात आली आहे. दुसरीकडे जालना जिल्ह्यात हमीभावाने तूर खरेदीची आठ केंद्रे सुरू आहेत. या केंद्रांवरून १४०६ शेतकऱ्यांकडून १२ हजार ७१५ क्‍विंटल ५० किलो तूर खरेदी करण्यात आली आहे.
 
लातूर जिल्ह्यात तुरीची सर्वाधिक आवक होत असते. यंदा कर्नाटकातून येणाऱ्या तुरीची आवक आपल्यापेक्षा त्याभागात अधिकचे दर मिळत असल्याने जवळपास बंद झाली होती. प्राप्त माहितीनुसार लातूर जिल्ह्यात हमीभावाने तुरीची खरेदी करण्यासाठी दहा केंद्रे सुरू करण्यात आली होती. या केंद्रांवरून ६४३८ शेतकऱ्यांची ६४ हजार ६७२ क्‍विंटल तूर खरेदी करण्यात आली आहे. खरेदी करण्यात आलेल्या तुरीपैकी तब्बल ३८ हजार ९२० क्‍विंटल तूर जागेअभावी गोडाऊनमध्ये साठविणे बाकी आहे. त्यामुळे जागेच्या प्रश्‍नाने लातुरातही डोके वर काढले आहे.
 
उस्मानाबाद जिल्ह्यात तूर खरेदीची ९ केंद्रे सुरू आहेत. या केंद्रांवरून ४ हजारांवर शेतकऱ्यांची ४४ हजार ४०० क्‍विंटल तूर हमीभावाने खरेदी करण्यात आल्याची माहिती सूत्रांनी दिली. औरंगाबाद, जालना, उस्मानाबाद व लातूर या चार जिल्ह्यांतील ३२ खरेदी केंद्रांवरून १ लाख ३० हजार ८०२ क्‍विंटल तुरीची हमीभावाने खरेदी करण्यात आल्याची माहिती चारही जिल्ह्यांतील मार्केटिंग अधिकाऱ्यांनी दिली. 
 
हमीभावाने हरभऱ्याची खरेदी करण्यासाठी शेतकऱ्यांच्या नावे व क्षेत्र नोंदणीची प्रक्रिया सुरू करण्यात आली आहे. जालना जिल्ह्यातील जालना, परतूर, अंबड व भोकरदन या चार खरेदी केंद्रांवर नोंदणी सुरू आहे. दुसरीकडे उस्मानाबाद जिल्ह्यात जवळपास बाराशे शेतकऱ्यांनी हरभरा खरेदीसाठी नोंदणी केल्याची माहिती सूत्रांनी दिली.
 
औरंगाबाद, जालना, उस्मानाबाद व लातूर या चारही जिल्ह्यांत हरभऱ्याची हमीभावाने खरेदी करण्यासाठी नोंदणीची प्रक्रिया सुरू असल्याची माहिती सूत्रांनी दिली. 

इतर ताज्या घडामोडी
राज्यातील चौदा मतदारसंघांत आज मतदानमुंबई   ः लोकसभा निवडणुकीच्या तिसऱ्या...
स्थानिक घटकांपासून नावीन्यपूर्ण सौर...तीव्र थंडीच्या स्थितीमध्ये वापरण्यायोग्य सौर...
जळगावात हरभऱ्याची ऑनलाइन नोंदणी आज बंदजळगाव : जिल्ह्यात शासकीय हरभरा खरेदीसाठी अजून...
रावेर, जळगावसाठी आज मतदानजळगाव : लोकसभा निवडणुकीच्या जळगाव व रावेर...
वाळूउपशामुळे विहिरींच्या पाणीपातळीत घटनाशिक : बागलाण तालुक्यातील ताहाराबाद ...
नांदेड जिल्ह्यात अडीच हजार कोटींचे...नांदेड ः नांदेड जिल्ह्यातील विविध बॅंकांना २०१९-...
राज्याचे एक थेंबही पाणी गुजरातला देऊ...नाशिक  : ‘‘पंतप्रधान नरेंद्र मोदी...
धर्मराजाचा कडाही यंदा आटलामाजलगाव, जि. बीड : माजलगाव धरणालगतच असलेला...
लक्षवेधी माढ्यासाठी आज मतदानसोलापूर  : अत्यंत प्रतिष्ठेच्या ठरलेल्या...
जळगाव बाजारात केळी दरात सुधारणाजळगाव ः जिल्ह्यात मुक्ताईनगर व रावेरात दर्जेदार...
नगरमध्ये प्रशासन गुंतले निवडणुकीत,...नगर  : दुष्काळात जनावरे जगविण्यासाठी चारा...
पुणे विभागात तेरा हजार हेक्टरवर चारा...पुणे : पाणीटंचाईमुळे चाऱ्याची चांगलीच टंचाई...
पुणे जिल्ह्यात पाणीटंचाईमुळे फळबागा...पुणे  ः कमी झालेल्या पावसामुळे जिल्ह्यातील...
नगर लोकसभा मतदारसंघात आज मतदाननगर : नगर लोकसभा मतदारसंघासाठी आज (मंगळवारी) २०३०...
यवतमाळ जिल्ह्यात दोन लाख टन खतांची मागणीयवतमाळ  : येत्या खरीप हंगामासाठी कृषी...
यवतमाळ जिल्ह्यात होणार ६६४ विहिरींचे...यवतमाळ  ः जिल्ह्यात दिवसेंदिवस गंभीर होत...
कळमणा बाजारात तुरीच्या दरात सुधारणानागपूर ः कळमणा बाजार समितीत तुरीची आवक...
अमरावतीतील दहा हजारांवर शेतकऱ्यांचे... अमरावती  ः निसर्गाचा लहरीपणामुळे शेतकरी...
शरद जोशीप्रणीत शेतकरी संघटनेच्या...जळगाव   ः लोकसभा निवडणुकीसाठी नाशिक...
शेतकरी आणि व्यापाऱ्यांमधील ...नाशिक  : कृषी अर्थव्यवस्था बळकट करण्यासाठी...